Control of Fruit borer in Tomato

टोमॅटोवरील फळे पोखरणार्‍या किडीचे नियंत्रण:-

  • फळे पोखरणारी अळी भोक पाडून फळात शिरते आणि त्याला संपूर्णपणे नष्ट करते. त्यामुळे गुणवत्ता आणि उत्पादनाचे खूप नुकसान होते.
  • या किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रोफेनफोस 40% ईसी @ 400 मिलीलीटर / एकर किंवा इंडोक्सकार्ब 14.5% एससी @ 200 मिलीलीटर /एकर किंवा इमामेक्टिन बेंजोएट (5% एस.जी) 80 ग्रॅम/एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fertilizer Requirments for Watermelon

कलिंगडाच्या शेतासाठी उर्वरकांची योग्य मात्रा:- 

  • कलिंगडाच्या शेतातील भरघोस उत्पादनासाठी उत्तम शेणखत 15-25 टन/हेक्टर शेताची मशागत करताना मिसळावे.
  • कलिंगडाच्या शेतीत एकरी एकूण 135 क़ि.ग्रॅ. यूरिया, 100 क़ि.ग्रॅ. डी.ए.पी. आणि 70 किलोग्रॅम एम.ओ.पी. आवश्यक असते.
  • फॉस्फरस, पोटाश ची पूर्ण आणि नायट्रोजनची अर्धी मात्रा पेरणीपूर्वी द्यावी.
  • उरलेली नायट्रोजनची मात्रा पेरणीनंतर 10-15 दिवसांनी द्यावी.
  • सामान्यता नायट्रोजनची अधिक मात्रा उच्च तापमानात कलिंगडाच्या वेळीवरील फुलांच्या संख्येत घट आणते आणि उत्पादन कमी होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Harvest and Post Harvest Management of Onion

कांद्याची तोडणी आणि तोडणीनंतर वापरण्याचे तंत्रज्ञान:-

तोडणी:-

  • वाणानुसार कांद्याचे पीक रोपणानंतर 3 ते 5 महिन्यात पक्व होते.
  • रोपांचे वरील शेंडे झुकतात आणि खालील भाग फिकट पिवळा होतो तेव्हा कांदे काढण्याची सुयोग्य वेळ येते.
  • उन्हाळ्यात जमीन कडक होते तेव्हा कंद जमिनीतून काढण्यास खुरपे वापरतात.
  • रब्बी हंगामाच्या तुलनेत खरीप पिकात कमी उत्पादन मिळते.

पॅकिंग:-

  • दूरवरच्या बाजारात ट्रक, रेल्वे किंवा विमानाने वाहतूक करण्यासाठी पॅकिंग करताना ज्यूट आणि जाळीदार पोत्यांचा वापर केला जातो.
  • सामान्यता 40 कि.ग्रॅम क्षमतेच्या ज्यूट आणि जाळीदार पोत्यांचा वापर देशांतर्गत तर निर्यातीसाठी 6-25 कि.ग्रॅम क्ष्मतेच्या पिशव्या वापरल्या जातात.
  • निर्यातीसाठी कांदा 14-15 कि.ग्रॅम क्षमतेच्या टोपल्यात देखील पॅक केला जातो.

वेचणी:-

  • कंदाचे संस्करण केल्यावर हातांनी आणि मशिनने आकारानुसार वेगवेगळ्या श्रेणीत वर्गीकरण केले जाते.
  • वर्गीकरण केलेल्या कांद्याची साठवण करण्यापूर्वी सडलेले, कापलेले आणि सदोष कांदे वेगळे काढावेत.
  • वर्गीकरण करण्यापूर्वि कंदांच्या वरील सुकलेली टरफळे काढावीत. त्याने कांदे आकर्षक दिसतात.
  • संस्कारित कांद्यांचे आकार आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार वर्गीकरण केले जाते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Gramophone organised its ‘Field Day’

ग्रामोफ़ोनच्या फील्ड डे मध्ये शेतकर्‍यांची तोबा गर्दी:-

08 डिसेंबर, 2018 रोजी ग्रामोफोनने आपला ‘फील्ड डे’ आयोजित केला. त्यात सामान्यता वापरल्या जाणार्‍या कृषि पद्धतींचा ग्रामोफ़ोनच्या कृषितज्ञानी बनवलेल्या आधुनिक कृषिपद्धतींशी तुलनात्मक अभ्यास केला गेला. ग्रामोफ़ोनच्या कृषितज्ञानी शेतकर्‍यांना टप्याटप्यात मार्गदर्शन केले आणि ज्यामुळे भरघोस पीक आणि उत्साहवर्धक परिणाम मिळाले आहेत अशा पीक चक्राचे विवेचन केले. बैंकपुरा गाव (धामनोद) येथील शेतकरी मनीष अग्रवाल ग्रामोफ़ोनबाबत म्हणतात की, “मी या हंगामात ग्रामोफ़ोनच्या कृषितज्ञाची मदत घेतली आणि इतर शेतांहून माझ्या शेतातील पीक निरोगी आहे आणि उत्पादन 30-40% वाढेल अशी माझी अपेक्षा आहे.”

