भेंडीच्या प्रत्येक तोडणीला जास्त फळे कशी मिळवावी

  • भेंडीच्या पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी पेरणीपूर्वी 2 आठवडे शेतात एकरी 10 टन जैविक खत घालावे. त्यामुळे रोपांमधील सूक्ष्म पोषक तत्वांची क्षमता वाढते. 
  • पेरणीच्या वेळी, नायट्रोजन स्थिरीकरण करणाऱ्या आणि फॉस्फरस विरघळवणाऱ्या जिवाणूंची खतासह 2 किग्रॅ/ एकर मात्रा द्यावी.
  • नायट्रोजनची 60-80 किग्रॅ/ एकर मात्रा पेरणीच्या वेळी द्यावी आणि उरलेली अर्धी मात्रा पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावी. त्यामुळे प्रत्येक फांदीवरील फळांची संख्या वाढून उत्पादनात 50% वाढ होईल. 
  • पेरणीनंतर सुमारे 40 ते 50 दिवसांनी भेंडीला फळे लागतात. 
  • पहिल्या तोडणीपूर्वी कॅल्शियम नायट्रेट + बोरॉन @ 10 किग्रॅ/ एकर, मॅग्नेशियम सल्फेट 10 किग्रॅ/ एकर + युरिया @ 25 किग्रॅ/ एकर आणि नायट्रोजन स्थितीकरण करणाऱ्या आणि फॉस्फरस विरघळवणारे जिवाणू @ 1 किग्रॅ/ एकर द्यावे.
  • भेंडी फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना अमोनियम सल्फेटची 55-70 किग्रॅ/ एकर मात्रा द्यावी. फळांच्या विकासासाठी हे आवश्यक आहे. 
Share

ऊसाच्या लागवडीसाठी वसंत ऋतू हा योग्य काळ, त्यामुळे बराच फायदा होईल

  • ऊसाची लागवड  लोम आणि जड मातीत करता येते.  
  • त्यासाठी खोल नांगरट करावी. 
  • आधीच्या पिकाचे उरलेले भाग शेतातून काढून टाकावे. 
  • नांगरणी केल्यावर, मातीत जैविक खत मिसळावी. 
  • पहिली खोल नांगरणी नांगराने करावी.
  • त्यानंतर कल्टिव्हेटर वापरून 2 ते 3 वेळा नांगरणी करावी. 
  • त्यानंतर पाटा फिरवून माती भुसभुशीत करावी आणि शेत समपातळीत आणावे.
Share

सरकारची महायोजना, शेतकऱ्यांना कंबाइन हार्वेस्टरसाठी देखील 50 टक्के पर्यंत अनुदान मिळणार

  • या वर्षी पासून वर्षी शेतकऱ्यांना कंबाइन हार्वेस्टरच्या खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. 
  • शेतकऱ्यांना शेती उपकरणांच्या खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत देखील वाढ करण्यात आलेली आहे. 
  • मध्य प्रदेश सरकार आता लघु, मध्यम आणि अनुसूचित जाती जमाती तसेच महिला प्रवर्गातील शेतकऱ्यांना कृषी उपकरणांच्या खरेदीमूल्याच्या 50 टक्के एवढ्या रकमेचे तर अन्य शेतकऱ्यांना ४० टक्के रकमेचे अनुदान देणार आहे. 
  • या बातमीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्याशी  संपर्क साधू शकता. https://dbt.mpdage.org/Eng_Index.aspx .
Share

हरबऱ्याच्या काढणीसाठी योग्य काळ

  • बहुसंख्य घाटे पिवळे होतात तेव्हा हरबरा काढावा. 
  • रोप वाळते, त्याची पाने लालसर करडी होतात आणि गळू लागतात तेव्हा पीक काढणीस तयार झालेले असते. 
  • पीक वाळून काढणीस उशीर झाल्यास घाटे गळू लागतात. त्यामुळे हरबरे सुमारे 15 टक्के ओले असतानाच काढणी करावी. 
Share

गव्हाच्या पिकात दाणे भरण्याच्या टप्प्यातील कार्ये आणि फवारणी

  • गव्हाच्या पिकात दाणे भरण्याचा टप्पा अत्यंत महत्वाचा असतो. 
  • या टप्प्यात ओंबीत दाणे भरतात. अशा वेळी सिंचन अत्यंत महत्वाचे असते. 
  • त्याबरोबरच दाण्यांच्या भरघोस वाढीसाठी होमोब्रासिनोलिड 0.04% @ 100 मिली 00:52:34 सह @ 1 किग्रॅ/ एकर फवारावे.
  • खताची तिसरी मात्रा म्हणून युरिया @ 40 किग्रॅ आणि सूक्ष्म पोषक द्रव्ये @ 8 किग्रॅ/ एकर द्यावे. 
Share

कोथिंबीर/ धन्याच्या पिकातील भुरी

  • हा कोथिंबीर/ धन्याच्या पिकाला ग्रासणारा भयानक रोग आहे. 
  • या रोगात पानांवर लहान पांढरट करडे डाग पडतात. ते वाढून संपूर्ण पान ग्रासतात. 
  • रोगग्रस्त रोपाची पाने वाळून गळतात. 
  • रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी हेक्साकोनाझोल 5% एससी @ 400 मिली/ एकर किंवा टेब्युकोनाझोल 10% + सल्फर 65% डब्ल्यूजी @ 500 ग्रॅ/ एकर किंवा स्युडोमोनस फ्ल्युरोसेन्स + बॅसिलिस सबटिलिस @ 0.25 + 0.25 किग्रॅ/ एकर फवारावे.
Share

