कांद्याचे कंद फुटण्याची शारीरिक विकृती – निदान आणि कारणे

  • कांद्याच्या शेतातील असमान सिंचनामुळे ही विकृती उद्भवण्याची शक्यता वाढते.
  • शेतात अतिरिक्त सिंचन केल्यानंतर माती पूर्णपणे कोरडी होऊ दिली आणि त्यानंतर पुन्हा प्रमाणाबाहेर सिंचन केल्यास कंद फुटण्याचे प्रमाण वाढते.
  • कंद फुटणे अनेकदा कंदातील किडीशी संबंधित असते.
  • कंद तळाच्या बाजूने सडणे हे या रोगाचे पहिले आढळून येणारे लक्षण असते.
  • कंदाच्या तळाच्या बाजूने फुटलेल्या भागातून अनेक लहान दुय्यम कंद वाढलेले अनेकदा आढळून येतात.
Share

लसूण आणि कांद्याच्या पिकातील कोळ्यांचे नियंत्रण

लसूण आणि कांद्याच्या पिकातील कोळ्यांचे नियंत्रण:-

  • वाढ झालेले आणि शिशु किडे कोवळी पाने आणि पाकळ्यांमधून रोपाचा रस शोषतात. पाने पूर्ण उमलत नाहीत. रोप खुरटलेले, तिरके, वाकडे होते आणि त्यावर पिवळे डाग पडतात.
  • बहुसंख्य पानांच्या कडांवर डाग आढळून येतात.
  • कोळयांच्या प्रभावी नियंत्रणासाठी विरघळणारे सल्फर 80% चे 3 ग्रॅम प्रति लीटर या प्रमाणात पाण्यातील मिश्रण फवारावे.
  • हल्ला तीव्र असल्यास प्रोपरजाईट 57% 400 मिली. प्रति एकर 7 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

कांद्याला चीर पडणे या वैगुण्याचे नियंत्रण

  • एकसमान सिंचन आणि खत घालण्याच्या पद्धतीचे पालन करून कंद फाटणे रोखता येते.
  • कंद सावकाश वाढणाऱ्या जातींची लागवड करून या वैगुण्याला आळा घालता येतो.
Share

कांद्याला चीर पडणे (शारीरिक वैगुण्य) कारणे

  • कांद्याच्या शेतातील असमान सिंचनामुळे या वैगुण्याचे प्रमाण वाढते.
  • अतिसिंचित शेते पूर्ण कोरडी झाल्यावर त्यांच्यात पुन्हा अतिरिक्त सिंचन केल्यास कंद फाटतात.
  • कंदावरील कीड अनेकदा कंद फाटण्याशी संबंधित असते.
  • सुरुवातीची लक्षणे कंदाच्या बुडाशी आढळून येतात. .
Share

Symptoms of Stemphylium Blight in Onion

स्टेमफिलियम अंगक्षय:- 

  • पानांच्या मध्यभागी आणि फुलांच्या देठांवर पिवळसर ते नारिंगी गेरवा रंगाचे लहान ठिपके उमटतात.   
  • त्यानंतर पानांच्या मध्यभागी गुलाबी रंगाच्या कडा असलेले लंबाकृती डाग पडतात.   
  • फुलोऱ्याच्या देठावरील रोगामुळे बीजपिकाची मोठी हानी होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

control measures of cutworms in onion

कांद्यावरील कातरकिड्याचे नियंत्रण

  • पेरणी करताना मातीत कार्बोफ्यूरान @ 7.5 किलो/एकर या प्रमाणात मिसळा.
  • क्लोरोपायरीफॉस 20% ईसी @ 500 मिली/एकर फवारा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Cutworms in onion

