रायझोबियम कल्चरने बीज प्रक्रिया कशी करावी

  • 1 लिटर पाण्यात 250 ग्रॅम गूळ घाला आणि सुमारे 15 मिनिटे गरम करा आणि एकत्र मिसळा.
  • द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये 3 पॅकेट (600 ग्रॅम) रायझोबियम कल्चर घाला आणि लाकडी दांड्याने हळू हलवा.
  • हे द्रावण हळूहळू बियाण्यावर शिंपडा, जेणेकरून द्रावणाचे थर सर्व बियाण्यांना चिकटले जावे. हे 10 किलो बियाण्यांसाठी पुरेसे आहे.
  • आपल्या हातात हातमोजे घाला आणि बिया चांगल्या मिसळून त्यास अंधुक ठिकाणी सुकवा आणि बिया एकत्र चिकटत नाहीत याची खात्री करा.
  • उपचार केलेेले बियाणे लवकरच पेरावे.
Share

हवामानासोबत ताळमेळ ठेवणं अत्यंत गरजेचे आहे 

बंगालच्या उपसागरात झालेल्या चक्रीवादळामुळे मध्य भारतात अधिक पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, अतिवृष्टीसह देशातील अनेक भागात गारपिटीची शक्यता आहे. आजही पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि येत्या 2 तासांत उत्तर छत्तीसगड सह मध्य प्रदेशातील पूर्व आणि मध्य भागांमध्ये वादळ व गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यांसह सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि दक्षिण किनारी तमिळनाडूमध्ये विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या हंगामातील बदल लक्षात घेता, कृषी संबंधित अनेक कामे करता येतील-

  • शेतातील बांध व्यवस्थापित करा जेणेकरून शेतात पाणी जास्त काळ थांबू नये.
  • कापणीच्या वेळी शेतात काही उघडे ठेवू नका, खोली, कोठार किंवा पावसाचे पाणी न येणार्‍या ठिकाणी ठेवा.
  • आभाळ स्वच्छ झाल्यावर हरभरा, मसूर आणि गव्हाला तिरपे किंवा प्लास्टिकच्या चादरीवर ठेवा आणि 2 ते 3 दिवस कोरडे ठेवा, म्हणजे धान्यातील ओलावा 12% पेक्षा कमी होईल व नंतर साठवा.
  • बियाण्याला कीड, बुरशी व तनापासून वाचवण्यासाठी बीज साठवणुकीपूर्वी त्यातील दगड, माती, पाने तसेच तणांचे बीज वेगळे करून टाका आणि उन्हात दोन ते तीन दिवस वाळवून ८-१०% ओलावा असताना साठवणूक करावी. 
  • बियाणे साठवण्यापूर्वी बुरशीनाशकासह बीजोपचार करणे आवश्यक आहे, ज्यामुळे बियाण्यांमुळे होणार्‍या आजारावर स्वस्त आणि प्रभावी नियंत्रण मिळवता येते. बियाण्यांवरील उपचारासाठी थायरम किंवा कॅप्टान औषधाची मात्रा 3 ग्रॅम किंवा कार्बॉक्सिन 2 ग्रॅम प्रति किलो दराने दिली पाहिजे.
  • हवामानातील बदल लक्षात घेता, अनेक रोग आणि कीटक पिकांवर आक्रमण करू शकतात, कारण हे वातावरण त्यांच्यासाठी योग्य आहे.
  • उन्हाळ्यात भोपळ्याचा भाजीपाला लाल बीटल किडीचा हल्ला होण्याची शक्यता आहे, जर या किडीची संख्या जास्त असेल तर प्रति लिटर पाण्यात 1 ग्रॅम डाइक्लोराेवोस 76 ईसी फवारणी करावी.
  • पांढर्‍या माशी, मावा, तुडतुडे  इत्यादी रस शोषक कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रति लिटर पाण्यात डायमेथोएट 30 ईसी 1-1.5 मिली फवारणी करावी.
  • कांद्यामध्ये थ्रीप्स (टीला) ची उच्च शक्यता आहे, म्हणून प्रोफेनोफॉस 50 ईसी 45 मिली किंवा लॅम्बडा सायलोथ्रिन 4.9% से. 20 मिली किंवा स्पिनोसॅड 10 मि.ली. किंवा फिप्रोनिल 5 एस.सी. 15 लिटर पाण्याच्या दराने फवारणी करावी.
  • रासायनिक औषधांसोबत या वातावरणात चिपको ०.५ मिली प्रति १५ मीटर पाण्यात मिसळून फवारणी करा जेणेकरून औषध पिकांमध्ये शोषले जाईल. 
  •  उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी. खोल नांगरणी केल्यास जमिनीतील हवेची हालचाल सुधारते, ज्यामुळे जमिनीत पाणी साठवण्याची क्षमता वाढते आणि हानिकारक कीटक आणि बुरशीजन्य बीजाणू नष्ट होतात.
Share

