पानकोबीसाठी नर्सरी बनवणे
- बियाणे वाफ्यात पेरले जाते. सामान्यता 4 – 6 आठवडे वयाची रोपे पुनर्रोपित केली जातात.
- वाफ्यांची ऊंची 10 ते 15 से.मी. असते आणि आकार 3 x 6 मी. असतो.
- दोन वाफ्यात 70 से.मी. अंतर असते. त्यामुळे निंदणी सारखी आंतरिक कामे करणे सोपे जाते.
- नर्सरीतील वाफ्यांची माती भुसभुशीत आणि समतल असावी.
- नर्सरी वाफे तयार करताना 8-10 कि.ग्रॅ. शेणखत प्रति वर्ग मीटर मिसळावे.
- जड मातीत उंच वाफे तयार करून पाणी तुंबण्याची समस्या सोडवता येते.
- आर्द्र गलन रोगापासून होणार्या हानीचा बचाव करण्यासाठी थायोफेनेट मिथाइल 70% चे 30 ग्रॅम प्रति 15 लीटर पाण्यात मिश्रण बनवून मातीत मिसळावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share