मिरची मध्ये बॅक्टेरियाच्या पानांचे स्पॉट व्यवस्थापन

मिरचीवरील जिवाणूजन्य पानचट्टा (बॅक्टरीअल लीफ स्पॉट)

  • पानांवर लहान, वर्तुळाकार किंवा अनियमित आकाराचे, गडद राखाडी किंवा काळे डाग पडतात. डागांचा आकार वाढतो तसतसा त्याच्या केंद्रबिंदूभोवतीचा उतींचा काळपट घेरा फिकट होत जातो.
  • डागांपासून अनियमित आकाराचे व्रण बनतात. गंभीर हल्ला झाल्यास रोगग्रस्त पाने हरितद्रव्यहीन (क्लोरोटिक) होतात आणि गळून पडतात. पल्लव आणि खोडावर देखील लागण होते.
  • खोडामधील संक्रमण कॅन्सरच्या वाढीस आणि फांद्यांच्या विघटनास कारणीभूत ठरते. फळांवर फिकट पिवळ्या कडा असलेले, गोल, फुगीर, पाण्याने भरलेले डाग पडतात.
  • डाग राखाडी रंगाचे होतात. त्यांच्या केंद्रस्थानी फोड असतो त्यात बॅक्टीरियल द्रावाचे चमकदार थेंब दिसतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>