चांगली बातमी! सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी अखेर उठवली

केंद्र सरकारने नुकतीच कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याची अधिसूचना प्रसारित केली आहे. ही घोषणा १५ मार्च २०२० पासून लागू होईल.

कांद्याच्या भावांमध्ये वेगाने वाढ झाल्यामुळे सरकारने भाववाढ नियंत्रित करण्यासाठी २९ सप्टेंबर २०१९ ला कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे आणि कांद्याचे भाव स्थिर झाले आहेत. आणि या हंगामात कांद्याचे उत्पादन अधिक चांगले होईल अशी अपेक्षा आहे. यामुळे सरकारने कांदा निर्यातीवरील गेले ५ महिने लागू असलेली बंदी १५ मार्च पासून उठवण्याची घोषणा केली आहे.

डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) यांनी स्वाक्षरी केलेली ही अधिसूचना असे सांगते की,”सर्व प्रकारच्या कांद्यांची निर्यात आता मुक्तपणे करता येईल आणि त्यासाठी किमान निर्यात किंमत किंवा लेटर ऑफ क्रेडिट यांची आवश्यकता असणार नाही.”

हे पाऊल ग्राहक आणि शेतकरी दोघांनाही फायदेशीर ठरेल, कारण त्यामुळे कांद्याच्या किमती कमी होतील आणि ग्राहकांच्या पाकिटावरील ताण कमी होईल. याशिवाय शेतकऱ्यांना त्यांचे कांदे विकण्यासाठी खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल.

Share

See all tips >>