हायवेग सानिया: मिरची हे वाण जीवाणूजन्य मर रोग आणि मोज़ेक विषाणूं ला प्रतिरोधक आहे आणि त्याची प्रथम तोडणी 50-55 दिवसांत केली जाते. ही वाण जास्त तिखट तसेच चमकदार, हिरवे आणि पिवळसर आहे. त्यांच्या फळांची लांबी 13-15 सेंमी, जाडी 1.7 सेमी आणि वजन सुमारे 14 ग्रॅम आहे.
मायको नवतेज (एम.एच.सी.पी- 319): ही पांढरी भुरी आणि दुष्काळ सहन करणारी जात आहे. ही संकरित वाण मध्यम ते उच्च तिखट आहे ज्याची लांब साठवण क्षमता आहे. मिरचीची लांबी 8-10 सें.मी. आहे.
मायको 456: या वाणाची मिरची जास्त तिखट असते आणि फळाची लांबी ८-१० सेंटिमीटर असते.
हायवेग सोनल: मिरचीची लांबी 14 सेमी असते आणि मध्यम तिखटपणा असतो, जी सुक्या मिरचीसाठी चांगली आहे.
सिजेंटा एच.पी.एच -12: यात बियाण्यांचे प्रमाण जास्त आहे आणि तिखटपणा जास्त आहे. त्याची झाडे आणि फांद्या मजबूत असून झुडुपासारखी आहेत.
ननहेम्स US- 1003: फिकट हिरव्या फळांसह मध्यम लांबीची वनस्पती आहे. ज्याचे फळ चांगल्या प्रतीचे आहे.
ननहेम्स US- 720: गडद हिरवी मिरची आहे. जी मध्यम तिखट आहे.
ननहेम्स इन्दु: ही वाण मोज़ेक विषाणू आणि रोगास प्रतिरोधक आहे आणि त्यात
चांगली साठवण क्षमता आहे.
स्टारफिल्ड जिनी: ही वाण विषाणूंपासून सहनशील आहे.
वी.एन.आर चरमी (G-303): ही वाण हलकी हिरवी आहे. मध्यम तिखट आणि मिरचीची लांबी 14 सेमी असून 55-60 दिवसांत त्याची प्रथम तोडणी केली जाते.
स्टारफिल्ड रोमी- 21: व्हायरस सहनशील आणि अधिक उत्पादन देते. लाल मिरचीसाठी उत्तम प्रकार आहे.