सोयाबीनच्या पिकातील तणावर नियंत्रण
- यांत्रिक पद्धत (कामगारांकडून निंदणी आणि कुदळणी):- सोयाबीनमध्ये 20-25 दिवसांनी आणि 40 -45 दिवसांनी अशी दोन वेळा निंदणी करणे आवश्यक असते. शक्यतो पेरणीनंतर 30 दिवसांनी कुदळणी करावी. कुदळणी करताना रोपांच्या मुळांना हानी होणार नाही अशी खबरदारी घ्यावी.
- तणनाशक रसायनांचा वापर:- शिफारस केलेल्या तणनाशकाचे 700 -800 लीटर पाण्यात मिश्रण करून त्याची फवारणी करावी. त्यासाठी फवारणी यंत्रात फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल लावून त्याचा उपयोग करावा. फवारणी ओलसर जमिनीवरच करावी. सोयाबीनच्या पिकासाठी शिफारस केलेल्या तणनाशकापैकी एखाद्याचाच वापर करावा आणि दरवर्षी रसायन बदलून वापरावे.
सोयाबीनच्या पिकासाठी शिफारस करण्यात आलेली तणनाशके
वापरासाठी योग्य वेळ | रासायनिक नाव | मात्रा/ हे |
पेरणीपुरवी | 1 फ्लुक्लोरालीन | 2.2 लीटर |
2 ट्राईफ्लुरालीन | 2.0 लीटर | |
पेरणीनंतर लगेचच | 1 मेटालोक्लोर | 2 लीटर |
2 क्लोमाझोन | 2 लीटर | |
3 पेंडीमेथालीन | 3.25 लीटर | |
4 डाक्लोरोसुलन | 26 ग्रॅम | |
पेरणीनंतर 10-15 दिवसांनी | 1 क्लोरोम्युरान इथाइल | 36 ग्रॅम |
पेरणीनंतर 15-20 दिवसांनी | 1 इमेझेथापर | 1 लीटर |
2 क्बिज़ेलोफाप इथाइल | 1 लीटर | |
3 फेनाक्सीफ्रोप इथाइल | 0.75 लीटर | |
4 प्रोपाक्विजाफोप | 0.75 लीटर |
source:- https://iisrindore.icar.gov.in/
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share