शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी बियाणे उपचार करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते, त्यामुळे बियाणे व मातीजन्य रोगांना प्रतिबंध होतो.
देशातील 70 ते 80 टक्के शेतकरी बियाणे बदलत नाहीत आणि ते जुने बियाणेच वापरतात.
या कारणांमुळे कीड आणि रोगाचा धोका जास्त असतो, परिणामी खर्च देखील वाढतो.
बीजप्रक्रिया करून उत्पादनात 6 ते 10 टक्के एवढी वाढ करता येते.
बीजप्रक्रियेने उगवण चांगली होण्याबरोबरच झाडांची वाढही चांगली होते. बीजप्रक्रिया केल्याने कीटकनाशकांचा प्रभावही वाढतो आणि पीक 20 ते 25 दिवस सुरक्षित होते.