मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने मुख्यमंत्री सोलर पंप योजना सुरू करण्यात आली आहे. या विषयावर गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा मंत्रिमंडळातील बैठकीत म्हणाले की, “सिंचनासाठी सोलर पंप बसविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोलर पंप या योजनेस मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला आहे की, जिथे आता वीज नाही, तिथे सोलर पंपांना प्राधान्य देऊन मुख्यमंत्री सोलर पंप योजना ही तातडीने राबवावी.
सौर पंप बसविण्यासाठी शेतकरी मध्य प्रदेश उर्जा विकास निगम लिमिटेड येथे ऑनलाईन अर्ज करू शकतात. याअंतर्गत भारत सरकार आणि मध्य प्रदेश सरकारद्वारा सब्सिडी देण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्री सोलर पंप योजनेअंतर्गत अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल की, ज्यांच्या शेतात वीज सुविधा उपलब्ध नाही.
स्रोत: गांव कनेक्शन
Shareकृषी व शेतकर्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांविषयी माहितीसाठी ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर करण्यास विसरू नका.