सिंचनाचा वापर करून कलिंगडाचे उत्पादन कसे वाढवावे

  • कलिंगड सिंचनाला उत्तम प्रतिसाद देते पण त्याला पाणी साचलेले सोसत नाही.
  • हे सर्वसाधारण उन्हाळी पीक असून त्यासाठी सिंचनाची वारंवारिता महत्वाची असते. 
  • पिकाला 3-5 दिवसांनी सिंचन करावे.
  • फुलोऱ्यापूर्वी, फुलोऱ्याच्या वेळी आणि फळाच्या विकासाच्या अवस्थेत मातीतील आद्रतेच्या अभावाने आलेल्या ताणाने उत्पादन लक्षणीयरीत्या घटते. 
  • परिपक्वतेच्या वेळी सिंचन थांबवावे अन्यथा फळांची गुणवत्ता घसरते आणि फळे तडकण्याचे प्रमाण वाढते.
Share

See all tips >>