सरकार सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शिक्षण देत आहे: नरेंद्रसिंग तोमर

आपण इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात जगत आहोत. जवळपास प्रत्येक कंपनी किंवा संस्था या प्लॅटफॉर्मचा त्यांच्या ग्राहकांशी जोडण्यासाठी वापर करीत आहेत. त्याच कार्यक्रमात, सरकार देशातील शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत आहे.

कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, सरकार फेसबुक, ट्विटर, यू- ट्यूब इत्यादी व्यासपीठाचा वापर देशभरातील शेतकऱ्यांना शिक्षित करण्यासाठी करीत आहेत. भारतातील शेतीच्या विकासाविषयी बोलताना तोमर म्हणाले की, “सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी सुमारे 100 मोबाईल अ‍ॅप्स तयार केले आहेत. हे ॲप्स आयसीएआर, कृषी विज्ञान केंद्र आणि राज्य कृषी विद्यापीठांनी विकसित केले आहेत.”

हे लक्षात घ्यावे की, मागील चार वर्षांपासून ग्रामोफोन देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे. आमचे कृषी तज्ञ आमच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे आणि विविध सोशल मीडिया द्वारे शेतकऱ्यांना मौल्यवान मार्गदर्शन करतात. त्यांच्या पिकांच्या कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी शेतकरी आमच्या टोल-फ्री क्रमांकावर देखील कॉल करू शकतात.

Share

भारतीय सरकारने वर्ल्ड बँकेकडून कृषी विकासासाठी 80 दशलक्ष डॉलर कर्ज घेतले आहे

भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. याचा अर्थ, शेती सुधारणेमुळे अर्थव्यवस्था देखील मजबूत होईल. म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून सरकारने कृषी क्षेत्रावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरूवात केली आहे. याच वेळी हिमाचल प्रदेश सरकारने राज्याच्या कृषी विकासासाठी जागतीक बँकेबरोबर 80 दशलक्ष डॉलर चा कर्ज करार केला.

ही रक्कम प्रामुख्याने हिमाचल प्रदेशच्या विविध ग्रामपंचायतींमध्ये पाणी व्यवस्थापन पद्धती सुधारण्यासाठी आणि कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी खर्च केली जाईल. माध्यमांच्या वृत्तानुसार, 482 ग्रामपंचायतींचा समावेश असलेल्या राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबविला जाईल. याचा फायदा सुमारे 400,000 लघुधारक शेतकऱ्यांना होईल.

हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी  हा प्रकल्प खूप फायदेशीर ठरेल कारण राज्यातील अनेक सखल भागांमध्ये सिंचनासाठी पुरेसे पाणी नसल्याने ते मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. परंतु पावसात सतत होणारी घट आणि हवामानातील बदल हिमाचल प्रदेश मधील फळ उत्पादनावर उदा. सफरचंद यावर परिणाम करत आहे. केंद्र सरकारच्या शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोहिमेस हातभार लावण्यासही ही पायरी मोठी भूमिका बजावू शकते.

Share

चांगली बातमी! सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी अखेर उठवली

केंद्र सरकारने नुकतीच कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याची अधिसूचना प्रसारित केली आहे. ही घोषणा १५ मार्च २०२० पासून लागू होईल.

कांद्याच्या भावांमध्ये वेगाने वाढ झाल्यामुळे सरकारने भाववाढ नियंत्रित करण्यासाठी २९ सप्टेंबर २०१९ ला कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे आणि कांद्याचे भाव स्थिर झाले आहेत. आणि या हंगामात कांद्याचे उत्पादन अधिक चांगले होईल अशी अपेक्षा आहे. यामुळे सरकारने कांदा निर्यातीवरील गेले ५ महिने लागू असलेली बंदी १५ मार्च पासून उठवण्याची घोषणा केली आहे.

डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) यांनी स्वाक्षरी केलेली ही अधिसूचना असे सांगते की,”सर्व प्रकारच्या कांद्यांची निर्यात आता मुक्तपणे करता येईल आणि त्यासाठी किमान निर्यात किंमत किंवा लेटर ऑफ क्रेडिट यांची आवश्यकता असणार नाही.”

हे पाऊल ग्राहक आणि शेतकरी दोघांनाही फायदेशीर ठरेल, कारण त्यामुळे कांद्याच्या किमती कमी होतील आणि ग्राहकांच्या पाकिटावरील ताण कमी होईल. याशिवाय शेतकऱ्यांना त्यांचे कांदे विकण्यासाठी खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल.

Share

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी – सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली आहे.

Gramophone's onion farmer

शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सरकारने सहा महिन्यापूर्वी ची कांदा निर्यातीवरील बंदी २६ फेब्रुवारी ला उठवली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याच्या पिकासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल आणि त्यांचा अधिक जास्त फायदा होऊ शकेल. विशेषतः कांद्याच्या रब्बी पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे मोठया प्रमाणात भाव पडण्याची बरीच शक्यता आहे त्यामुळे असे पाऊल उचलणे अत्यंत गरजेचे होते.

भावांमध्ये वेगाने वाढ झाल्यामुळे सरकारने सप्टेंबर २०१९ मध्ये कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती हे लक्षात घेणे आवश्यक आहे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे आणि कांद्याचे भाव स्थिर झाले आहे. त्याव्यतिरिक्त यावर्षी देशात कांद्याचे च्या उत्पादनात वेगाने वाढ झाली आहे. यामुळे अन्नमंत्री श्री रामविलास पासवान यांनी कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्याची घोषणा केली आहे.

Share