Seed Treatment in green gram

मुगाचे बीजसंस्करण

पेरणीपुर्वी कार्बोक्सिन 37.5 + थायरम  37.5 @ 2.5 ग्रॅम/ किलोग्रॅम बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Advantage of rhizobium culture in crops

रायझोबियम कल्चरपासून पिकाला होणारे लाभ

  • रायझोबियम कल्चर रोपातील निरोगी गाठी वाढण्यास मदत करते. त्यामुळे जमिनीतील नायट्रोजनचे प्रमाण वाढते.
  • रायझोबियम कल्चरच्या वापराने पिकाच्या कालावधीत नायट्रोजनचे सुमारे 15 ते 20 किलोग्रॅम प्रति एकर या प्रमाणात स्थिरीकरण होते.
  • हे जिवाणू रोपे ज्याचा थेट वापर करू शकत नाहीत तो वातावरणातील नायट्रोजन शोषून त्याला अमोनियममध्ये (NH4 +) परिवर्तित करतात. त्याचा वापर रोपे करू शकतात.
  • या जिवाणूंच्या वापरामुळे पिकाचे उत्पादन सुमारे 10 ते 15% वाढवता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Downy mildew control in watermelon

कलिंगडावरील केवळा (डाऊनी मिल्ड्यू) रोगाचे नियंत्रण

  • पानाच्या खालील बाजूच्या पृष्ठभागावर पाण्याने भरलेले डाग उमटतात.
  • पानाच्या खालील बाजूच्या पृष्ठभागावरील पाण्याने भरलेल्या डागांसारखेच डाग वरील पानाच्या डाग बाजूच्या पृष्ठभागावर उमटतात.
  • सर्वप्रथम जुन्या पानांवर डाग उमटतात आणि हळूहळू त्यांचा प्रसार नव्या पानांवर देखील होतो.
  • डाग पसरू लागल्यावर ते आधी पिवळे, त्यानंतर राखाडी रंगाचे आणि कोरडे होतात.
  • रोगग्रस्त वेलींवर फलधारणा होत नाही.
  • रोगग्रस्त पाने तोडून नष्ट करावीत.
  • मॅन्कोझेब 75% WP @ 350-400 ग्रॅम/ एकर किंवा क्लोरोथालोनिल 75% WP @ 200-250 ग्रॅम/ एकर फवारावे.
  • पीक चक्र अवलंबून आणि शेताची साफसफाई करून रोगाची तीव्रता कमी करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control measures of root-knot nematode in watermelon

कलिंगडाच्या मुळावर गाठ निर्माण करणार्‍या किडीचे नियंत्रण

  • मादी मुळाच्या आत, मुलांवर आणि नष्ट झालेल्या मुळात अंडी घालते.
  • अंड्यातून निघालेली नवजात कीड मुळाकडे जातात आणि मुळातील कोशिका खाते.
  • पानांचा रंग फिकट पिवळा होतो.
  • कीडग्रस्त वेलाची वाढ खुंटते आणि वेल खुरटते.
  • हल्ला तीव्र असल्यास वेल सुकून मरतात.
  • उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करावी.
  • नर्सरीच्या माती किंवा वाफ्याचे सौर उर्जेने उपचार करावेत.
  • निंबोणीची चटणी 200 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात वापरावी.
  • पॅसिलोमीसेस लीलासिनस 1 % डब्लू पी  2-4 किलो प्रति एकर या प्रमाणात उत्तम शेणखतात मिसळून मशागत करताना वापरुन किडीचे (निमेटोड) प्रभावी नियंत्रण करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Soil preparation for sweet corn

स्वीट कॉर्नसाठी (अमेरिकन मक्याचे कणीस) शेताची मशागत

  • उन्हाळ्यात नांगरणी करावी.
  • तीन वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी.
  • 2 -3 वेळा कल्टीव्हेटर वापरुन जमीनीची समपातळी करावी.
  • शेवटच्या नांगरणीच्या वेळी FYM @ 3 -4 टन/ एकर वापरावे.
  • त्यानंतर 75 सेमी अंतरावर ओळीने फरे आणि सर्‍या पाडाव्यात. सर्व प्रकारच्या स्वीट कॉर्नसाठी सीडबेड तयार करणे आणि सीड हँडलिंग महत्वपूर्ण असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of leaf curl disease in tomato

Share

Soil preparation for cauliflower

फुलकोबीच्या पिकासाठी जमिनीची मशागत

    • पलटी नांगरणाने 1 ते दोन वेळा 2 फुलीची नांगरणी केल्यानंतर 3 ते 4 वेळा देशी नांगराने नांगरणी करावी.
    • अधिक उत्पादनासाठी चांगल्या वाणाची निवड करावी.
    • नांगरणीच्या वेळी एकरी 20 ते 25 टन शेणखत मातीत मिसळावे.
    • शेतात सूत्रकृमीचा (नेमाटोड) उपद्रव असल्यास एकरी 10 किलो कार्बोफ्यूरान कीटकनाशक फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Selection of seed in moong

मुगाच्या पिकासाठी बियाण्याची निवड

  • निरोगी, उत्तम गुणवत्ता असलेली बियाणी निवडावीत.
  • भरघोस उत्पादनासाठी चांगली वाणे निवडावीत.
  • बियाणे रोगमुक्त असावे.
  • बियाण्याची अंकुरण क्षमता चांगली असावी.
  • शेतकर्‍यांनी अंकुरणाचा अवधि, पोषक तत्वांची आवश्यकता याचीही पडताळणी करावी.
  • रोगग्रस्त बियाण्याचा वापर करण्यापूर्वी बुरशीनाशक आणि कीटकनाशक वापरुन बीजसंस्करण करावे आणि त्यानंतरच बियाणे पेरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Maturity index in muskmelon

खरबूजाच्या फळांच्या परिपक्वतेचे लक्षण

  • सामान्यता सुमारे 110 दिवसांनी फळे परिपक्व होतात.
  • फळे पिकण्याचा कालावधी वाणाच्या निवडीवरही अवलंबून असते.
  • परिपक्व झालेले फळ थोड्या दबावाने किंवा झटक्याने सहजपणे वेळापासून वेगळे होते. ।
  • याला फुल स्लिप स्टेज म्हणतात.
  • खरबूजाच्या काही भारतीय जातींमध्ये परिपक्वतेच्या वेळी सालीवर हिरव्या रेषा उमटतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to increase number of flowers in Okra

भेंडीतील फुलोर्‍याच्या वृद्धीसाठी सुचना

  • भेंडीच्या पिकासाठी फुलोरा येण्याची अवस्था खूप महत्वपूर्ण असते.
  • भेंडीच्या पिकाची फुलोर्‍याची अवस्था पेरणीनंतर 40-45 दिवसांनी सुरू होते.
  • खालीलपैकी काही उत्पादने वापरुन भेंडीच्या पिकातील फुलांची संख्या वाढवणे शक्य असते.
  • होमोब्रासिनोलॉइड 0.04% डब्लू/डब्लू 100-120 मिली./एकर या प्रमाणात फवारावे.
  • समुद्री शेवाळाचे सत्व 180-200 मिली./ एकर या प्रमाणात वापरावे.
  • सूक्ष्म पोषक तत्वांची 300 ग्रॅम/एकर या प्रमाणात फवारणी करावी.
  • 2 ग्रॅम/एकर या प्रमाणात जिब्रेलिक एसिड देखील फवारता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share