मूंग समृद्धि किटमध्ये असलेल्या उत्पादनांची उपयुक्तता 

ग्रामोफोनचा या अष्टपैलू मूंग समृद्धि किट मध्ये खालील उत्पादन आहे.

  • इनक्रिलः हे उत्पादन सीविड, अमीनो ॲसिडसारख्या नैसर्गिकरित्या उपलब्ध घटकांचे संयोजन आहे. मुळांची आणि प्रकाश संश्लेषणाची वाढ करुन पिकाची वाढ सुधारते.
  • ट्रायको शिल्ड कॉम्बॅटः या उत्पादनामध्ये ट्रायकोडर्मा विरिडी आहे, जो मातीत आढळणार्‍या सर्वात हानिकारक बुरशीपासून बचाव करण्यास सक्षम आहे. यामुळे मूळ सड, मर रोग यासारख्या आजारांपासून वाचवले आहे.
  • कॉम्बिमेक्सः हे उत्पादन दोन वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्मजीवांचे मिश्रण आहे, जे पोटॅश आणि फॉस्फरसची उपलब्धता वाढविण्यात मदत करते, मूग पिकासाठी आवश्यक घटक आणि पिकाचे उत्पादन वाढविण्यात मदत करते.
  • जय वाटीका राईझोबियम: हे बॅक्टरीया द्विदल पिकांच्या मुळात गाठी बनवतात ज्यामुळे वातावरणात उपलब्ध नायट्रोजन पिकांना उपलब्ध होतो. 
Share

ग्रामोफोन मूग समृद्धि किट सह मुगाची प्रगत लागवड

  • मूग समृद्धि किटमध्ये समाविष्ट असलेली सर्व उत्पादने, सेंद्रिय असल्याने पर्यावरणाला हानी न येता मातीची रचना सुधारित करतात.
  • हे किट मातीत अस्तित्त्वात असलेल्या फायदेशीर जिवाणूंची संख्या आणि वनस्पतींच्या पोषक तत्त्वांची उपलब्धता वाढवून कार्य करतात.
  • मूग समृद्धी किट बुरशीचा नाश तसेच मुळांचा विकास इत्यादी महत्वपूर्ण कामात मदत करते. 
  • हे किट पिकात येणाऱ्या मूळ सड, मर रोग, सारख्या रोगांपासून रक्षण करतात. 
  • हे किट मुळांमध्ये राइझोबियम वाढवून नायट्रोजन फिक्सेशन वाढवते.
Share

जमीन व बियाण्यांचा उपचार करून उन्हाळी मुगाचे उत्पादन वाढवा.

 

मुगाच्या पिकासाठी शेती प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी जमीन उपचार आवश्यक आहे. त्याद्वारे, जमिनीत हानीकारक कीटक आणि बुरशी नष्ट होऊ शकते.

भूमीवर उपचार: 6-8 टन चांगल्या कुजलेल्या शेणखतात 4 किलो कंपोस्टिंग बॅक्टेरिया आणि 1 किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी मिसळून एक एकर शेतात पसरवा.

मुगाच्या चांगल्या उत्पादनासाठी बीजोपचार करणे फायदेशीर आहे. हे हानिकारक बुरशी आणि शोषक कीटकांपासून संरक्षण करते.