सामान्य शेतकर्‍यांनी केलेल्या शेतीतील पिकाच्या गुणवत्तेचे ग्रामोफ़ोनद्वारा आधुनिक पद्धतीने केलेल्या पिकाशी केलेले तुलनात्मक अध्ययन:

 

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable climate and soil for watermelon

कलिंगडासाठी उपयुक्त वातावरण आणि माती:-

  • कलिंगडाच्या शेतीस उष्ण आणि कोरडे वातावरण उत्तम असते.
  • बियाण्याचे अंकुरण आणि रोपांची वाढ यासाठी 22-26 डिग्री सेल्सियस तापमान उत्तम असते. हे उन्हाळी पीक असल्याने त्याला जास्त धुके सहन होत नाही.
  • हवेत जास्त आर्द्रता असल्यास फळे उशिरा पक्व होतात.
  • फळे पिकताना हवामान उष्ण आणि कोरडे असल्यास फळातील गोडी वाढते. पाण्याचा योग्य निचरा आणि जीवांशयुक्त बलुई किंवा लोम माती या पिकासाठी सर्वोत्तम असते.
  • या पिकासाठी मृदेतील सर्वोत्तम पीएच स्तर 5-7 असतो. पाण्याचा निचरा न झाल्यास अनेक रोगांची लागण होते. नदीकिनार्‍यावरील जमिनीत कलिंगडाची शेती यशस्वीरीत्या करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control Of Jassid in Okra

भेंडीवरील तुडतुड्याचे नियंत्रण:-

ओळख:-

  • शिशु आणि वाढ झालेले किडे समान आकाराचे असतात पण शिशुंमध्ये पंख नसतात.
  • शेतातील पिकात प्रवेश केल्यावर शिशु आणि वाढ झालेले किडे उडताना दिसतात.
  • वाढ झालेले किडे पानांच्या आणि फांद्यांच्या खालील बाजूवर अंडी घालतात.
  • त्यांचे जीवनचक्र 2 आठवड्यात पूर्ण होते.

हानी:-

  • शिशु आणि वाढ झालेले किडे हिरव्या रंगाचे आणि लहान आकाराचे असतात.
  • शिशु आणि वाढ झालेले किडे पानांच्या खालील बाजूने रस शोषतात.
  • ग्रस्त पाने वरील बाजूस मुडपतात, त्यानंतर पिवळी पडतात आणि त्यांच्यावर दाग पडतात. त्याद्वारे माइकोप्लाज्मामुळे होणारे लघुपर्ण सारखे आणि करडेपणासारखे विषाणुजन्य रोग संक्रमित होतात.
  • या किडीचा तीव्र हल्ला झाल्यास रोपांच्या फळात घट होते.

नियंत्रण:-

  • पेरणी करताना कार्बोफुरोन 3 जी @ 10 किलो प्रति एकर मातीत मिसळावे.
  • किड्यांच्या नियंत्रणासाठी किडे दिसताच दर 15 दिवसांनी प्रोफेनोफॉस 50 % ईसी @ 400 मिली किंवा एसीटामाप्रीड 20% @ 80 ग्रॅम फवारावे.
  • किडीपासुन बचाव करण्यासाठी निंबोणी-लसूणाचे सटव किडे येण्यापूर्वी दर 15 दिवसांनी फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Post Calving Challenges In Milk Cattles

दुभत्या जनावरांची व्याल्यानंतरची सुरक्षितता:-

  • व्याल्यानंतर जनावरांची शारीरिक शक्ति घटते आणि त्यांच्यात कॅल्शियमचा अभाव दिसून येतो. त्यामुळे जनावरांमध्ये दुधाची निर्मिती तर कमी होतेच पण जनावराला दुधाचा तापसुद्धा येऊ शकतो. काही जनावरांना वार पडण्यात अडचण देखील येते. अशा वेळी जनावरांची चांगली देखभाल करणे आणि योग्य मात्रेत पोशाक पशू आहार देणे तसेच शक्तीवर्धक पेय देणे आवश्यक असते.

उपाय:-

  • ट्रान्समिक्स मिल्क फीवर आणि केटोसिससारख्या चयापचयाच्या रोगांना आटोक्यात ठेवण्यास मदत करते.
  • ट्रान्समिक्स व्याल्याने होणार्‍या तनावाला कमी करते.
  • ट्रान्समिक्स प्लेसेंटा आणि मेट्रिसिसच्या शक्यता रोखते.
  • ट्रान्समिक्स जनावरांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करते.
  • ट्रान्समिक्स दुधाचे उत्पादन वाढवते.

