Intercropping in vegetables

भाजीपाल्यातील आंतरपिके:- भाजीपाल्याची पिके कमी वेळात होतात आणि अधिक उत्पादन देतात. त्यामुळे त्यांना मिश्रित अंतरवर्ती आणि चक्रीय पद्धतीने अन्य पिकांबरोबर लावता येते. आंतरपिक किंवा मिश्र पीक घेताना भाजीपाल्याच्या विकासाची गती, मुळे पसरणे, पोषक प्रकृति, कीड आणि रोगांचा हल्ला, बाजारातील मागणी इत्यादि बाबींचा विचार करावा. पीक पद्धति स्थिर नसावी आणि मोसम, कीड आणि रोगांचा हल्ला, बाजारभाव आणि मागणी व उत्पादकाच्या आवश्यकतेनुसार बदलावी.

क्र.    भाजीचे नाव आंतरपीक

1.)    टोमॅटो – केळी, लिंबू, कापूस, भेंडी, झेंडू, तुर, मका

2.)    वांगी -गाजर, फूलकोबी, मेथी, पानकोबी, हळद, मका

3.)    मिरची – बटाटा, शलगम, चवळी

4.)    पानकोबी – लिंबू, गाजर, मुळा, वांगी

5.)    फूलकोबी – पालक, वांगी, मका, गाठकोबी

6.)    कांदा – गाजर, मुळा, कोथिंबीर, शलगम

7.)    लसूण – बीटरूट, मुळा, गाजर

8.)    मटार –बाजरी, मका, सूर्यफूल, पेरु

9.)    फरसबी – वांगी, मिरची, झेंडू, मका

10.)   चवळी – फरसबी, कोथिंबीर, मका, बाजरी, केळी

11.)   भेंडी – कोथिंबीर, गवार

12.)   दुधीभोपळा – चवळी, पडवळ, चवळई, हिरवी काकडी

13.)   घोसाळे – पालक, टोमॅटो

14.)   काकडी – चवळी, पालक

15.)   कारले – लोब्या, चवळी, ओवा, सॅलट (लेट्युस)

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>