Control of cowpea pod borer

चवळीच्या शेंगा पोखरणार्‍या अळीचे नियंत्रण

  • या अळ्या शेंगात भोक पाडून आतील बिया खातात.
  • फुले आणि शेंगा नसल्यास त्या पाने खातात.
  • खोल नांगरणी करून जमिनीतील किडीचा कोश अवस्थेत नायनाट करता येतो. त्याशिवाय पीक चक्र अवलंबून किडीचे नियंत्रण करणे शक्य असते.
  • प्रतिरोधक/सहनशील वाणे पेरावीत.
  • 3 फुट लांब दांड्या हेक्टरी 10 या प्रमाणात पक्षांना बसण्यासाठी रोवाव्यात.
  • क्लोरपायरीफोस 20% ईसी 450 मिली/एकर किंवा इंडोक्साकार्ब 14.5% एससी @ 160-200 मिली/एकरचे पाण्यात मिश्रण बनवून फवारावे.
  • इमामेक्टिन बेंझोएट 5% एसजी @ 100 ग्रॅम/ एकर चे पाण्यात मिश्रण बनवून फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of pod borer in moong

मुगाच्या शेंगा पोखरणार्‍या अळीचे नियंत्रण

  • अळ्या मोठ्या होतात तेव्हा त्या शेंगामधील बिया खाऊन हानी करतात.
  • शेंगा पोखरणार्‍या अळीच्या संक्रमणामुळे शेंगा वेळेपूर्वी वाळून गळतात.
  • पेरणीपुर्वी शेतात खोल नांगरणी करून मातीतील किड्यांची अंडी आणि कोशांचा नायनाट करावा.
  • पेरणीसाठी मुगाची लवकर परिपक्व होणारी वाणे वापरावीत.
  • मुगाच्या रोपांमध्ये निश्चित अंतर ठेवावे.
  • क्लोरपायरीफॉस 20% ई.सी.450 मिली/एकर किंवा इंडोक्साकार्ब 14.5% एस.सी. @ 160-200 मिली/एकर पाण्यात मिसळून फवारावे.
  • इमामेक्टिन बेंझोएट 5% एस.जी. @ 100 ग्रॅम/एकर पाण्यात मिसळून फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of pod borer in Gram(Chickpea)

 

हरबर्‍यातील घाटे पोखरणार्‍या अळीचे नियंत्रण:-

घाटे पोखरणारी अळी ही कुप्रसिद्ध कीड पिकाला भारी नुकसान पोहोचवते. घाटे पोखरणार्‍या अळीमुळे उत्पादनात 21% हानी होते. या किडीमुळे हरबर्‍याचे सुमारे 50 ते 60% नुकसान होते. हरबर्‍याशिवाय ही कीड तूर, मटार, सूर्यफूल, कापूस, मिरची, ज्वारी, शेंगदाणा, टोमॅटो आणि इतर पिकांनाही ग्रासते. ही डाळी आणि गळिताच्या धान्यावरील विनाशकारी कीड आहे.

संक्रमण:-

किडीची सुरुवात सहसा अंकुरणांनंतर एका पंधरवड्याने होते. फुलोरा येण्याच्या वेळी ढगाळ आणि दमट हवामानात तिचे स्वरूप गंभीर होते. मादी अनेक लहान पांढरी अंडी घालते. 3-4 दिवसात त्यातून अळ्या निघतात. त्या कोवळा पाला खातात आणि त्यानंतर घाट्यांवर हल्ला करतात. एक पूर्ण विकसित अळी सुमारे 34 मिमी लांब, हिरव्या ते राखाडी रंगाची असते. ती मातीत जाऊन कोश बनवते. या किडीचे जीवनचक्र सुमारे 30-45 दिवसात पूर्ण होते. एका वर्षात किडीच्या आठ पिढ्या होतात.

