Land Preparation for Watermelon Cultivation

कलिंगडाच्या शेतीसाठी शेताची मशागत:-

  • कलिंगडाची शेती सर्व प्रकारच्या मातीत करता येते पण हलकी, रेताड आणि सुपीक लोम माती त्यासाठी उत्तम असते.
  • मातीत कार्बनिक पदार्थ असणे महत्वपूर्ण असते. त्याच्या पूर्तीसाठी हिरवे खत, कम्पोस्ट, गांडूळ खत इत्यादि पेरणीच्या वेळी मिसळावे.
  • शेताची चांगली मशागत करण्यासाठी आधी खोल नांगरणी करून नंतर वखर फिरवून जमीन भुसभुशीत करावी.
  • दक्षिणेच्या दिशेने थोडा उतार ठेवावा.
  • शेतातील गवत, तणसड्या वगैरेची साफसफाई करावी.
  • लेव्हलर वापरुन शेत सपाट करावे आणि 2 मी. अंतरावर सर्‍या पाडाव्यात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Soil Preparation and Sowing Time for Wheat

गव्हाच्या पिकासाठी शेताची मशागत आणि पेरणीसाठी सुयोग्य वेळ:-

  • उन्हाळ्यात नांगरणी करावी.
  • तीन वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी.
  • 2 -3 वेळा कल्टिव्हेटर वापरुन शेताला सपाट करावे.
  • पेरणीसाठी सुयोग्य वेळ
  • असिंचित:- ऑक्टोबर महिन्याचा मध्य ते नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा
  • अर्धसिंचित:- नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा
  • सिंचित (वेळेवर):- नोव्हेंबर महिन्याचा दुसरा पंधरवडा
  • सिंचित (उशिरा):- डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Soil and its preparation in Garlic

लसूणच्या पिकासाठी योग्य माती आणि शेताची मशागत

माती आणि शेताची मशागत: – लसूण वेगवेगळ्या प्रकारच्या मातीत लावता येतो. परंतु रेताड दमट, चिकणी दमट आणि दाट भुरभुरीत माती लसूनच्या पिकासाठी सर्वात उपयुक्त असते. 5-6 वेळा नांगरट करून जमीन तयार केले जाते. कमाल पीएच श्रेणी 5.8 आणि 6.5 या दरम्यान असावी. पीएच पातळी राखण्यासाठी प्रति हेक्टर 50 किलोग्रॅम जिप्सम वापरावे. (मातीच्या पीएच पातळीनुसार) शेत अशा प्रकारे तयार करावे की जास्तीतजास्त पाण्याचा सहजपणे निचरा होईल आणि शेत तणमुक्त राहील. शेवटच्या नांगरणीपूर्वी 15-20 टन उत्तम प्रतीचे शेणखत द्यावे.

Share

Ideal soil and its preparation for growing Onion

कांद्याच्या पिकासाठी योग्य जमीन आणि तिची मशागत:-

कांद्याचे पीक वेगवेगळ्या प्रकारच्या मातीत घेता येते पण रेताड दमट, चिकणी दमट आणि डाट भुरभुरीत माती कांद्याच्या पिकासाठी सर्वोत्तम असते.

5-6 वेळा नांगरणी करून जमिनीची मशागत केली जाते.

जास्तीतजास्त पीएच घटक 5.8 आणि 6.5 यादरम्यान असावेत. पीएच स्तर राखण्यासाठी हेक्टरी 50 किलोग्रॅम जिप्सम वापरावे. (मातीतील पीएच स्तरानुसार)

जमिनीची मशागत करताना जास्तीतजास्त पाण्याचा निचरा कसा होईल आणि जमीन तणमुक्त कशी राहील हे पहावे.

शेवटच्या नांगरणीपूर्वी 15-20 टन उत्तम प्रतीचे शेणखत द्यावे.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share