Fall army worm :- Nature of Damage and Control measures

लष्करी अळीने होणारी हानी आणि बचावासाठी उपाययोजना

हानी:-

  • ही कीड सामान्यता पाने खाते पण हल्ला तीव्र असल्यास ती कणसे देखील खाते.
  • हल्ला केलेल्या रोपांची वरील बाजूची पाने कुरतडलेली-फाटलेली दिसतात आणि कोवळ्या देठांच्या जवळ दमट भुरा दिसतो.
  • ती कणसे वरील बाजूने खाण्यास सुरुवात करते.

नियंत्रण :-

  • प्रकाश सापळे लावावेत
  • शेतात प्रत्येक एकरात 5 फेरोमोन ट्रॅप लावावेत
  • बिवेरिया बेसियाना @ 1 किलो/ एकर या प्रमाणात फवारावे
  • फ्लूबेंडामीड 480 एससी @ 60 मिली/ एकर
  • स्पिनोसेड 45% एससी @ 80 मिली/ एकर
  • थायोडिकार्ब 75% डब्ल्यूपी @ 400 ग्रॅम/ एकर
  • क्लोरॅट्रानिलिप्रोल 18.5% एससी @ 60 मिली/ एकर

यापैकी कोणतेही एक कीटकनाशक एकरी 150 लीटर पाण्यात मिसळून फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation schedule of soybean:

सोयाबीनच्या पिकासाठी सिंचन व्यवस्थापन

पाणी रोपांचे जीवन असते. ते पुरेशा प्रमाणात देणे आवश्यक असते. सोयाबीनच्या पिकासाठी आवश्यक असलेले बहुतांश पाणी पावसाने मिळते. पाण्याची उरलेली आवश्यकता सिंचन करून भागवतात.

    • सामान्यत: सोयाबीनला 3 – 4 वेळा सिंचन करण्याची आवश्यकता असते.
    • पहिले सिंचन पेरणीच्या वेळी किंवा अंकुरण होण्याच्या अवस्थेत करावे.
    • दुसरे सिंचन फुलोरा येण्याच्या वेळी आणि तिसरे सिंचन फलधारणेच्या वेळी करावे.
    • शेवटचे सिंचन शेंगात दाणे भरण्याच्या वेळी करणे अत्यावश्यक आहे. सोयाबीनमध्ये शेंगा येताना आणि दाणे भरण्याच्या वेळी पाण्याची सर्वाधिक आवश्यकता असते. त्यावेळी पाणी न दिल्यास उत्पादन घटू शकते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Weed management of Soybean

सोयाबीनमधील तणाचे नियंत्रण

  • सोयाबीन उत्पादनात तणाची वाढ ही एक मुख्य समस्या असते. ती सोडवण्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही एका तणनाशकाची फवारणी करावी:
  • अंकुरण होण्यापूर्वी:-
    • इमेजाथायपर 2 % + पेंडीमेथिलीन 30 % @ 1 लीटर/ 2 बिघे किंवा
    • डायक्लोसूलम  84 % WG @ 1 पाऊच (12.7 ग्रॅम)/ 2 बिघे
  • पेरणीनंतर 15-20 दिवसांनी:-
    • फॉम्साफेन 11.1% + फ्लुझीफ़ॉप-पी-ब्यूटाइल 11.1% SL @ 1 ली/ 6 बिघे किंवा
    • क्लोरीमुरेन ईथाइल 25 % WG @ 15 ग्रॅम/ एकर किंवा
    • सोडियम एसिफ़्लुरफेन 16% + क्लोडिनाफ़ॉप प्रॉपगेल 8% ईसी @ 400 ग्रॅम/ एकर
    • इमेजाथायपर 10 % SL @ 400 ग्रॅम/ एकर
    • अधिक माहितीसाठी आमच्या 1800-315-7566 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to increase flowers in Okra

भेंडीतील फुलोर्‍याच्या वाढीसाठी उपाय

  • भेंडीच्या पिकात फुलोरा येण्याची अवस्था खूप महत्वपूर्ण असते.
  • पेरणीनंतर 40-45 दिवसांनी भेंडीच्या पिकाची फुलोरा येण्याची अवस्था सुरू होते.
  • खालीलपैकी काही उत्पादने वापरुन भेंडीच्या फुलोर्‍यात वाढ करता येते:

