Subsidy on Pomegranate cultivation

डाळिंब क्षेत्र विस्तार:- योजनेअंतर्गत डाळिंबाच्या टिश्यु कल्चर रोपांची लागवड आणि ड्रीप इरीगेशन यासाठी प्रति हेक्टर निर्धारित एकक रु. 1.50 लाख खर्चाच्या 50% अनुदानापोटी रुपये 0.75 लाख एवढी रक्कम देण्यासाठी तरतूद आहे. अनुदान 3 वर्षात 60:20:20 या प्रमाणात पहिल्या वर्षी क्रमश: रु. 45 हजार आणि दुसर्‍या आणि तिसर्‍या वर्षी रोपे जगल्यास रक्षणापोटी अनुक्रमे 15-15 हजार 80% देय आहेत. शेतकर्‍यामागे किमान 0.5 हेक्टर ते कमाल 5.00 हेक्टर एवढ्या क्षेत्रात लागवडीची पात्रता आहे. ही योजना सर्व जिल्ह्यात लागू आहे. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी आणि वरिष्ठ उद्यान विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

http://www.mphorticulture.gov.in/schemes.php

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Subsidy on Medicinal and Aromatic Crops

औषधी आणि सुगंधित वनस्पतींच्या शेतीसाठी अनुदान

औषधी आणि सुगंधित पीक क्षेत्र विस्तार योजना:- या योजनेअंतर्गत शेतकर्‍यास स्वेच्छेने शेतास अनुकूल औषधी आणि सुगंधित पिकाखालील क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी पिकानुसार 20 ते 75% पर्यन्त अनुदान मिळू शकते. प्रत्येक शेतकर्‍यास योजनेअन्तर्गत 0.25 हेक्टर पासून 2 हेक्टर पर्यन्त लाभ देण्याची तरतूद आहे. पिकानुसार अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणे:-

क्र. पिकाचे नाव अनुदानाची रक्कम (रूपयात)
1. आवळा 13,000/-
2. अश्वगंधा 5,000/-
3. बेल 20,000
4. कोलियस 8,600/-
5. गुडमार 5000/-
6. कालमेघ 5000/-
7. श्वेत मुसली 62,500/-
8. सर्पगंधा 31,250/-
9. शतावरी 12,500/-
10. तुळस 6,000/-

अर्ज करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी आणि वरिष्ठ उद्यान विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

http://www.mphorticulture.gov.in/schemes.php

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Subsidy on Horticultural Machinery

फळबागेच्या यंत्रांसाठी अनुदान

फळबागांच्या विकासासाठी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देण्याची योजना:- जे शेतकरी फळबागेसाठी आधुनिक यंत्रे वापरू इच्छितात त्यांना अशा यंत्रांच्या एकाकी खर्चाच्या 50% किंवा खालीलप्रमाणे कमाल अनुदान देण्यात येते –

क्र. फळबागेची मशीनरी अनुदानाची कमाल रक्कम
1 पोटॅटो प्लान्टर/डीगरसाठी 30000.00
2 लसूण/कांदा प्लान्टर/डीगरसाठी 30000/-
3 ट्रॅक्टर माऊंटेड ऐगेब्लास्टर स्प्रेयरसाठी 75,000/-
4 पॉवर ऑपरेटेड प्रुनिग मशीनसाठी 20000/-
5 फॉगिंग मशीनसाठी 10000/-
6 मल्च लेइंग मशीनसाठी 30000/-
7 पॉवर टिलरसाठी 75,000
8 पॉवर वीडरसाठी 50,000/-
9 ट्रॅक्टर विथ रोटाव्हेटरसाठी 1,50,000/-
10 कांदा/लसूण मार्करसाठी 500/-
11 पोस्ट होल डीगरसाठी 50,000/-
12 ट्री प्रुनरसाठी 45,000/-
13 प्लांट हेज ट्रिगरसाठी 35,000/-
14 मिस्ट ब्लोअरसाठी 30,000/-
15 पॉवर स्प्रे पम्पसाठी 25,000/-

अर्ज करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी आणि वरिष्ठ उद्यान विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

http://www.mphorticulture.gov.in/schemes.php

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Subsidy for Fruit Planting

या योजनेची राज्यातील जमीन, वातावरण आणि सिंचन सुविधेच्या उपलब्धतेच्या आधारे राज्यात अंमलबजावणी केली जाते. या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना आंबा, पेरु, संत्री, मोसंबी, सीताफळ, बोर, चिकू आणि द्राक्षे, कल्चर पद्धतीने लागवड केलेली डाळिंबे, स्ट्रोबेरी आणि केळी, संकरीत बियाण्यापासून लागवड केलेली शेवगा आणि पपई, तसेच बियाण्यापासून लागवड केलेली लिंबू या पिकांच्या उच्च आणि अतिउच्च ड्रिपसह फळबाग लागवडीसाठी शेतकर्‍याच्या खर्चाच्या 40% रकमेचे अनुदान 60:20:20 या प्रमाणात तीन वर्षात देण्यात येते. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकर्‍यास 0.25 ते 4.00 हेक्टर जमिनीवर फळबाग लागवडीसाठी अनुदान देण्यात येते.

अधिक माहितीसाठी फलोत्पादन विभागात वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी यांच्याशी सनपरका साधावा.

स्त्रोत:- http://www.mphorticulture.gov.in/schemes.php

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Subsidy in Balram Taal Yojana

योजना

या योजनेचे उद्दीष्ट जमीनीवरील आणि भूमिगत पाण्याची उपलब्धता वाढवणे हे आहे. हे तलाव शेतकरी स्वत:च्या शेतात बनवतात आणि ते पिकांना जीवंत ठेवण्यासाठी पाणी पुरवण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात. बलराम तलाव भू जल संवर्धन आणि जवळपासच्या विहिरी आणि बोअरवेलना चार्ज करण्यासाठी देखील उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.

कोणाला लाभ मिळेल?

ही योजना सम्पूर्ण मध्यप्रदेशात चालवली जाते. तिच्यानुसार सर्व वर्गातील शेतकर्‍यांना तलाव बनवण्यासाठी अनुदान दिले जाते. निवडलेले शेतकरी केवळ एकदाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

लाभ कसा घ्यावा?

इच्छुक शेतकर्‍यांनी क्षेत्रीय ग्रामीण कृषि विस्तार अधिकारी यांच्याकडे तलाव बनवण्यासाठी केलेल्या अर्जाच्या आधारे त्यांची नोंदणी केली जाते. तलावाला तांत्रिक मंजूरी जिल्हा पंचायत/ जनपद पंचायत देते. अनुदानासाठी तलाव निर्माण झाल्यावर प्रथम येणार्‍यांना प्रथम द्यावे या तत्वावर प्राथमिकता मिळते.

काय लाभ मिळेल?

बलराम तलावाच्या कामाची प्रगती आणि मूल्यांकनाच्या आधारे पात्रतेनुसार खालील वित्तीय साहयाची तरतूद आहे:

अनुदान

सर्वसामान्य वर्गातील शेतकर्‍यांच्या गुंतवणुकीच्या 40% आणि जास्तीतजास्त रु. 80,000/-

लघु सीमान्त शेतकर्‍यांसाठी गुंतवणुकीच्या 50% आणि जास्तीतजास्त रु. 80,000/-

अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या शेतकर्‍यांना गुंतवणुकीच्या 75% आणि जास्तीतजास्त रु. 1,00,000/-

स्रोत:-http://mpkrishi.mp.gov.in/hindisite/suvidhaye.aspx

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share