किसानों के लिए राहत

शेतकर्‍यांना दिलासा

माननीय मुख्यमंत्री श्री शिवराज जी चौहान यांनी किसान महासम्मेलनात घोषणा केली आहे की सरकार गहू आणि तांदळाच्या समर्थन मूल्याबरोबर 200 रु. प्रति क्विंटल एवढा बोनस शेतकर्‍यांना देईल. हवामानामुळे झालेल्या हानीपोटी विमा रकमेवरोबर मदतीची रक्कम देखील देण्यात येईल असेही ते म्हणाले.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Subsidy on Agricultural Machinery and Equipments Part-2

शेतीविषयक यंत्रसामग्री आणि उपकरणांसाठी अनुदान भाग-2 :-

शेतीविषयक यंत्राचे नाव जास्तीतजास्त देण्यायोग्य अनुदान (एससी, एसटी, लघु आणि सीमान्त शेतकरी, महिला इत्यादींसाठी) जास्तीतजास्त देण्यायोग्य अनुदान (इतरांसाठी)
जमिनीचा विकास, नांगरणी आणि बियाण्यांच्या वाफ्याच्या तयारीसाठी उपकरणे
एमबी नांगर, तवा नांगर, कल्टीव्हेटर, वखर/कुळव, लेव्हलर ब्लेड, केज व्हील ,फेर्रो ओपनर, रिजर, वीड स्लॅशर, लेज़र लॅंड लेव्हलर, रिव्हर्सिबल मेकॅनिकल नांगर 1) 20 BHP हून कमी 15000/- रु. 2) 20-35 BHP 19000/- रु. 1). 20 BHP हून कमी 12000/- रु.2.) 20-35 BHP 15000/- रु.
रोटोव्हेटर, रोटोपॅडलर, रिव्हर्सिबल हाईड्रोलिक नांगर 1) 20 BHP हून कमी 35000/- रु. 2) 20-35 BHP 44000/- रु. 1.) 20 BHP हून कमी 28000/- रु. 2.) 20-35 BHP 35000/- रु.
 डिझेल नांगर 1) 20 BHP हून कमी 8000/- रु. 2) 20-35 BHP 10000/- रु. -1) 20 BHP हून कमी 6000/- रु. 2) 20-35 BHP 8000/- रु.
पेरणी, पुनर्रोपण, कापणी आणि खोदाईची उपकरणे
झीरो टिल सीड कम फ़र्टिलायझर ड्रिल, रेज्ड बेड प्लान्टर, सीड ड्रील, पोटॅटो डिगर, ट्रॅक्टर चलित रिपर, कांदा हार्वेस्टर, पोस्ट होल डिगर, पोटॅटो प्लान्टर, ग्राऊंडनट डिगर, स्ट्रिप टिल ड्रिल, राईस स्ट्रॉ चॉपर, ऊस कटर /स्ट्रिपर/ प्लॅन्टर, मल्टी क्रॉप प्लॅन्टर,  झीरो टिल मल्टी क्रॉप प्लॅन्टर, रिज फेर्रो प्लॅन्टर 1)      20 BHP से कम 15000/- रु. 2)      20-35 BHP 19000/- रु. 1). 20 BHP से कम 12000/- रु.2.) 20-35 BHP 15000/- रु.
टर्बो सीडर मेंयुमेट्रिक, मेंयुमेट्रिक व्हेजिटेबल ट्रान्सप्लॅन्टर, मेंयुमेट्रिक व्हेजिटेबल सीडर, हॅप्पी सीडर, अक्वा फर्टि सीड ड्रील, रेज्ड बेड प्लॅन्टर, मल्चर प्लास्टिक मल्च लेईंग मशीन, बीजसंस्करण ड्रम, सीड कम फ़र्टिलायझर ड्रिल 1)  20 BHP हून कमी 35000/- रु. 2)  20-35 BHP 44000/- रु. 1) 20 BHP हून कमी 28000/- रु.2) 20-35 BHP 35000/- रु.
आंतर सांस्कृतिक उपकरणे
ग्रास/ वीड /स्लॅशर, रिप्पर स्ट्रॉ चॉपर, 1) 20 BHP हून कमी 15000/- रु. 2) 20-35 BHP 19000/- रु. 1) 20 BHP हून कमी 12000/- रु. 2.) 20-35 BHP 15000/- रु.
पॉवर वीडर(इंजिन चलित ) 1)  2 HP हून कमी 15000/- रु. 2)  2 HP हून जास्त 19000/- रु. 1) 2 HP हून कमी 15000/- रु. 2.) 2 HP हून जास्त 19000/- रु.
कापणी आणि मळणीची उपकरणे (3 HP हून कमी क्षमतेचे इंजिन/ इलेक्ट्रिक मोटर आणि 20 BHP हून कमी क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारा संचालित)
शेंगदाणा शेंग स्ट्रिपर, थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर, साळ थ्रेशर, चाफ कटर, ब्रुश कटर, विन्नोविंग फॅन रु. 20,000/-

