कांद्याच्या वाढत्या किंमतींना आळा घालण्यासाठी काही आठवड्यांपूर्वी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. आता याच भागात सरकारने पुढील आदेश होईपर्यंत कांद्याच्या बियांंच्या निर्यातीवरही बंदी घातली आहे. देशात कांद्याची उपलब्धता कायम राखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाची माहिती परराष्ट्र व्यापार संचालनालयाने दिली आहे. संचालनालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, कांदा बियाणे निर्यातीस बंदी घातलेल्या प्रकारात ठेवले आहे, पूर्वी ते प्रतिबंधित प्रकारात होते. याचाच अर्थ कांदा बियाणे निर्यातीवर आता पूर्णपणे बंदी घातली आहे.
स्रोत: कृषी जागरण
Share