भोपळा वर्गातील पिकांमध्ये डाउनी बुरशी रोगाची ओळख आणि प्रतिबंधात्मक उपाय

    • रोगाचा परिचय : भोपळा वर्गीय पिके जसे की, कारले, लौकी, भोपळा, तुरई, कलिंगड, खरबूज, काकडी, गिल्की इत्यादींची गंभीर समस्या आहे. जो स्यूडोपेरोनोस्पोरा क्यूबेंसिस नावाच्या बुरशीमुळे होतो. एकदा प्रादुर्भाव झाला की, रोग वेगाने पसरतो, फळांच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावर विपरित परिणाम होतो.

    • रोगाची लक्षणे : जुन्या पानांवर लहान पिवळे ठिपके किंवा पाण्याने भिजलेल्या जखमा या रोगाची लक्षणे प्रथम दिसतात. पानाच्या खालच्या पृष्ठभागावर पांढऱ्या रंगाचे बुरशीचे आवरण दिसते. वातावरणात दीर्घकाळ आर्द्रता जास्त असल्याने रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो.

    • रोग प्रतिबंधक :

  • जैविक नियंत्रण : (मोनास कर्ब)स्यूडोमोनास फ्लोरेसेंस) 500 ग्रॅम प्रति एकर दराने फवारणी करता येते.

  • रासायनिक नियंत्रण : (कस्टोडिया )एज़ोक्सिस्ट्रोबिन 11% + टेबुकोनाज़ोल 18.3% एससी 300 मिली (संचार) मेटलैक्सिल 8% + मैनकोज़ेब 64% डब्ल्यूपी 500 ग्रॅम प्रती एकर दराने फवारणी करावी.

Share

पांढरी भुरी आणि तांबडी भुरीची लक्षणे आणि व्यवस्थापन

Powdery mildew and downy mildew symptoms and management
  • पांढरी भुरी आणि तांबडी भुरी दोन्ही सहसा केवळ पानांवरच परिणाम करतात. ते पानांच्या खालच्या आणि वरच्या भागांवर हल्ला करतात.
  • तांबडी भुरी (प्लाझमोपारा विटिकोला) बर्‍याच वनस्पतींवर परिणाम करते आणि जुन्या पानांच्या खालच्या पृष्ठभागावर पिवळसर ते पांढरे ठिपके दिसतात. खालील भागात, हा भाग पांढरा किंवा तपकिरी रंगाचा दिसताे. 
  • पांढरी भुरी अनेक वनस्पतींवर परिणाम करतात आणि जुन्या पानांच्या वरच्या पृष्ठभागावर पिवळसर व पांढरे डाग दिसतात.
  • या व्यवस्थापनासाठी, अझेस्ट्रोबिन 11% + टेब्यूकोनाझोल 18.3% एस.सी.300 मिली / एकर किंवा अझेस्ट्रोबिन 300 मिली / एकर किंवा टेबुकोनाझोल 10% + सल्फर 65% डब्ल्यू.जी. 500 ग्रॅम / एकर दराने फवारणी केली जाते.
  • जैविक उपचार म्हणून ट्रायकोडर्मा विरिडी 250 ग्रॅम / एकर + स्यूडोमोनस फ्लूरोसेन्स 250 ग्रॅम / एकर फवारणी करावी.
Share

कलिंगड पिकावरील बुरशीजन्य तांबडी भुरी किंवा केवडा रोगाचे व्यवस्थापन.

  • परिणाम झालेली पाने खुडून नष्ट करणे.
  • रोगाला प्रतिकार करू शकणाऱ्या या वाणाचे बियाणे लावणे.
  • आलटून पालटून पिके घेणे आणि स्वच्छता राखणे यामुळे रोगाची तीव्रता कमी होते.
  • जमीन थायोफानेट मिथाईल ७०% WP या द्रव्याने 300  ग्रॅम प्रति एकर या दराने भिजवणे
  • मेटलक्सिल % आणि मॅन्कोझेब ६४% WP यांनी ५०० ग्रॅम प्रति एकर या दराने फवारणी करावी.
  • प्रति एकर ५०० ग्रॅम सुडोमोनास फ्लोरसन्स फवारावे.
Share

कलिंगड पिकावरील बुरशीजन्य केवडा किंवा तांबडी भुरी रोग कसा ओळखावा

  • पानाच्या पातळ भागावर खालच्या बाजूला पाण्याने भरलेल्या जखमां सारखे घाव दिसून येतात.
  • वरच्या पृष्ठभागावर पाण्याने भरलेल्या घावांसारखेच को असलेले टोकदार डाग दिसून येतात.
  • हे घाव सुरुवातीला जून पानांवर दिसतात आणि मग हळूहळू कोवळ्या पानांवर ही दिसू लागतात.
  • हे घाव वाढतात से सुरुवातीला त्यांचा रंग पिवळा दिसतो किंवा मग सुकून  ते पिंगट तपकिरी होतात.
  • परिणाम झालेल्या वेलांना फळे व्यवस्थित येत नाहीत.
Share

