Season of Planting of Okra

भेंडीच्या लागवडीसाठी सुयोग्य वेळ:-

  • भेंडीचे पीक वर्षात दोन वेळा घेतले जाते.
  • खरीपाच्या पिकासाठी जून महिन्याच्या शेवटी पेरणी करावी.
  • उन्हाळी पिकासाठी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटापासून ते मार्च महिन्याच्या सुरुवातीपर्यंत पेरणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Time of Sowing of Bitter Gourd

कारल्याच्या लागवडीसाठी सुयोग्य वेळ:-

  • उन्हाळी पिकासाठी बियाणे जानेवारी-फेब्रुवारीत पेरावे.
  • खरीपाच्या पिकासाठी बियाणे मे-जून महिन्यात पेरावे.
  • रब्बीच्या पिकासाठी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बियाणे पेरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Land preparation for Brinjal

वांग्याच्या पिकासाठी जमिनीची मशागत:-

  • वांग्याची वाढ आणि विकास चांगल्या प्रकारे होण्यासाठी शेतात पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था उत्तम असावी.
  • शेताची 4-5 वेळा नांगरणी करून माती मोकळी करावी.
  • शेताची शेवटची नांगरणी करताना शेणखत मिसळावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Objectives of Soil testing

मृदा परीक्षणाचे उद्देश्य:-

  • पिकांसाठी रासायनिक खतांची योग्य मात्रा ठरवण्यासाठी.
  • अल्कली आणि आम्ल जमीनींत सुधारणा करून त्यांना सुधारून कसण्यायोग्य बनवण्याचा योग्य मार्ग ठरवण्यासाठी.
  • पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची अनुकूलता ठरवण्यासाठी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Thrips

थ्रिप्सचे (फुलकिड्यांचे) नियंत्रण

फुलकिडे रोपांमधील रस शोषतात त्यामुळे रोपे पिवळी पडून कमज़ोर होतात आणि उत्पादन घटते. त्यांच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफोस 400 मिली. प्रति एकर किंवा फिप्रोनिल 400 मिली. प्रति एकर किंवा थायमेथोक्झोम 100 ग्रॅम प्रति एकर दर 10 दिवसांनी फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation in Moong (Green Gram)

मुगाच्या शेतातील सिंचन:- मूग हे पीक मुख्यत्वे खरीपाचे पीक म्हणून घेतले जाते.  पाऊसपाण्याच्या परिस्थितीनुसार सिंचनाची आवश्यकता असते. उन्हाळ्यातील पिकासाठी मातीचा प्रकार आणि पाण्याच्या परिस्थितीनुसार तीन ते पाच वेळा सिंचनाची आवश्यकता असते. चांगल्या उत्पादनासाठी पेरणीनंतर 55 दिवसांनी सिंचन थांबवावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Bulb splitting In Onion (physiological Disorder)

कांद्याचे कंद फुटणे:

कारणे:-

  • कांद्याच्या शेतातील अनियमित सिंचनाने या रोगात वाढ होते.
  • शेतात अतिरिक्त पाणी सोडल्यावर त्याला पुर्णपणे वाळू दिले आणि त्यानंतर पुन्हा अतिरिक्त पाणी सोडल्यास कंद फुटतात.
  • रायझोफ़ायगस प्रजातीचे कोळी चिकटणे हे कंद फुटण्याचे कारण आहे.

लक्षणे:-

  • कंद फुटण्याची लक्षणे आधी कंदाच्या तळात दिसतात.
  • प्रभावित कंदाच्या तळात उंचवटा आल्याचे स्पष्ट आढळून येते.

नियंत्रण:-

  • एकसमान सिंचन आणि उर्वरकांच्या सुयोग्य मात्रेचा वापर करून कंद फुटणे रोखता येते.
  • हळूहळू विकसित होणार्‍या कांद्याच्या वाणांचा वापर करून या विकाराचे नियंत्रण करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

किसानों के लिए राहत

शेतकर्‍यांना दिलासा

माननीय मुख्यमंत्री श्री शिवराज जी चौहान यांनी किसान महासम्मेलनात घोषणा केली आहे की सरकार गहू आणि तांदळाच्या समर्थन मूल्याबरोबर 200 रु. प्रति क्विंटल एवढा बोनस शेतकर्‍यांना देईल. हवामानामुळे झालेल्या हानीपोटी विमा रकमेवरोबर मदतीची रक्कम देखील देण्यात येईल असेही ते म्हणाले.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

प्रधानमंत्री बीमा योजना का लाभ लें

प्रधानमंत्री विमा योजनेचा लाभ घ्या

प्रधानमंत्री विमा योजनेनुसार हवामानामुळे होणार्‍या नुकसानीसाठी प्रावधान केले असून ज्या शेतकरी बंधूंनी विमा उतरवला आहे आणि ज्यांची नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे हानी झालेली आहे त्यांनी विमा कंपनीच्या अधिकार्‍यांशी सनपरका साधून शेताचे मूल्यमापन करवून घ्यावे, ज्यायोगे त्यांना विमा योजनेचा लाभ मिळेल.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Bolting in Onion (Physiological disorder)

कांद्याला फुलोरा येणे (बोल्टिंग) (क्रियात्मक विकार)

कारणे:-

  • वेगवेगळ्या वानांच्या आनुवांशिक विविधतेमुळे.
  • तापमानात मोठे चढ उतार झाल्याने.
  • बियाण्याची गुणवत्ता कमी असल्याने.
  • नर्सरी बेडवर रोपांचा विकास खुंटल्याने.
  • सुरूवातीला खूप कमी तापमान असल्यास फुलांचा विकास होतो.

लक्षणे:-

  • रोपे पाच पाने फुटल्याच्या अवस्थेत असताना ही अवस्था येते.
  • यात अचानक कांद्याच्या शिरावर कंदाच्याऐवजी गाभा तयार होतो.
  • या अवस्थेत कंद हलके आणि तंतुमय होतात.

नियंत्रण:-

  • वाणाची पेरणी सुयोग्य वेळी करावी.
  • उर्वरकांचा अतिरिक्त वापर करू नये.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share