नियंत्रण:-

उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी. त्यामुळे जमिनीत लपलेले किडे नैसर्गिक शत्रू खातील.  0.5%  जिगरी आणि 0.1% बोरिक अॅसिडबरोबर HaNVP 100 LE प्रति एकर अंडी घालण्याच्या वेळी फवारावे आणि 15-20 दिवसांनी पुन्हा फवारणी करावी. रसायनांच्या वापरात 2.00 मिलीलीटर प्रोफेनोफोस 50 ईसी प्रति लीटर पाण्यात अंडीनाशक म्हणून फवारावे. हेक्टरी 4-5 फेरोमेन ट्रॅप वापरावेत. सुरुवातीच्या अवस्थेत निंबोणीच्या फळांचे सत्व 5% फवारावे. हल्ला तीव्र असल्यास इंडोक्साकार्ब 14.5% SC 0.5 मिली किंवा स्पिनोसेड 45% SC 0.1 मिली किंवा 2.5 मिली क्लोरोपाईरीफास 20 EC प्रति ली. पाण्यातून फवारावे.  पक्षी बसण्यासाठी 4-5 जागा बनावाव्यात आणि पिकाच्या सर्व बाजूंनी भेंडी आणि झेंडूचे सुरक्षा पीक लावावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Gram pod borer in Soybean

सोयाबीनच्या पिकावरील हरबर्‍याची शेंग पोखरणार्‍या अळीचे नियंत्रण:-

हानीची लक्षणे: –

  • लार्वा कोवळ्या पानातील क्लोरोफिल खातात.
  • ते सुरूवातीस पानातून अन्न मिळवतात आणि नंतर फुले आणि फळांमधून अन्न मिळवतात.

नियंत्रण:-

  • उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी.
  • हेक्टरी 5 फेरोमॉन ट्रॅप बसवावेत.
  • क्लोरोपायरीफोस 20% ईसी @750 मिली/एकर आणि क्विनालफॉस 25% ईसी @ 250 मिली/एकर फवारावे. किंवा
  • डेल्टामैथ्रिन 2.8% ईसी @ 250 मिली/एकर आणि फ्लुबेंडीयामाइड 20% डब्लू जी @ 100 ग्रॅम/एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Pea Pod Borer

मटारवरील शेग पोखरणारी कीड:- या किडीची अळी फुलांच्या पाकळ्या आणि देठ खाते. एक अळी अनेक फुलांच्या देतांना हानी पोहोचवते. सुरुवातीत अळी पाने खाते आणि नंतर देठांच्या मूळात भोक पाडून शेंगेत शिरते आणि शेंग आतून खाते.

प्रतिबंध:- उन्हाळ्यात खोल नांगरणी करा. त्यामुळे जमिनीत लपलेल्या किड्यांना नैसर्गिक शिकारी खाऊन टाकतील. पिकाचा चहुबाजुने सुरक्षा पीक म्हणून टोमॅटो लावा. मका, चवळी आणि वांगी या आंतरपिकांमुळे किड्यांची संख्या कमी करण्यास मदत होते. शेतात पक्षी बसवावेत. 0.5%  जिगरी आणि 0.1% बोरिक अॅसिड बरोबर HaNVP 100 LE प्रति एकर या मात्रेत अंडी उबवण्याच्या वेळी फवारावे आणि 15-20 दिवसांनी दुबार फवारणी करावी. रसायनांच्या वापरात 2.00 मिलीलीटर प्रोपेनोफॉस 50 ईसी प्रति लीटर पाणी अंडींनाशकाच्या स्वरुपात वापरावे. 4-5 फेरोमेन ट्रॅप प्रती हेक्टर वापरावे. सुरुवातीच्या काळात निंबोणी बी कर्नाल 5% फवारावे. लागण तीव्र असल्यास इंडोक्साकार्ब 14.5% SC 0.5 मिली किंवा स्पिनोसेड 45% SC 0.1 मिली किंवा 2.5 मिली क्लोरोपाईरीफास 20 EC प्रति ली. पाण्याचा शिडकावा करावा.

Share