भेंडीची पेरणी करण्यापूर्वी मातीवर उपचार करणे फार महत्वाचे असते.
शेतातील मातीचे उपचार हे झाडाला मातीमुळे होणारे कीटक आणि बुरशीपासून वाचवण्यासाठी केले जातात.
जुन्या पिकांचे अवशेष शेतात राहिल्यास काही हानिकारक बुरशी आणि कीटक वाढू शकतात. या बुरशी व कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पेरणीपूर्वी मातीचे उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
एफ.वाय.एम. (शेणखत)10 मेट्रिक टन / एकर आणि कंपोस्टिंग बॅक्टेरिया 4 किलो / एकर आणि ट्रायकोडर्मा विरिडी 500 ग्रॅम / एकरी माती उपचार म्हणून वापरावेत.