Qualities of selected Maize Variety

मक्याच्या निवडक वाणांची वैशिष्ठ्ये

 

क्रमांक . वाणाचे नाव बियाण्याचे प्रमाण रोपातील दूरी पेरणीची खोली पेरणीची वेळ दाण्यांचा रंग अधिक माहिती
1 ADV 759 8 किलो/ एकर 60 सेमी x 22.5 सेमी (ओळ x रोप) 4-5 सेमी खरीप -115-120 दिवस, रब्बी -125-135 दिवस अधिक उगवणक्षमता, समान लांबीची कणसे, टोकापर्यंत भरतात आणि मोठे दाणे, ओळींची संख्या 14, पावसावर अवलंबून भागासाठी उपयुक्त
2 PAC 751 एलीट 60 x 30-45 सेमी (ओळ x रोप) 4-5 सेमी. खरीप -115-120 दिवस, रब्बी -125-135 दिवस नारिंगी पिवळा पावसावर अवलंबून भागासाठी उपयुक्त, समान आकाराचे लहान नारिंगी पिवळे दाणे, उच्च शेलिंग टक्केवारी  (85%)। 18-20 ओळी, रोपाची ऊंची 5.5-6.5 फुट (मध्यम), उत्पादन – 30 क्विंटल/ एकर, रुंद पाने,  कणसे परिपक्व झाल्यावर देखील रोपे हिरवी रहातात त्यामुळे चार्‍यासाठी उपयुक्त.
3 6240 सिनजेंटा 5 किग्रा / एकड़ 60 x 30-45 सेमी (ओळ x रोप) 4-5 सेमी खरीप आणि जायद (80-85 दिवस) नारिंगी पिवळा चार्‍यासाठी उपयुक्ता वाण, अधिक उगवण, दाणे टोकापर्यंत भरतात, सेमी-डेंट प्रकारचे दाणे,  रोपे परिपक्व झाल्यावर देखील हिरवी राहतात. जवळपास सगळ्या जागांसाठी अनुकूल. चांगले उत्पादन, अंकुर आणि मूळ कुजव्या रोगासाठी आणि तांबेर्‍यासाठी प्रतिकारक्षमता असलेले वाण.

 

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fertilizer Management in Maize leads to more yield

मक्यातील उपयुक्त उर्वरक व्यवस्थापनाने भरघोस उत्पादन

  • मक्याच्या भरघोस उत्पादनासाठी उर्वरकांच्या संतुलित मात्रा वापराव्यात.
  • मक्याचे पीक घेण्यापूर्वी शेतात 8-10 टन/ एकर या प्रमाणात शेणखत मिसळावे.
  • पेरणीच्या वेळी यूरिया @ 65 किलो/ एकर + डीएपी @ 35 किलो/ एकर + एमओपी @ 35 किलो/ एकर + कार्बोफ्यूरान @ 5 किलो/ एकर या प्रमाणात मात्रा जमिनीतून द्याव्यात.
  • पेरणीनंतर 15-20 दिवसांनी मॅग्नेशियम सल्फेट @ 10 किलो/ एकर + झिंक सल्फेट @ 10 किलो/ एकर + झियोरायझा @ 8 किलो/ एकर या प्रमाणात द्यावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Blight in Maize

मक्याच्या पिकातील अंगक्षय रोगाचे नियंत्रण

मक्यातील अंगक्षय हा बुरशीजन्य रोग पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये होतो. त्याची लक्षणे पानांवर आणि कणसावर आढळून येतात. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये पानांवर लांबूळक्या आकाराचे डाग पडतात. हे डाग मोठे होत जातात आणि त्यांचा रंग फिकट राखाडी असतो.

  • पीक चक्र अवलंबल्याने पिकाच्या अवशेषातील रोगाचे नियंत्रण करता येते.
  • शेतात खोल नांगरणी करून देखील रोगाचे नियंत्रण करता येते.
  • उत्पादनाच्या हानीला आळा घालण्यासाठी बुरशीनाशक फवारावे.
  • मॅन्कोझेब 75% WP 400 ग्रॅम किंवा मेटालेक्ज़ील 35% WS 150 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control strategies of Maize Stem Borer

मक्यातील खोड पोखरणार्‍या किडीचे नियंत्रण

  • ही मक्याच्या पिकावरील प्रमुख आणि सर्वाधिक हानी करणारी कीड आहे.
  • खोड पोखरणार्‍या किडीची अळी मक्याच्या खोडात शिरून भोक पाडते.
  • ही अळी खोडात शिरून उती खाते. त्यामुळे रोपांना पाणी आणि आहार मिळत नाही. रोपे हळूहळू पिवळी पडून सुकतात आणि मरतात.