बियाणे उपचारः  मुगाच्या बियाण्यांमध्ये (1) 2.5 ग्रॅम कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37.5% डीएस किंवा 5-10 ग्रॅम ट्रायकोडर्मा विरिडी/ स्यूडोमोनास फ्लोरेसेंस आणि 5 मिली इमिडाक्लोप्रिड 48 एफएस प्रति किलो बियाण्यासह बीजोपचार करणे.

Share

ग्रामोफोन यांनी मुगाच्या पिकासाठी जमीन तयार करण्यासाठी मूग समृद्धी किट आणले आहे.

  • या किटमध्ये मुगाचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक समाविष्ट केलेले आहेत.
  • मुग समृद्धी किट मध्ये अनेक प्रकारचे फायदेशीर जिवाणू असतात.
  • या जिवाणू मध्ये पोटॅश आणि फॉस्फरस जीवाणू, ट्रायकोडर्मा व्हिरीडी, ह्युमिक ऍसिड आणि रायझोबियम जिवाणू हे प्रमुख आहेत.
  • हे किट सर्व प्रकारच्या सूक्ष्म जीवांचे मिश्रण करून बनवले जाते.
  • या किटचे एकूण वजन सहा किलो आहे ते एक एकर जमिनीसाठी उपयुक्त आहे.
Share

Seed Treatment of Chickpea (Gram)

हरबऱ्याचे बीजसंस्करण

  • मूळ कूज, खोड कूज, बूड कूज अशा बुरशीजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी हरबऱ्याची पेरणी करण्यापूर्वी कार्बोक्सिन5% + थायरम 37.5% किंवा कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% 2 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात वापरून बीजसंस्करण करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed and Nursery Bed Treatment in Onion

कांद्याच्या पिकासाठी बीजसंस्करण आणि वाफ्यांचा उपचार

  • पेरणीपुर्वी थायरम 37.5% + कार्बोक्सिन 37.5% @ 2 ग्रॅम/ किलो बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे. त्याने गलन रोगापासून बचाव होतो. नर्सरीच्या मातीचा कार्बेन्डाजिम 12% + मॅन्कोझेब 63% @ 40 ग्रॅम/ पम्प वापरुन उपचार करावा. पेरणीपुर्वी 15-20 दिवस वाफ्यात सिंचन करून सौरीकरण करण्यासाठी त्यांना 250 गेजच्या पारदर्शी पॉलीथीनने झाकावे.  हा उपाय गलन रोगाच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed treatment of Potato

बटाट्याचे बीजसंस्करण

बटाटा हे कंदाचे पीक आहे. त्यात बियाणे आणि मातीद्वारे फैलावणारे वेगवेगळे बुरशीजन्य रोग होतात.

बटाट्याचे बीजसंस्करण कसे करावे:- कार्बोक्सीन 37. 5 % + थायरम 37. 5 % @ 200 ग्रॅम/ 6 लीटर पाणी प्रती 1 एकर जमिनीत पेरण्याच्या बियाण्यासाठी किंवा थायोफनेट मिथाइल 45% + पाइरक्लोस्ट्रोबिन 5% एफएस @ 800 मिली/16 लीटर पाणी 40 क्विंटल बियाण्यासाठी वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

seed treatment in soybean

सोयाबीनचे बीजसंस्करण

पेरणीपुर्वी सोयाबीनचे बियाणे कार्बाक्सिन 37.5% + थायरम 37.5 WP 250 ग्रॅम प्रति क्विंटल बियाणे किंवा कार्बेन्डाजिम 12 % + मॅन्कोझेब 63% WP 250 ग्रॅम प्रति क्विंटल बियाणे किंवा थायोफिनेट मिथाईल 45%+ पायराक्लोस्ट्रोबीन 5% FS 200 मिली प्रति क्विंटल बियाणे वापरुन संस्कारित करावे.  त्यानंतर कीटकनाशक ईमिडाक्लोरप्रिड 30.5% SC 100 मिली प्रति क्विंटल बियाणे किंवा थायमेथोक्साम 30% FS 250 मिली प्रति क्विंटल बियाणे वापरुन संस्करण केल्यास रस शोषक किडिपासून 30 दिवसांपर्यंत संरक्षण मिळते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share