- कांद्याच्या शेतातील असमान सिंचनामुळे ही विकृती उद्भवण्याची शक्यता वाढते.
- शेतात अतिरिक्त सिंचन केल्यानंतर माती पूर्णपणे कोरडी होऊ दिली आणि त्यानंतर पुन्हा प्रमाणाबाहेर सिंचन केल्यास कंद फुटण्याचे प्रमाण वाढते.
- कंद फुटणे अनेकदा कंदातील किडीशी संबंधित असते.
- कंद तळाच्या बाजूने सडणे हे या रोगाचे पहिले आढळून येणारे लक्षण असते.
- कंदाच्या तळाच्या बाजूने फुटलेल्या भागातून अनेक लहान दुय्यम कंद वाढलेले अनेकदा आढळून येतात.
अर्ज सुलभ करण्यासाठी खालील पावले उचलली आहेत
- एक साधा एक पानाचा अर्ज तयार केला गेला आहे जेणेकरून पीएम किसान अंतर्गत बँकेच्या रेकॉर्डमधून मूलभूत माहिती मिळविली जाईल आणि पेरणी केलेल्या पिकाच्या तपशीलांसह जमीन नोंदवहीची फक्त एक प्रत आवश्यक असेल.
- फॉर्म संपूर्ण भारतभरातील सर्व आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीसह उपलब्ध असेल आणि तो लाभार्थी कापून भरु शकतो.
- आपण सर्व अनुसूचित वाणिज्य बँकांच्या वेबसाइटवर, कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या संकेतस्थळ- www.agricoop.gov.in आणि पंतप्रधान-किसन www.pmkisan.gov.in या संकेतस्थळावरुनही हा फॉर्म डाउनलोड करू शकता.
- सामान्य सेवा केंद्रांना फॉर्म भरण्यास व तो संबंधित बँकेकडे पाठविण्यास परवानगी देण्यात आली आहे.
14 कोटी शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी! आता त्यांना पंतप्रधान-किसान पेआऊटसह अतिरिक्त लाभ मिळतील
-
शेतकर्यांना वार्षिक ६००० रुपये मिळू शकतात.
-
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकरी किसान क्रेडिट कार्ड सहज मिळवू शकतात.
-
4% व्याज दरावर 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवा
-
पात्र शेतकरी त्यांची संमती घेतल्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (पीएमएसबीवाय) आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (पीएमजेजेबीवाय) चा लाभ घेऊ शकतात
-
या दोन्ही योजना अपघात विमा तसेच जीवन विमा अनुक्रमे १२ रुपये आणि ३३० रुपयांच्या प्रीमियमवर देतात, प्रत्येक बाबतीत दोन लाख रुपयांच्या विम्याच्या किंमतीसाठी
सिंचनाचा वापर करून कलिंगडाचे उत्पादन कसे वाढवावे
- कलिंगड सिंचनाला उत्तम प्रतिसाद देते पण त्याला पाणी साचलेले सोसत नाही.
- हे सर्वसाधारण उन्हाळी पीक असून त्यासाठी सिंचनाची वारंवारिता महत्वाची असते.
- पिकाला 3-5 दिवसांनी सिंचन करावे.
- फुलोऱ्यापूर्वी, फुलोऱ्याच्या वेळी आणि फळाच्या विकासाच्या अवस्थेत मातीतील आद्रतेच्या अभावाने आलेल्या ताणाने उत्पादन लक्षणीयरीत्या घटते.
- परिपक्वतेच्या वेळी सिंचन थांबवावे अन्यथा फळांची गुणवत्ता घसरते आणि फळे तडकण्याचे प्रमाण वाढते.
कलिंगडाचे काही महत्वाचे वाण
अनु. क्र. | वाणाचे नाव | फळाचा आकार | फळाचे वजन (किग्रॅ) | कालावधी
(दिवस) |
फळाचा रंग |
1. | सागर किंग | अंडाकार | 3-5 | 60 – 70 | गडद काळी साल आणि लाल गर |
2. | सागर किंग प्लस | अंडाकार | 3-5 | 60 – 70 | गडद काळी साल आणि लाल गर |
2. | काजल | अंडाकार | 3- 3.5 | 60 – 70 | गडद हिरवी साल आणि गुलाबी गर |
4. | 2208 | अंडाकार | 2-4 | 70 – 80 | गडद काळी साल आणि लाल गर |
कलिंगडाच्या लागवडीसाठी जमिनीची मशागत
- कलिंगडाची लागवड अनेक प्रकारच्या मातीत करता येते पण त्यासाठी हलकी, रेताड, पाण्याचा सहज निचरा होणारी सुपीक लोम माती उत्तम असते.
- पेरणीपूर्वी मातीत भरपूर प्रमाणात कंपोस्ट खत मिसळावे आणि उत्तम मिसळावे.
- खोलवर नांगरणी करून आणि कुदळणी करून आणि इतर रोपांचा कचरा काढून शेत नीट तयार करावे.
- दक्षिणेच्या बाजूला किंचित उतार ठेवणे उत्तम.
- शेतातील माती नीट पालटून आणि समपातळीत आणून 2 मीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात.
कलिंगड पेरणीसाठी योग्य वेळ
- नोव्हेंबर ते मार्च हा काळ कलिंगडाच्या पेरणीसाठी उत्तम असतो.
- नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात पेरणी केल्यावर रोपाला गोठण्यापासून संरक्षण द्यावे लागते. त्यामुळे बहुतेक पेरणी जानेवारी ते मार्च या काळात केली जाते.
- डोंगराळ भागात कलिंगडाची पेरणी मार्च ते एप्रिलमध्ये केली जाते.
मोहरीवरील रंगीत भुंग्यांचे नियंत्रण
- खोल नांगरणीने रंगीत भुंग्यांची अंडी नष्ट होतात
- हल्ला टाळण्यासाठी लवकर पेरणी करणे आवश्यक असते
- हल्ल्याची तीव्रता कमी करण्यासाठी पेरणीनंतर चार आठवडे पिकाला सिंचन करावे
- थियामेथोक्साम 25 % डब्ल्यूपी (एव्हिडन्ट/ अरेव्हा) @ 300 ग्रॅ/ एकर फवारावे किंवा
- एसफेट 75% एसपी (एसमेन) फवारावे किंवा
- बायफेनथरीन (क्लीनटॉप/ मार्कर) @ 300 मिली/ एकर फवारावे
मोहरीवरील रंगीत भुंग्याचे निदान
- किडा काळ्या रंगाचा असून त्याच्यावर लाल आणि पिवळ्या रेषा असतात
- हल्ल्यामुळे कोवळी रोपे कोमेजतात आणि मरतात
- अळ्या आणि वाढ झालेले किडे पानांमधून आणि कोवळ्या देठांमधून रस शोषतात. त्याने वाढ खुंटते आणि पाने फिकट पिवळी पडतात.
- नंतरच्या अवस्थेत किडे शेंगांमधून रस शोषतात. त्याने बियांच्या संख्या आणि गुणवत्तेवर परिणाम होतो.
टोमॅटो पिकातील कॅल्शियम कमी वर उपाययोजना
- मुख्य शेतात पुनर्रोपण करण्यापूर्वी 15 दिवस आधी जैविक खत घालावे.
- पुनर्रोपणाच्या वेळी कॅल्शियम नायट्रेट @ 10 किग्रॅ/ एकर द्यावे.
- अभावाची लक्षणे दिसण्याच्या वेळी कॅल्शियम ईडीटीए @ 150 ग्रॅ/ एकर च्या दोन फवारण्या कराव्यात.