गव्हाच्या पिकासाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन
गव्हाच्या पिकासाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन:- गव्हाच्या पिकासाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे असते. मातीतील पोषक तत्वांबाबत माहिती मिळवण्यासाठी मृदा परीक्षण आवश्यक असते. मृदा परीक्षणाच्या आधारे पोषक तत्वांच्या व्यवस्थापनासाठी रणनीती बनवली जाते –
- उत्तम प्रतीचे शेणखत किंवा कम्पोस्ट खत 15-20 टन/हे. या प्रमाणात दर 2 वर्षांनी मातीत मिसळावे.
- शेणखत घातल्याने मातीची संरचना सुधारते आणि उत्पादन वाढते.
- गव्हाच्या पिकासाठी 88 कि.ग्रॅ. यूरिया, 160 कि.ग्रॅ, सिंगल सुपर फॉस्फेट आणि 40 कि.ग्रॅ. म्युरेट ऑफ़ पोटाश प्रति एकर या प्रमाणात वापरावे.
- युरियाचा वापर तीन भागात पुढीलप्रमाणे करावा:
1.) 44 कि.ग्रॅ. यूरियाची मात्रा पेरणीच्या वेळी द्यावी.
2.) उरलेल्यापैकी 22 कि. ग्रॅ. पहिल्या सिंचनापूर्वी द्यावी.
3.) उरलेली 22 कि. ग्रॅ. दुसर्या सिंचनाच्या वेळी द्यावी. - सिंचन अंशता असल्यास आणि जास्तीत जास्त दोन वेळा सिंचन होणार असल्यास यूरिया @ 175, सुपर सिंगल फॉस्फेट@ 250 आणि म्युरेट ऑफ़ पोटाश @ 35-40 कि. ग्रॅ प्रति हेक्टर द्यावे.
सिंचन उपलब्ध नसल्यास नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटाशची पूर्ण मात्र द्यावी. - गव्हाची पेरणी मध्य डिसेंबरमध्ये करणार असल्यास नत्राची मात्रा 25 टक्के घटवावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share