पंतप्रधान मोदी यांनी मालकी योजनेअंतर्गत 6 राज्यांतील 763 गावांत 1 लाख लोकांच्या घरांच्या मालमत्ता कार्डांचे वितरण (प्रॉपर्टी कार्ड) केले आहे. या अंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व लाभार्थ्यांना संदेशाद्वारे एक लिंक पाठविण्यात आली होती. ज्याद्वारे लाभार्थ्यांनी त्यांचे मालकी कार्ड ऑनलाइन डाउनलोड केले आहे.
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, “मालकी योजना ही खेड्यात राहणा-या आपल्या बंधू-भगिनींना स्वावलंबी बनविण्यात खूप मदत करणार आहे.” पी.एम. मोदी पुढे म्हणाले की, “जगातील तज्ज्ञांचा आग्रह आहे की, देशाच्या विकासात जमीन आणि घराच्या मालकीची मोठी भूमिका आहे.”
विशेष म्हणजे, नवीन तंत्रज्ञानाद्वारे प्रथमच इतके मोठे पाऊल उचलले जात आहे. या योजनेचा सर्वात मोठा फायदा ग्रामस्थांना बँकेची कर्ज घेताना होईल. असे म्हटले जात आहे की, सरकारच्या या हालचालीमुळे ग्रामस्थांना कर्ज घेण्याची आणि इतर आर्थिक लाभासाठी मालमत्ता, इतर आर्थिक मालमत्ता म्हणून वापरण्याचा मार्ग मोकळा होईल.
स्रोत: कृषी जागरण
Share