हरबर्‍याचे दाणे पोखरणार्‍या किड्यांपासून (पल्स बीटल) सुरक्षा

हरबर्‍याचे दाणे पोखरणार्‍या किड्यांपासून (पल्स बीटल) सुरक्षा

  • हरबर्‍याचे दाणे पोखरणार्‍या किड्यांचा (पल्स बीटल) हल्ला साठवणूक केल्यापासून 60 दिवसांनी वेगाने होताना दिसतो.
  • हरबर्‍यातील किड्यांच्या संक्रमणामुळे साठवणूक केल्यापासून 120 दिवसात 87.23% बियाण्याची हानी होते आणि वजन 37.15% कमी होते असे आढळून आले आहे.
  • निंबोणी आणि एरंडाचे तेल @ 6 मिली / कि.ग्रॅ. वापरुन बीजावर उपचार करून साठवण केल्यास चार महिनेपर्यंत किड्यांचे प्रभावी नियंत्रण होते.
  • बियाण्याला वनस्पति तेल किंवा खाद्य तेल चोपडून साठवावे आणि त्याच्यात निंबोणीची पाने मिसळावीत.
  • 10% मॅलाथियानच्या द्रावणात पोती बुडवावीत.
  • बियाणे ठेवण्यासाठी हवाबंद खोली वापरावी.
  • अॅल्युमिनियम फॉस्फाईडची धुरी देऊन (फ्यूमिगेशन)  देखील अंकुरण प्रभावित न होऊ देता बियाणे सुरक्षित ठेवता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

बटाट्याची साठवण

बटाट्याची साठवण

  • सुयोग्य साठवण शेतीशी संबंधित काही कार्यांवर अवलांबून असते.
  • बटाट्याच्या खोदाईपूर्वी एक आठवडा पिकाला सिंचन करणे बंद करावे. त्यामुळे बटाट्याची साल कडक होते.
  • त्याचबरोबर बटाट्याच्या झाडाची पाने सुकून गळल्यावरच खोदाई सुरू करण्याकडे लक्ष द्यावे.
  • खोदाईनंतर बटाट्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ करावे आणि 18°सेंटीग्रेट तापमानात आणि 95% आद्रतेत साठवण करावी.
  • हिरवी साले असलेले, सडलेले आणि कापले गेलेले बटाटे वेगळे काढावेत.
  • 2-4° सेंटीग्रेट तापमानात बटाटे 6-8 महिन्यांपर्यंत सहजपणे साठवता येतात.
  • अशाच प्रकारे 4° सेंटीग्रेट तापमानात बटाट्याची 3-4 साठवण करता येते. |

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

2020 च्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी चांगली बातमी आहे…

अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज आपले दुसरे केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले.या अर्थसंकल्पात सरकारने देशातील बहुतेक सर्व क्षेत्रांसाठी विविध बदलांची घोषणा केली होती. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी 16 प्रमुख मुद्द्यांची घोषणा केली. या घोषणांचे मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणेः

  1. आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत मार्गावर कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारने कृषी उडान योजना जाहीर केली.
  2. कृषी पतपुरवठा करण्याचे उद्दिष्टही 12 लाख कोटी रुपयांवरून 15 लाख कोटी रुपये करण्यात आले आहे.
  3. आर्थिक वर्ष २१ मध्ये कृषी व सिंचनासाठी २.83 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.
  4. ग्रामीण विकास आणि पंचायत राज साठी 1.23 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.
  5. नाबार्ड पुनर्वित्त योजनेंतर्गत चारा शेती व कोल्ड स्टोरेज (शीतगृह) विकसित केले जातील. 
  6. 2022-23 पर्यंत सरकारने मत्स्य व्यवसाय उत्पादन 200 लाख टन पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. 
  7. दुधाची प्रक्रिया क्षमता दुप्पट म्हणजेच 108  मेट्रिक टन करण्याचे लक्ष्य आहे. 
  8. १०० पाणी-ताणग्रस्त जिल्ह्यांमधील परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित
  9. शेतकर्‍यांच्या हितासाठी 20 लाखांची तरतूद 
  10. नाशवंत वस्तूंसाठी स्वतंत्र किसान रेल्वे पीपीपी माध्यमामध्ये सुरू केली जातील
  11. सरकार शेतकरी हितासाठी एक उत्पादन एक जिल्हा मॉडेलवर लक्ष केंद्रित करेल.
  12. शून्य बजेट शेतीवर सरकार भर देणार आहे. 
  13. ई-एनएएम वाटाघाटी करण्यायोग्य गोदाम पावतीच्या वित्तपुरवठ्यात समाकलित केले जाईल
  14. शेती बाजाराचे उदारीकरण (विस्तार) होईल.
  15. शेतजमिनींमध्ये खतांचा समतोल वापर होण्यासाठी शेतकरी शिक्षित होतील. 
  16. कृषी बाजारपेठ उदारीकरण (विस्तार) करण्याच्या उद्देशाने सरकार शेतकऱ्यांना हाताशी धरत आहे.
Share

कारल्याच्या पिकासाठी सिंचन

कारल्याच्या पिकासाठी सिंचन

  • कारल्याचे पीक कोरड्या किंवा पाणथळ भागात येत नाही.
  • पुनर्रोपण किंवा पेरणीनंतर लगेचच सिंचन करावे. त्यानंतर तिसर्‍या दिवशी आणि त्यानंतर आठवड्यातून एकदा जमिनीतील ओल लक्षात घेऊन त्यानुसार सिंचन करावे.
  • जमिनीच्या पृष्ठपातळीवर (50 से.मी. खोलीपर्यंत) ओल टिकवणे आवश्यक असते. या क्षेत्रात मुळांची संख्या अधिक असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share