पशूपालनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारने ई-गोपाला अ‍ॅप सुरू केला आहे

शेतकऱ्यांना पशुसंवर्धन प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारकडून अनेक योजना सुरू केल्या जात आहेत. या योजनेत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये मत्स्य उत्पादन, दुग्धशाळा, पशुसंवर्धन आणि शेती संदर्भातील पी.एम. मत्स्य संपदा योजना, ई-गोपाला अ‍ॅप आणि अभ्यास तसेच संशोधन संबंधित अनेक योजना सुरू केल्या आहेत.

याप्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिलेल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, आज या सर्व योजना सुरू करण्यामागील उद्देश म्हणजे, आपल्या गावांना सक्षम बनविणे आणि 21 व्या शतकात स्वावलंबी भारत निर्माण करणे हे हाेय.

ई-गोपाला अ‍ॅपद्वारे पशुधन व्यवस्थापित केले जाईल. या व्यवस्थापनात दर्जेदार प्रजनन सेवांची उपलब्धता आणि जनावरांच्या पोषण आहारासाठी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन, योग्य पशुवैद्यकीय औषधांचा वापर करून जनावरांवर उपचार इत्यादी माहिती उपलब्ध होईल.

स्रोत: किसान समाधान

Share

See all tips >>