दक्षिण मध्यप्रदेश, विदर्भ, छत्तीसगडमधील बहुतेक भागांत तापमानात सातत्याने वाढ होत आहे. या भागातील तापमान 38-39 अंशांवरती येऊन पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत उन्हापासून आराम मिळण्याची कोणतीही शक्यता नाही.
याशिवाय जम्मू-काश्मीर ते उत्तराखंडपर्यंत येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसासह बर्फ पडण्याची शक्यता आहे. तसेच दिल्लीसह उत्तर भारतात रात्री थंडी असेल, परंतु दिवसा जोरदार सूर्यप्रकाश असेल.
स्रोत: स्काईमेट वेदर
Share