भोपळ्याच्या पिकावरील केवडा रोगावर कोणते उपाय करावेत

pumpkin crop
  • रोग झालेली पाने खुडून नष्ट करावीत.
  • रोगाला प्रतिबंध करणाऱ्या वाणाच्या बियांचे रोपण करावे.
  • आळीपाळीने पिके घेणे आणि स्वच्छता ठेवणे या उपायांनी रोगाची तीव्रता कमी होते.
  •  थायोफ़ॅनेट मिथाईल ७०% WP एकरी ३०० ग्रॅम फवारावे.
  • मेटलक्सिल ८% + मॅंकोझेब ६४% WP एकरी ५०० ग्रॅम फवारावे.
Share

भोपळ्याच्या पिकावरील केवडा (तांबडी भुरी) रोग कसा ओळखावा

भोपळ्यावरील केवडा किंवा तांबडी भुरी रोगाची प्रमुख लक्षणे पुढील प्रमाणे हेत.

  • पानांच्या खालच्या पृष्ठभागावर पाण्याने भिजलेले घाव दिसतात.
  • घाव आधी जुन्या पानांवर दिसतात आणि नंतर कोवळ्या पानांवर पसरत जातात.
  • घाव जसजसे पसरतात तसे पिवळे राहतात किंवा सुके आणि तपकिरी होतात.
  • परिणाम झालेल्या वेलींना व्यवस्थित फल धारणा होत नाही.
Share

Management of Downy Mildew in Onions

कांद्यावरील केवळा रोगाचा प्रतिबंध:-

लक्षणे:-

  • पाने आणि फुलाच्या गेंदावर जांभळी बुरशी वाढते आणि ती नंतर फिकट हिरव्या रंगाची होते.
  • पाने आणि फुलांचे गेंद शेवटी गळून पडतात.
  • हा रोग अधिक ओल, उर्वरकांचा प्रमाणाहून अधिक वापर आणि थेट सिंचनामुळे होतो.

प्रतिबंध:- 

  • बियाण्यासाठी वापरलेल्या कांद्याच्या कंदांना 12 दिवस सूर्यप्रकाशात ठेवल्याने बुरशी नष्ट होते.
  • मॅन्कोझेब + मेटालेक्ज़ील किंवा कार्बेंडाजीम+ मॅन्कोझेब @ 400 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात मात्रा दर 15 दिवसांनी फवारावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to Control Downy Mildew in Cauliflower

फुलकोबीवरील अंगक्षयाचे (डाउनी मिल्ड्यू) नियंत्रण

  • मातीच्या पृष्ठभागावर अधिक ओलावा राहणार नाही अशी दक्षता घेत योग्य प्रकारे पाणी व्यवस्थापन करावे.
  • साफ (कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी) @ 300-400 ग्रॅम/ एकर किंवा
  • रीडोमिल गोल्ड (मेटलॅक्सिल-एम 4% + मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी) @ 300-400 ग्रॅम/ एकर किंवा
  • अमीस्टार (अ‍ॅझोक्सिस्ट्रोबिन 23% एससी)@ 200 मिली/ एकरकिंवा
  • नेटिवो (टॅबुकोनाझोल 50% + ट्रायफ्लोक्सिरोबिन 25% डब्ल्यूजी) @ 120 ग्रॅम/ एकर फवारता येते.
  • पीकचक्र अवलंबावे आणि शेतात स्वच्छता ठेवावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to Control Downy Mildew in Cauliflower

  • योग्य पाण्याचे व्यवस्थापन जेणेकरून मातीच्या पृष्ठभागावर जास्त आर्द्रता नाही राहणार.
  • साफ (कार्बेन्डाझिम १२% + मँकोझेब% 63% डब्ल्यूपी) @ ३००-४०० ग्राम / एकर किंवा
  • रीडोमिल गोल्ड (मेटालॅक्सिल 4% + मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी) @ 300-400 ग्राम / एकर.
  • एमिस्टर ( ऐझोक्सीस्ट्रॉबिन 23% एससी) @ 200 मिली / एकर.
  • नेटिव्हो (टेबुकोनाझोल ५०% + ट्रायफ्लॉक्सीस्ट्रॉबिन २५% डब्ल्यूजी) ची फवारणी @ १२० ग्राम/एकर.
  • पीक चक्र च अनुसरण करा आणि शेत स्वच्छ ठेवा.

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन लाईक करा आणि इतर शेतकरी बरोबर सामायिक करा

Share

What’re the Symptoms of Downy Mildew in Cauliflower

  • देठ गडद तपकिरी, दबलेले डाग दर्शवितो ज्यात नंतर बुरशी ची वाढ होते.
  • पानां च्या खालचे भागावर जाम्भळे -तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात आणि त्यानंतर त्या ठिपक्यांवर बुरशी विकसित होते.
  • यामुळे कोबी च्या वरच्या भागाला नुकसान होते आणि तो सडून जातो.

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन लाईक करा आणि इतर शेतकरी बरोबर सामायिक करा

Share