Advantage of Phosphorus Solubilizing bacteria in bitter gourd

फॉस्फरस विरघळवणार्‍या जिवाणूंचे कारल्याच्या पिकासाठी महत्त्व

  • हे जिवाणू फॉस्फरससह मॅंगनीज, मॅग्नेशियम, आयर्न, मॉलिब्डेनम, झिंक आणि कॉपर यासारख्या सूक्ष्म पोषक तत्वांना देखील रोपांना पुरवण्यास सहाय्य करतात.
  • ते मुळांचा वेगाने करण्यास सहाय्य करतात. त्यामुळे रोपाला पाणी आणि पोषक तत्वे सहजपणे मिळतात.
  • पीएसबी काही मॅलिक, सक्सिनिक, टार्टरिक अॅसिड आणि अॅसिटीक अॅसिड यासारखी काही खास जैविक आम्ले बनवतात. ही आम्ले फॉस्फरसची उपलब्धता वाढवतात.
  • ते रोग आणि शुष्कतेबाबतची प्रतिरोधकता वाढवतात.
  • त्यांचा वापर करण्याने फॉस्फेटिक उर्वरकांची आवश्यकतेत 25 -30% घट होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Phosphorus Deficiency in Cotton

कापसातील फॉस्फरसचा अभाव:-

फॉस्फरसचा अभाव असलेल्या झाडांच्या पानांचा आकार लहान आणि रंग गडद हिरवा असतो. अभावाची लक्षणे सर्वप्रथम कापसाच्या झाडाच्या खालील बाजूच्या किंवा जुन्या पानांवर दिसतात. पानांचा हिरवा रंग जास्त गडद होतो. त्यामुळे फॉस्फरसचा अभाव जाणवतो. फॉस्फरसचा तीव्र अभाव फक्त रोपांना खुरटूनच टाकत नाही तर दुय्यम फांद्या आणि बोंडांची संख्याही त्यामुळे कमी होते. फॉस्फरसचा अभावाने फुले उमलण्यात, फलधारणेत आणि परिपक्वतेत उशीर होतो. लहान पाने जास्त गडद हिरवी दिसतात. जुन्या पानांचा आकार लहान होतो आणि त्यांच्यात जांभळे आणि लाल रंगद्रव्य विकसित होते.

उपाय :- 12:61:00 किंवा 00:52:34  @100 ग्रॅम प्रति पम्प फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Role of Phosphorus in Plants

रोपात फॉस्फरसची भूमिका

सर्व जीवांसाठी फॉस्फरस (P) आवश्यक असतो. रोपांच्या नैसर्गिक विकास आणि परिपक्वतेसाठी फॉस्फरस लागतो. फॉस्फरस रोपांमध्ये प्रकाश संश्लेषण, श्वसन, ऊर्जा साठवण आणि हस्तांतरण, कोशिका विभाजन, कोशिका विकास आणि इतर अनेक प्रक्रियात भूमिका बजावतो. फॉस्फरस हा सर्व जीवितांचे आनुवांशिक “स्मृति एकक” असलेल्या डीएनए चा महत्वपूर्ण घटक असतो. फॉस्फरस रोपांचे “ऊर्जा एकक” असलेल्या एटीपीचा महत्वपूर्ण घटक असतो. अशाप्रकारे सर्व वनस्पतींच्या निरोगीपणा आणि शक्तीसाठी फॉस्फरस आवश्यक असतो. वाढीचे पुढील घटक फॉस्फरसशी संबंधित असतात:

  • मुळांच्या विकासास चालना देणे
  • खोड आणि फांद्यांची शक्ती वाढवणे
  • चांगला फुलोरा आणि बीज उत्पादन
  • पिकाची अधिक समान आणि लवकर परिपक्वता
  • द्विदलांमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण क्षमता वाढवणे
  • पिकाच्या गुणवत्तेत सुधारणा
  • रोपांमधिल रोग प्रतिकार शक्तीत वाढ
  • संपूर्ण जीवनचक्राच्या दरम्यान विकासात मदत

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share