  • लहान अळ्या पिवळसर राखाडी रंगाच्या असतात आणि नंतर त्या तपकिरी रंगाच्या, बुळबुळीत, स्पर्श करताच गुंडाळी करून घेणार्‍या होतात. 
  • कातरकिडयाचे पतंग गडद राखाडी-करड्या रंगाचे असतात आणि त्यांच्या पंखांवर वेगवेगळ्या आकाराचे ठिपके असतात. 
  • ते रात्रीच्या वेळी जमिनीलगत कांद्याची बीजरोपे कुरतडतात आणि दिवसा लपून बसतात.   
  • लहान अळ्या कांद्याच्या पर्णसंभारावर अधाशीपणे चरतात. पण नंतर त्या वेगळ्या होऊन मातीत शिरतात. 
  • पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Control of Eriophyid mite in Garlic and Onion

लसूण आणि कांद्याच्या पिकातील कोळी (एरिओफाइड) किडीचे नियंत्रण

  • शिशु आणि वाढ झालेले किडे कोवळी पाने आणि कळ्यांच्या मधून रस शोषतात. पाने पूर्ण विकसित होत नाहीत. संपूर्ण रोप लहान, वाकडे होते आणि त्याच्यावर पिवळे डाग पडतात.
  • पानांच्या कडांवर जास्त डाग दिसतात.
  • किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी विरघळणारे सल्फर 80% चे 3 ग्रॅम प्रति लीटर या प्रमाणात मिश्रण बनवून फवारा.
  • हल्ला तीव्र असल्यास प्रॉपरझाईट 57% 400 मिली. प्रति एकर या प्रमाणात 7 दिवसांच्या अंतराने दोनदा फवारा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Stem and bulb nematode in Onion and Garlic

कांदा आणि लसूण पिकाच्या खोड आणि कंदातील सूत्रकृमी

ही कीड रंध्रांमधील आणि रोपाला झालेल्या व्रणांमधून आत प्रवेश करते आणि रोपांमध्ये गाठी किंवा कुवृद्धि निर्माण करते. या गाठी किंवा वाढ बुरशी आणि जीवाणु (बॅक्टरीया) सारख्या माध्यमिक रोगप्रसारकांच्या प्रवेशासाठी दारे उघडते. वाढ खुंटणे, कंद रंगहीन होणे आणि सुजणे ही त्याची लक्षणे आहेत.

नियंत्रण:- ·

  • रोगाची लक्षणे दर्शवणाऱ्या कंदांचा वापर बियाणे म्हणून करू नये.
  • शेतात आणि उपकरणात स्वच्छता राखणे आवश्यक असते कारण ही कीड संक्रमित रोपे आणि त्यांच्या अवशेषांमध्ये जिवंत राहते आणि पुन्हा उत्पन्न होते.
  • किडीच्या नियंत्रणासाठी कार्बोफ्यूरोन 3% दाणेदार @ 10 किग्रॅ/ एकर या प्रमाणात मातीतून द्यावे.
  • किडीच्या जैविक नियंत्रणासाठी लिंबाचे वाटण @ 200 किग्रॅ/ एकर या प्रमाणात मातीतून द्यावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Downy Mildew in Onions

कांद्यावरील केवळा रोगाचा प्रतिबंध:-

लक्षणे:-

  • पाने आणि फुलाच्या गेंदावर जांभळी बुरशी वाढते आणि ती नंतर फिकट हिरव्या रंगाची होते.
  • पाने आणि फुलांचे गेंद शेवटी गळून पडतात.
  • हा रोग अधिक ओल, उर्वरकांचा प्रमाणाहून अधिक वापर आणि थेट सिंचनामुळे होतो.

प्रतिबंध:- 

  • बियाण्यासाठी वापरलेल्या कांद्याच्या कंदांना 12 दिवस सूर्यप्रकाशात ठेवल्याने बुरशी नष्ट होते.
  • मॅन्कोझेब + मेटालेक्ज़ील किंवा कार्बेंडाजीम+ मॅन्कोझेब @ 400 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात मात्रा दर 15 दिवसांनी फवारावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share