नर्सरीमध्ये मिरचीची पेरणी कशी करावी?

नर्सरीमध्ये मिरची बियाणे पेरताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे. यामुळे नर्सरीमध्ये चांगली रोपे तयार होतात.

  • मिरची लागवड तयार करण्यासाठी प्रथम 3 x 1.25 मीटर आकाराच्या बेडमध्ये (वाफ्यामध्ये) बियांची पेरणी करावी.
  • हे बेड जमिनीपासून 8-10 सेमी उंच असावेत, जेणेकरून पाणी साठल्यामुळे बियाणे आणि वनस्पती खराब होणार नाहीत.
  • 750 ग्रॅम डी.ए.पी.,100 ग्रॅम इन्करील (सीवेईड, अमिनो ॲसिडस्, ह्यूमिक ॲसिड आणि मायकोरिझा) आणि 250 ग्रॅम ट्रायकोडर्मा विरिडी प्रति चौरस मीटर प्रमाणे १५० किलो शेणखतामध्ये मिसळून मातीमध्ये टाकावे, जेणेकरून रोपांची चांगली वाढ होईल आणि मातीची रचना चांगली होईल आणि मातीपासून होणार्‍या हानिकारक बुरशीजन्य आजारांपासून देखील संरक्षण मिळेल.
  • नर्सरीमध्ये एक एकर क्षेत्रासाठी 60-80 ग्राम बियाणे आवश्यक आहे. .
  • बेडमध्ये 5 सें.मी. अंतरावर 0.5-1 सें.मी. खोल नाले बनवून बियाणांची पेरणी करुन घ्या.
  • पेरणीनंतर आवश्यकतेनुसार सिंचन करणे सुरू ठेवा.
Share

See all tips >>