कपास की कीमतों में बढ़ोतरी के आसार

कापसाच्या दरात वाढ होण्याची चिन्हे

कापसाची निर्यात 27% वाढू शकते:- चीनने अमरीकेकडून आयात केलेल्या उत्पादनांवर आयात शुल्क लावल्याने अमेरीकन कापूस महाग झाला आहे. त्यामुळे चीनने नुकताच भारताशी 2 लाख गाठी कापूस आयात करण्याचा सौदा केला आहे. आगामी पिकाच्या हंगामात भारतातून चीनला 25-30 लाख गाठी निर्यात होतील असा अंदाज आहे. देशात कापसाची निर्यात 70 लाख गाठींची पोहचेल अशी आशा आहे. निर्यात मागील अंदाजाहून सुमारे 27 टक्के अधिक असू शकेल. तज्ञांच्या मते कॉटनच्या एक्सपोर्टला चांगली मागणी असल्याचा कापूस उत्पादकांना लाभ होईल.

स्त्रोत :- पत्रिका न्यूज नेटवर्क

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

ग्रामोफोन को बेस्ट एग्री स्टार्टअप अवार्ड

ग्रामोफोनला बेस्ट अ‍ॅग्री स्टार्टअप अ‍ॅवॉर्ड

दिनांक 22 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे भारतीय कृषि आणि खाद्य परिषदेने आयोजित केलेल्या पहिल्या ऑल इंडिया अ‍ॅग्री स्टार्टअप कन्व्हेंशनमध्ये ग्रामोफ़ोन (एगस्टेक टेक्नोलॉजिज प्रा. लि.) ला कृषि क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी माननीय श्री सुरेश प्रभु केन्द्रीय मंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यांच्या हस्ते बेस्ट अ‍ॅग्री स्टार्टअप अ‍ॅवॉर्ड दिले गेले.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

किसानों के लिए राहत

शेतकर्‍यांना दिलासा

माननीय मुख्यमंत्री श्री शिवराज जी चौहान यांनी किसान महासम्मेलनात घोषणा केली आहे की सरकार गहू आणि तांदळाच्या समर्थन मूल्याबरोबर 200 रु. प्रति क्विंटल एवढा बोनस शेतकर्‍यांना देईल. हवामानामुळे झालेल्या हानीपोटी विमा रकमेवरोबर मदतीची रक्कम देखील देण्यात येईल असेही ते म्हणाले.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

बजट सत्र 2018-19 में कृषि क्षेत्र के मुख्य बिंदु

सरकारने आगामी खरेदी दरम्यान पिके उत्पादन खर्चाच्या किमान दीड पट किमतीने विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांना खर्चाच्या किमान दीड पट किंमत मिळेल याची खबरदारी घेण्यासाठी बाजारभाव आणि एमएसपी यातील फरकाची रक्कम सरकार देईल.

– 86 टक्क्यांहून अधिक शेतकरी लघु किंवा सीमान्त शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी बाजारा पोहोचणे सोपे नाही. त्यामुळे सरकार त्यांना डोळ्यासमोर ठेवून इन्फ्रास्ट्रक्चर तैय्यार करेल.

– औषधी वापराच्या वनस्पतींचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार प्रोत्साहन देईल.
– जैविक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल.
– टोमॅटो, बटाटा, कांदा यांचा वापर मोसमाच्या आधारे वर्षभर होतो. त्यासाठी ऑपरेशन फ्लडच्या धर्तीवर ऑपरेशन ग्रीन लॉन्च केले जाईल, त्यासाठी 500 कोटी रुपयांची वेगळी तरतूद केली जाईल.
– मासेमार आणि पशुपालकांना देखील क्रेडिड कार्ड मिळेल.
– 42 मेगा फूड पार्क बनतील.
– मत्स्य पालन आणि पशुपालनासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे.
– शेतकरी कृषि लोन सुविधेपासून वंचित राहतात. ते बंटाईदार असतात. त्यांना बाजारातून कर्ज घ्यावे लागते. नीति आयोग शेतकर्‍यांना कर्ज मिळण्याची सुविधा पुरवण्यासाठी व्यवस्था बनवत आहे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share