होमोब्रासिनोलॉइड 0.04% डब्लू/डब्लू 100-120 मिली/ एकर या प्रमाणात फवारावे

समुद्री शेवळाचे सत्व 180-200 मिली/ एकर या प्रमाणात वापरावे

सूक्ष्म पोषक तत्वे 300 ग्रॅम/ एकर या प्रमाणात फवारावी

2 ग्रॅम/ एकर जिब्रेलिक अ‍ॅसिड देखील फवारू शकता

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Problems and solutions of sucking pest in chilli:-

मिरचीमधील रस शोषणार्‍या किडीची समस्या आणि त्यावर उपाय

मिरचीच्या पिकात मावा, तुडतुडे आणि तेलकिड्यासारख्या रस शोषणार्‍या किडीचा प्रादुर्भाव ही मुख्य समस्या असते. ही किड मिरचीच्या पिकातील हिरव्या भागातून रस शोषून हानी करते. त्यामुळे पाने मुडपतात आणि गळून जातात. रस शोषक किडीच्या संक्रमणाने बुरशी आणि विषाणूजन्य रोगांची लागण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे किडीचे वेळेत नियंत्रण करणे आवश्यक आहे:-

नियंत्रण:

प्रोफेनोफॉस 50% EC @ 400 मिली/ एकर किंवा

अ‍ॅसीफेट 75% SP @ 250 ग्रॅम/ एकर किंवा

लॅम्ब्डा सायहेलोथ्रिन 4.9% CS @ 200-250 मिली/ एकर किंवा

फिप्रोनिल 5% SC @ 300-350 मिली/ एकर या प्रमाणात फवारावे.

अधिक माहितीसाठी आमच्या 1800-315-7566 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Transplanting Precautions in Chilli

मिरचीचे पुनर्रोपण करताना बाळगण्याची सावधगिरी

  • मिरचीची लागवड जुलै – सप्टेंबर या काळात केली जाते.
  • ऑगस्ट महिना मिरचीच्या लागवडीस सर्वोत्तम असतो. त्याखालोखाल सप्टेंबर महिना उत्तम असतो.
  • पुनर्रोपणापूर्वी 5-7 दिवस टेबुकोनाझोल वापरुन फवारणी किंवा ड्रेंचिंग केल्याने आर्द्र गलनाची समस्या येत नाही. पुनर्रोपणापूर्वी रोपांच्या मुळांना मायकोराइजाच्या द्रावणात (100 ग्रॅम/ 10 लीटर पाणी) बुडवावे.
  • रोपातील अंतर (दोन ओळीत X दोन रोपात – 3.5-5 फुट X 1-1.5 फुट अनुक्रमे) योग्य प्रमाणात ठेवावे.
  • शेतात किडीचा तीव्र उपद्रव झाल्यास कार्बोफुरॉन 3G @ 8 किलो/ एकर या प्रमाणात भुरभुरावे. रोपे सुकत असल्यास ट्रायकोडर्मा 4 किलो/ एकर या प्रमाणात भुरभुरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Use of Trichoderma :- When, How and Why ?

ट्रायकोडर्मा केव्हा, कसे आणि कशासाठी वापरावे

ट्रायकोडर्मा कोबीवर्गीय पिके, कापूस, सोयाबीन अशा सर्व प्रकारच्या रोपे आणि भाज्यांसाठी आवश्यक असते.

  • बीजसंस्करण:  1 किलो ट्रायकोडर्मा पावडर प्रति क्विंटल बियाणे या प्रमाणात वापरुन पेरणीपुर्वी ते द्रावण बियाण्यात मिसळावे.
  • मुळांच्या उपचारासाठी: 10  किलो उत्तम प्रतीचे शेणखत आणि 100 लीटर पाण्यात मिसळून द्रावण करावे आणि त्यात 1 किलो  ट्रायकोडर्मा पावडर मिसळून रोपणापूर्वी त्या मिश्रणात रोपांची मुळे 10 मिनिटे बुडवावी.
  • मृदा उपचार: 4  किलो ट्रायकोडर्मा पावडर प्रति एकर या प्रमाणात 50 किलो शेणखतात मिसळून मूलभूत मात्रा द्यावी.
  • उभ्या पिकात: उभ्या पिकात वापर करण्यासाठी एक लीटर पाण्यात 10 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर मिसळून बुडाजवळच्या मातीचे ड्रेंचिंग करावे.

