कोरोना साथीच्या काळातही मुसळधार पाऊस आणि पुरामुळे देशातील अनेक राज्ये संकटात सापडली आहेत. हवामान खात्याने आगामी काळातही अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उत्तर भारतातील बहुतांश भागांत सतत पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबरोबरच हवामान खात्याने काही भागांसाठी ऑरेंज आणि पिवळ्या रंगाचे अलर्टही जारी केले आहेत.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस उत्तर भारतातील अनेक राज्यांंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हरियाणा, दिल्ली-एन.सी.आर. पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश इत्यादी काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यांंशिवाय मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
स्रोत: पत्रिका
Share