 

रु. 16,000/-
कापणी आणि मळणीची उपकरणे (3-5 HP हून कमी क्षमतेचे इंजिन/ इलेक्ट्रिक मोटर आणि 20-35 BHP हून कमी क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारा संचालित)
रिपर, मोवर, मेझ शेलर, स्पायरल ग्रेडर, इनफील्डर, मोवर शरेड्डर चाफ कटर रु. 20,000/- ते 25,000/- रु. 16,000/- ते 20,000/-
कचरा/ भुस्सा व्यवस्थापन/ हे आणि फोरेज व्यवस्थापन
ऊस थ्रश कटर, नारळ फ्रोंड चॉपर, हे रॅक, ब्लॉसर (गोल), ब्लॉसर (आयताकार), वुड चिपर्स, ऊस रॅटून मॅनेजर, कपास स्टॉक अपरूटर, स्ट्रॉ रिपर 1) 2 HP हून कमी 15000/- रु. 2)      2 HP हून जास्त 19000/- रु. 1) 2 HP हून कमी 15000/- रु. 2) 2 HP हून जास्त 19000/- रु.

अधिक माहितीसाठी उद्यानिकी विभाग/कृषि विभाग  येथे वरिष्ठ फळबाग विकास अधिकारी/ वरिष्ठ कृषि विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.

http://mpkrishi.mp.gov.in/hindisite/suvidhaye.aspx

http://www.mphorticulture.gov.in/schemes.php

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Subsidy on Agricultural Machinery and Equipments Part-1

शेतीविषयक यंत्रे आणि उपकरणांसाठी अनुदान भाग-1:-

शेतीविषयक यंत्राचे नाव जास्तीतजास्त देण्यायोग्य अनुदान (एससी, एसटी, लघु आणि सीमान्त शेतकरी, महिला इत्यादींसाठी) जास्तीतजास्त देण्यायोग्य अनुदान (इतरांसाठी)
ट्रॅक्टर
08 ते 20 HP 1 लाख रु 75,000/- रु.
20 ते 70 HP 1.25 लाख रु 1 लाख रु.
पॉवर टिल्लर
8 BHP हून कमी 50,000/- रु. 40,000/- रु.
8 BHP हून अधिक 75,000/- रु. 60,000/- रु.
राईस ट्रांसप्लान्टर
सेल्फ प्रोपेल्ड राईस ट्रांसप्लान्टर (4 ओळी) 94,000/- रु. 75,000/-
सेल्फ प्रोपेल्ड राईस ट्रांसप्लान्टर (4-8 ओळीहून अधिक ) सेल्फ प्रोपेल्ड राईस ट्रांसप्लान्टर (8-16 ओळींहुन अधिक ) 2 लाख रु. 2 लाख रु.
सेल्फ प्रोपेल्ड मशीनरी
रिपर-कम-बाइंडर 1.25 लाख रु. 1 लाख रु.
ऑटोमॅटिक यूरिया ब्रिकेटिंग डीप प्लेसमेंट/ यूरिया अॅप्लिकेशन मशीन 63,000/- रु. 50,000/-
खास सेल्फ प्रोपेल्ड मशीनरी
रिपर आणि पोस्ट होल डिगर/ औगर आणि न्यूमॅटिक / इतर प्लान्टर 63,000/- रु. 50,000/- रु.
सेल्फ प्रोपेल्ड बागकाम मशीनरी
फ्रूट प्लकर्स, ट्री प्रुनर्स, फ्रूट हार्वेस्टर, फ्रूट ग्रेडर्स, ट्रॅक ट्रॉलि, नर्सरी मीडिया फिलिंग मशीन, मल्टीपरपज हायड्रॉलिक सिस्टम, पॉवर ऑपरेटेड हॉर्टिकल्चर टूल्स फॉर प्रूनिंग, बन्डिंग, ग्रेडिंग, शेयरिंग इत्यादि 1.25 लाख रु. 1 लाख रु.

