भेंडीचा पित्त शिरा मोज़ेक विषाणु रोग

  • ही भिंडी पिकातील मोठी समस्या आहे, हा रोग पांढरी माशी नावाच्या किडीमुळे होतो.

  • ही समस्या भेंडी पिकाच्या सर्व टप्प्यांत दिसून येते ज्याचा पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होतो.

  • या रोगात पानांच्या शिरा पिवळ्या दिसू लागतात व नंतर पाने पिवळी होऊन वळू लागतात.

  • प्रभावित फळे फिकट पिवळी, विकृत व कडक होतात.

  • व्यवस्थापन :-

  • व्हायरस पासून प्रभावित झाडे आणि वनस्पतींचे भाग उपटून नष्ट करावेत.

  • काही जाती जसे मोना, वीनस प्लस, परभणी क्रांति, अर्का अनामिका , इत्यादी व्हायरस सहनशील आहेत.

  • झाडाच्या वाढीच्या अवस्थेत खतांचा अतिवापर करू नका.

  • शक्यतोपर्यंत भेंडी पिकाची पेरणी वेळेपूर्वी करा. 

  • पिकामध्ये वापरण्यात येणारी सर्व उपकरणे स्वच्छ ठेवावीत जेणेकरून या उपकरणांद्वारे हा रोग इतर पिकांपर्यंत पोहोचू नये.

  • या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांसोबत भेंडीची पेरणी करू नये.

  • यांत्रिक नियंत्रणासाठी, पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी एकरी 10 चिकट सापळे वापरता येतात.

  • रासायनिक नियंत्रणासाठी डाइफेंथियूरॉन 50 % डब्ल्यूपी 250 ग्रॅम एसिटामिप्रिड 20% एसपी 100 ग्रॅम इमिडाइक्लोप्रिड 17.8% एसएल 80 मिली /एकर या दराने फवारणी करावी.

Share

See all tips >>