शेतामध्ये सोलरपंप बसवण्यासाठी सरकार भाडे देईल, योजनेशी संबंधित असणारे फायदे जाणून घ्या

कृषी क्षेत्रातील विजेचा वाढता वापर पूर्ण करण्यासाठी अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन दिले जात आहे. याअंतर्गत केंद्र सरकार द्वारा देशात कुसुम योजना चालविली जात आहे. याच्या माध्यमातून सोलरपंप बसवण्यासाठी सरकार भाडे देणार आहे. या योजनेचा लाभ शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यात तीन घटकांचा समावेश आहे.

हे तीन घटक खालील प्रमाणे आहेत :

  1. शेतकरी आपल्या जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारून त्यातून मिळणारी वीज सरकारला विकू शकतात.

  2. पिकांना सिंचन करण्यासाठी शेतकरी आपल्या शेतामध्ये सोलर पंप लावू शकतात. 

  3. शेतकरी बंधून पिकांना सिंचन करण्यासाठी आणि वीज विकण्यासाठी सौर पंप देखील लावू शकतात.

या योजनेतील तिन्ही घटकांचा लाभ राजस्थानमधील शेतकऱ्यांना दिला जात आहे. या योजनेअंतर्गत 1 लाख सौरपंप बसविण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. या योजनेच्या प्रक्रियेला पुढे घेऊन जाण्यासाठी लवकरच एक पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. ज्याच्या माध्यमातून इच्छुक शेतकरी त्यांच्या जमिनीची नोंदणी करू शकतात. याच्या मदतीने शेतकरी जीएसस स्थापन करण्यासाठी आपल्या जमिनीला 25 वर्षांपर्यंत लीज भाडेतत्त्वावरती देऊ शकतात.

शेतकरी बांधवांशिवाय विकासकर्तेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत 8 लाख रुपये किमतीच्या जमिनीवर हेक्टरी 80 हजार रुपये वार्षिक लीज भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे, जमीन 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास, 1 लाख 60 हजार प्रति हेक्टर या दराने लीज भाडेतत्त्वावर देण्यात येईल. एवढेच नाही तर लीज भाडेतत्त्वावर दर दोन वर्षांनी 5 टक्के वाढ करण्यात येणार आहे.

स्रोत: किसान समाधान

Share

See all tips >>