नियंत्रण: –

  • पिकाच्या पेरणीनंतर 15 -20 दिवसांनी फ़ोरेट 10%जी 4 किलो/एकर या प्रमाणात किंवा फिप्रोनिल 0.3% जी 5 किलो/एकर या प्रमाणात 50 किलो मातीत मिसळून पसरावे सिंचन करावे.
  • दाणेदार कीटकनाशक वापरलेले नसल्यास पुढीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी:-
  • पेरणीनंतर 20 दिवसांनी बायफेंथ्रीन 10% EC 200 मिली प्रति एकर या प्रमाणात वापरावे.
  • किंवा पेरणीनंतर 20 दिवसांनी फिप्रोनिल 5% SC 500 मिली प्रति एकर या प्रमाणात वापरावे.
  • करटाप हाईड्रो क्लोराईड 50% SP 400 ग्रॅम/एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of fall armyworm in Maize

मक्याच्या पिकावर झुंडीने हल्ला करणार्‍या लष्करी अळीचे नियंत्रण:-

हानी:-

  • की कीड सामान्यता पाने खाते. तीव्र हल्ला झाल्यास ती मक्याची कणसे देखील कुरतडते.
  • किडीने ग्रासलेल्या रोपाची वरील बाजूची पाने फाटतात आणि पाने आणि देठांच्या जोडाजवळ दमट भुस्सा साचलेला आढळून येतो.
  • ही कीड कणीस खाण्यास वरील बाजूने सुरुवात करते.

नियंत्रण :-

  • लाईट ट्रॅप लावावेत.
  • मादीचा गंध असलेले फेरोमान ट्रॅप एकरात 5 या प्रमाणात लावावेत.
  • अळी आढळताच पुढीलपैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी:-
  • एमामेक्टीन बेंजोएट 5% SG @ 100 ग्रॅम प्रति एकर
  • फिप्रोनिल 5% SC @ 400 मिली प्रति एकर
  • क्लोरोपाइरीफॉस 50% EC @ 400 मिली प्रति एकर

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Basal Dose of Fertilizer and Manure for Maize

मक्याच्या पिकासाठी खते आणि उर्वरकांची मूलभूत मात्रा:-

  • उर्वरके मृदा परीक्षण अहवालानुसार द्यावीत.
  • उत्तम प्रतीच्या शेणखत 10 टन प्रति एकर या मात्रेत शेवटच्या नांगरणीच्या वेळी मिसळावे.
  • मृदा परिक्षण अहवाल उपलब्ध नसल्यास पेरणीच्या वेळी डीएपी 50 किलो आणि पोटाश 35 किलो प्रति एकर अशी मात्रा द्यावी.
  • उर्वरकाची मूलभूत मात्र माती, वाण आणि इतर घटकानुसार बदलू शकते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Weed Management Of Maize

मक्यातील तणाचे नियंत्रण:-

  • 1.0-1.5 किग्रॅ. एट्राजीन 50% डब्लू.पी. 500 लीटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी अंकुर फुटण्यापूर्वी वापरल्यास तण नष्ट होते.
  • किंवा एलाक्लोर 50% ई.सी. 4 ते 5 लीटर 500 लीटर पाण्यात मिसळून पेरणीपुर्वी 48 तास वापरुन तणाची वाढ रोखता येते.
  • पेरणीनंतर 20-25 दिवसांनी 2,4-D @ 1 किग्रॅ /हे  चे 500 लीटर पाण्यात मिश्रण करून ते फ्लॅट पॅन नोझलने फवारावे.
  • तणनाशक वापरताना मातीत पुरेशी ओल असणे आवश्यक आहे.
  • तणनाशक वापरल्यानंतर मातीत बदल करू नयेत.
  • द्विदल पिकाचे आंतरपीक घेतलेले असल्यास एट्राजीन वापरू नये. त्याऐवजी पेंडीमेथलीन @ 0.75 किग्रॅ/हे पेरणीनंतर 3-5 दिवसात अंकुर फुटण्यापूर्वी वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share