डाळिंब क्षेत्र विस्तार:- योजनेअंतर्गत डाळिंबाच्या टिश्यु कल्चर रोपांची लागवड आणि ड्रीप इरीगेशन यासाठी प्रति हेक्टर निर्धारित एकक रु. 1.50 लाख खर्चाच्या 50% अनुदानापोटी रुपये 0.75 लाख एवढी रक्कम देण्यासाठी तरतूद आहे. अनुदान 3 वर्षात 60:20:20 या प्रमाणात पहिल्या वर्षी क्रमश: रु. 45 हजार आणि दुसर्या आणि तिसर्या वर्षी रोपे जगल्यास रक्षणापोटी अनुक्रमे 15-15 हजार 80% देय आहेत. शेतकर्यामागे किमान 0.5 हेक्टर ते कमाल 5.00 हेक्टर एवढ्या क्षेत्रात लागवडीची पात्रता आहे. ही योजना सर्व जिल्ह्यात लागू आहे. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी आणि वरिष्ठ उद्यान विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
http://www.mphorticulture.gov.in/schemes.php
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share