 

अधिक माहितीसाठी उद्यान विभाग/कृषि विभाग येथे वरिष्ठ फळबाग विकास अधिकारी/ वरिष्ठ कृषि विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.

http://mpkrishi.mp.gov.in/hindisite/suvidhaye.aspx

http://www.mphorticulture.gov.in/schemes.php

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Subsidy on Pomegranate cultivation

डाळिंब क्षेत्र विस्तार:- योजनेअंतर्गत डाळिंबाच्या टिश्यु कल्चर रोपांची लागवड आणि ड्रीप इरीगेशन यासाठी प्रति हेक्टर निर्धारित एकक रु. 1.50 लाख खर्चाच्या 50% अनुदानापोटी रुपये 0.75 लाख एवढी रक्कम देण्यासाठी तरतूद आहे. अनुदान 3 वर्षात 60:20:20 या प्रमाणात पहिल्या वर्षी क्रमश: रु. 45 हजार आणि दुसर्‍या आणि तिसर्‍या वर्षी रोपे जगल्यास रक्षणापोटी अनुक्रमे 15-15 हजार 80% देय आहेत. शेतकर्‍यामागे किमान 0.5 हेक्टर ते कमाल 5.00 हेक्टर एवढ्या क्षेत्रात लागवडीची पात्रता आहे. ही योजना सर्व जिल्ह्यात लागू आहे. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी आणि वरिष्ठ उद्यान विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

http://www.mphorticulture.gov.in/schemes.php

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Subsidy on Medicinal and Aromatic Crops

औषधी आणि सुगंधित वनस्पतींच्या शेतीसाठी अनुदान

औषधी आणि सुगंधित पीक क्षेत्र विस्तार योजना:- या योजनेअंतर्गत शेतकर्‍यास स्वेच्छेने शेतास अनुकूल औषधी आणि सुगंधित पिकाखालील क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी पिकानुसार 20 ते 75% पर्यन्त अनुदान मिळू शकते. प्रत्येक शेतकर्‍यास योजनेअन्तर्गत 0.25 हेक्टर पासून 2 हेक्टर पर्यन्त लाभ देण्याची तरतूद आहे. पिकानुसार अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणे:-

क्र. पिकाचे नाव अनुदानाची रक्कम (रूपयात)
1. आवळा 13,000/-
2. अश्वगंधा 5,000/-
3. बेल 20,000
4. कोलियस 8,600/-
5. गुडमार 5000/-
6. कालमेघ 5000/-
7. श्वेत मुसली 62,500/-
8. सर्पगंधा 31,250/-
9. शतावरी 12,500/-
10. तुळस 6,000/-

अर्ज करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी आणि वरिष्ठ उद्यान विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

http://www.mphorticulture.gov.in/schemes.php

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Subsidy on Horticultural Machinery

फळबागेच्या यंत्रांसाठी अनुदान

फळबागांच्या विकासासाठी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देण्याची योजना:- जे शेतकरी फळबागेसाठी आधुनिक यंत्रे वापरू इच्छितात त्यांना अशा यंत्रांच्या एकाकी खर्चाच्या 50% किंवा खालीलप्रमाणे कमाल अनुदान देण्यात येते –

क्र. फळबागेची मशीनरी अनुदानाची कमाल रक्कम
1 पोटॅटो प्लान्टर/डीगरसाठी 30000.00
2 लसूण/कांदा प्लान्टर/डीगरसाठी 30000/-
3 ट्रॅक्टर माऊंटेड ऐगेब्लास्टर स्प्रेयरसाठी 75,000/-
4 पॉवर ऑपरेटेड प्रुनिग मशीनसाठी 20000/-
5 फॉगिंग मशीनसाठी 10000/-
6 मल्च लेइंग मशीनसाठी 30000/-
7 पॉवर टिलरसाठी 75,000
8 पॉवर वीडरसाठी 50,000/-
9 ट्रॅक्टर विथ रोटाव्हेटरसाठी 1,50,000/-
10 कांदा/लसूण मार्करसाठी 500/-
11 पोस्ट होल डीगरसाठी 50,000/-
12 ट्री प्रुनरसाठी 45,000/-
13 प्लांट हेज ट्रिगरसाठी 35,000/-
14 मिस्ट ब्लोअरसाठी 30,000/-
15 पॉवर स्प्रे पम्पसाठी 25,000/-

अर्ज करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी आणि वरिष्ठ उद्यान विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

http://www.mphorticulture.gov.in/schemes.php

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Subsidy for vegetable production