खबरदारी

  • ट्रायकोडर्मा वापरल्यावर 4-दिवस कोणतेही रासायनिक बुरशीनाशक वापरू नये.
  • कोरड्या मातीत ट्रायकोडर्मा वापरू नये. त्याच्या वाढीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी ओल आवश्यक असते.
  • संस्कारित बियाणे उन्हात ठेवू नये.
  • ट्रायकोडर्मा जास्त वेळ FYM मध्ये मिसळून ठेवू नये.

अधिक माहितीसाठी आमच्या 1800-315-7566 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

seed treatment in soybean

सोयाबीनचे बीजसंस्करण

पेरणीपुर्वी सोयाबीनचे बियाणे कार्बाक्सिन 37.5% + थायरम 37.5 WP 250 ग्रॅम प्रति क्विंटल बियाणे किंवा कार्बेन्डाजिम 12 % + मॅन्कोझेब 63% WP 250 ग्रॅम प्रति क्विंटल बियाणे किंवा थायोफिनेट मिथाईल 45%+ पायराक्लोस्ट्रोबीन 5% FS 200 मिली प्रति क्विंटल बियाणे वापरुन संस्कारित करावे.  त्यानंतर कीटकनाशक ईमिडाक्लोरप्रिड 30.5% SC 100 मिली प्रति क्विंटल बियाणे किंवा थायमेथोक्साम 30% FS 250 मिली प्रति क्विंटल बियाणे वापरुन संस्करण केल्यास रस शोषक किडिपासून 30 दिवसांपर्यंत संरक्षण मिळते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Improved Variety of Soybean :- NRC-7

सोयाबीनचे उन्नत वाण एन.आर.सी  – 7

  • हे मध्यम अवधीचे वाण असून सुमारे लगभग 90-99 दिवसात तयार होते.
  • 100 दाण्यांचे वजन13 ग्रॅमहून अधिक असते.
  • रोपांची वाढ कमी असल्याने कापणीस सोयिस्कर असते आणि परिपक्व झाल्यावर देखील शेंगा फुटत नाहीत. त्यामुळे उत्पादनाची हानी होत नाही.
  • फुलांचा रंग जांभळा असतो. गर्डल किडे आणि खोडमाशी प्रतिरोधकता हे या वाणाचे वैशिष्ट्य आहे.
  • या वाणाचे उत्पादन 10-12 क्विंटल/ एकर असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to protect Crop from nematode

सूत्रकृमीपासून (निमेटोड) पिकाचा बचाव

  • सूत्रकृमींनी (निमेटोड) ग्रस्त रोपांच्या पानांचा रंग फिकट पिवळा पडतो आणि वाढ थांबते. त्यामुळे रोप खुरटते आणि फलन प्रभावित होते.
  • सूत्रकृमी मुळांवर हल्ला करतात आणि त्यांचावर लहान गाठी बनवतात.
  • संक्रमित रोपे सुकतात.
  • मुळात गाठी केल्याने मुळांना पाणी आणि मातीतील पोषक तत्वे मिळत नाहीत. त्यामुळे रोपे मरतात.
  • कार्बोफ्युरोन 3% G @ 8 किलो/ एकत या प्रमाणात द्यावे किंवा
  • निंबोणीची चटणी 80 किलो/ एकर या प्रमाणात द्यावी किंवा
  • पेसिलोमाइसेस स्पी. 1% डब्ल्यूपी
    • बीजसंस्करणासाठी 10 ग्रॅम/ किलो बियाणे,
    • नर्सरी उपचारासाठी 50 ग्रॅम/ वर्ग मीटर,
    • 2 किलो/ एकर मातीतून द्यावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share