मात्रा:-

  • व्याल्यानंतर जनावरांना 500 मिली ट्रान्समिक्स बाटलीने पाजावे आणि दुसरी मात्रा त्यानंतर 48 ते 72 तासांनी बाटलीनेच द्यावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Powdery mildew in Peas

मटारवरील भुरी रोगाचा प्रतिबंध:-

लक्षणे:-

  • आधी हा रोग जुन्या पानांवर दिसतो आणि नंतर रोपांच्या अन्य भागांवर पसरतो.
  • पानांच्या दोन्ही बाजूंवर भुकटी बनु लागते.
  • त्यानंतर कोवळे देठ, शेंगा इत्यादींवर भुकटीचे डाग पडतात.
  • रोपाच्या पृष्ठभागावर पांढरी भुकटी दिसू लागते. फळे लागत नाहीत किंवा लहान रहातात.
  • शेवटच्या टप्प्यात भुकटीची वाढ शेंगाना झाकून टाकते. त्यामुळे त्या विकण्यास योग्य रहात नाहीत.

प्रतिबंध:-

  • उशिरा पेरणी करू नये.
  • अर्का अजीत, PSM-5, जवाहर मटर-4, जेपी-83, जेआरएस-14 अशी रोग प्रतिरोधक वाणे वापरावीत.
  • विरघळणारे सल्फर 50% WP 3 ग्रॅम प्रति लीटर पाण्यातून किंवा डायनोकेप 48% ईसी 2 मिली प्रति ली पाण्यातून दहा दिवसांच्या अंतराने दोन किंवा तीन वेळा फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Fruit Rot in Brinjal

वांग्यावरील फळ कुजव्या रोगाचा प्रतिबंध :-

लक्षणे:

  • अतिरिक्त ओल या रोगाच्या विकासास सहाय्य करते.
  • फळांजवळ जळल्यासारखे कोरडे डाग पडतात. ते हळूहळू इतर फळांवर पसरतात.
  • रोगग्रस्त फळांची साल करड्या रंगाची होते आणि तिच्यावर पांढरी बुरशी वाढते.

प्रतिबंध:

  • रोगग्रस्त रोपाची पाने आणि इतर भाग तोडून नष्ट करावेत.
  • पिकावर मॅन्कोझेब @ 400 ग्रॅम/एकर किंवा जिनेब @ 400 ग्रॅम किंवा केप्टॉन + हेक्साकोनाज़ोल @ 250 ग्रॅम/ एकरची मात्रा 10 दिवसांच्या अंतराने फवारावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of pod borer in Gram(Chickpea)

 

हरबर्‍यातील घाटे पोखरणार्‍या अळीचे नियंत्रण:-

घाटे पोखरणारी अळी ही कुप्रसिद्ध कीड पिकाला भारी नुकसान पोहोचवते. घाटे पोखरणार्‍या अळीमुळे उत्पादनात 21% हानी होते. या किडीमुळे हरबर्‍याचे सुमारे 50 ते 60% नुकसान होते. हरबर्‍याशिवाय ही कीड तूर, मटार, सूर्यफूल, कापूस, मिरची, ज्वारी, शेंगदाणा, टोमॅटो आणि इतर पिकांनाही ग्रासते. ही डाळी आणि गळिताच्या धान्यावरील विनाशकारी कीड आहे.

संक्रमण:-

किडीची सुरुवात सहसा अंकुरणांनंतर एका पंधरवड्याने होते. फुलोरा येण्याच्या वेळी ढगाळ आणि दमट हवामानात तिचे स्वरूप गंभीर होते. मादी अनेक लहान पांढरी अंडी घालते. 3-4 दिवसात त्यातून अळ्या निघतात. त्या कोवळा पाला खातात आणि त्यानंतर घाट्यांवर हल्ला करतात. एक पूर्ण विकसित अळी सुमारे 34 मिमी लांब, हिरव्या ते राखाडी रंगाची असते. ती मातीत जाऊन कोश बनवते. या किडीचे जीवनचक्र सुमारे 30-45 दिवसात पूर्ण होते. एका वर्षात किडीच्या आठ पिढ्या होतात.

नियंत्रण:-

उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी. त्यामुळे जमिनीत लपलेले किडे नैसर्गिक शत्रू खातील.  0.5%  जिगरी आणि 0.1% बोरिक अॅसिडबरोबर HaNVP 100 LE प्रति एकर अंडी घालण्याच्या वेळी फवारावे आणि 15-20 दिवसांनी पुन्हा फवारणी करावी. रसायनांच्या वापरात 2.00 मिलीलीटर प्रोफेनोफोस 50 ईसी प्रति लीटर पाण्यात अंडीनाशक म्हणून फवारावे. हेक्टरी 4-5 फेरोमेन ट्रॅप वापरावेत. सुरुवातीच्या अवस्थेत निंबोणीच्या फळांचे सत्व 5% फवारावे. हल्ला तीव्र असल्यास इंडोक्साकार्ब 14.5% SC 0.5 मिली किंवा स्पिनोसेड 45% SC 0.1 मिली किंवा 2.5 मिली क्लोरोपाईरीफास 20 EC प्रति ली. पाण्यातून फवारावे.  पक्षी बसण्यासाठी 4-5 जागा बनावाव्यात आणि पिकाच्या सर्व बाजूंनी भेंडी आणि झेंडूचे सुरक्षा पीक लावावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share