भाजीपाला उत्पादनासाठी अनुदान

भाजीपाल्याखालील क्षेत्र विस्तार योजना:- भाजीपाल्याखालील क्षेत्र विस्तार योजनेअंतर्गत प्रगत/संकरित भाजीपाल्याच्या पिकासाठी एककी खर्चाच्या 50%, बियाण्याच्या लागवडीसाठी जास्तीतजास्त 10000/- रुपये प्रति हेक्टर आणि बटाटा, आळू अशा कंदाच्या पिकासाठी जास्तीतजास्त रुपये 30,000/- प्रति हेक्टर अनुदान देण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. योजनेनुसार शेतकर्‍यास .25 हेक्टरपासून 2 हेक्टरपर्यन्त लाभ देता येतो. सर्व वर्गातील शेतकरी लाभ घेऊ शकतात. अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी आणि वरिष्ठ उद्यान विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

http://www.mphorticulture.gov.in/schemes.php

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Subsidy for Fruit Planting

या योजनेची राज्यातील जमीन, वातावरण आणि सिंचन सुविधेच्या उपलब्धतेच्या आधारे राज्यात अंमलबजावणी केली जाते. या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना आंबा, पेरु, संत्री, मोसंबी, सीताफळ, बोर, चिकू आणि द्राक्षे, कल्चर पद्धतीने लागवड केलेली डाळिंबे, स्ट्रोबेरी आणि केळी, संकरीत बियाण्यापासून लागवड केलेली शेवगा आणि पपई, तसेच बियाण्यापासून लागवड केलेली लिंबू या पिकांच्या उच्च आणि अतिउच्च ड्रिपसह फळबाग लागवडीसाठी शेतकर्‍याच्या खर्चाच्या 40% रकमेचे अनुदान 60:20:20 या प्रमाणात तीन वर्षात देण्यात येते. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकर्‍यास 0.25 ते 4.00 हेक्टर जमिनीवर फळबाग लागवडीसाठी अनुदान देण्यात येते.

अधिक माहितीसाठी फलोत्पादन विभागात वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी यांच्याशी सनपरका साधावा.

स्त्रोत:- http://www.mphorticulture.gov.in/schemes.php

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Subsidy in Balram Taal Yojana

योजना

या योजनेचे उद्दीष्ट जमीनीवरील आणि भूमिगत पाण्याची उपलब्धता वाढवणे हे आहे. हे तलाव शेतकरी स्वत:च्या शेतात बनवतात आणि ते पिकांना जीवंत ठेवण्यासाठी पाणी पुरवण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात. बलराम तलाव भू जल संवर्धन आणि जवळपासच्या विहिरी आणि बोअरवेलना चार्ज करण्यासाठी देखील उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.

कोणाला लाभ मिळेल?

ही योजना सम्पूर्ण मध्यप्रदेशात चालवली जाते. तिच्यानुसार सर्व वर्गातील शेतकर्‍यांना तलाव बनवण्यासाठी अनुदान दिले जाते. निवडलेले शेतकरी केवळ एकदाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

लाभ कसा घ्यावा?

इच्छुक शेतकर्‍यांनी क्षेत्रीय ग्रामीण कृषि विस्तार अधिकारी यांच्याकडे तलाव बनवण्यासाठी केलेल्या अर्जाच्या आधारे त्यांची नोंदणी केली जाते. तलावाला तांत्रिक मंजूरी जिल्हा पंचायत/ जनपद पंचायत देते. अनुदानासाठी तलाव निर्माण झाल्यावर प्रथम येणार्‍यांना प्रथम द्यावे या तत्वावर प्राथमिकता मिळते.

काय लाभ मिळेल?

बलराम तलावाच्या कामाची प्रगती आणि मूल्यांकनाच्या आधारे पात्रतेनुसार खालील वित्तीय साहयाची तरतूद आहे:

अनुदान

सर्वसामान्य वर्गातील शेतकर्‍यांच्या गुंतवणुकीच्या 40% आणि जास्तीतजास्त रु. 80,000/-

लघु सीमान्त शेतकर्‍यांसाठी गुंतवणुकीच्या 50% आणि जास्तीतजास्त रु. 80,000/-

अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या शेतकर्‍यांना गुंतवणुकीच्या 75% आणि जास्तीतजास्त रु. 1,00,000/-

स्रोत:-http://mpkrishi.mp.gov.in/hindisite/suvidhaye.aspx

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share