Bio-fungicide:- Trichoderma; Application and Benefits

जैव जिवाणूनाशक ट्रायकोडर्मा:- वापर आणि लाभ

रोगांच्या, विशेषता मृदाजन्य रोगांच्या, प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा उत्तम जैविक माध्यम आहे. ती एकप्रकारची मुक्त जीवित बुरशी असून सामान्यता माती आणि मूळसंस्थेत असते.

ट्रायकोडर्माचे लाभ:-

रोग नियंत्रण, रोपांच्या वृद्धिस पोषक, रोगांसाठी जैव रासायनिक रोधक, ट्रान्सजेनिक रोपे आणि जैव उपचार।

वापराची पद्धत:-

बीजसंस्करण:- पेरणीपुर्वी बियाण्यात 6-10 ग्रॅम/ किलो या प्रमाणात ट्रायकोडर्मा मिसळावी.

नर्सरीतील उपचार:- नर्सरीच्या 100 वर्ग मी. आकाराच्या वाफ्यामध्ये 10-25 ग्रॅम ट्रायकोडर्मा मिसळावी.

कलमे आणि रोपांचा उपचार:- 10 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति ली. पाण्याचे मिश्रण बनवून कलमे आणि रोपे त्यात 10 मिनटे ठेवून अशा प्रकारे उपचार केलेली कलमे आणि रोपे लागवडीसाठी वापरावीत.

मृदा उपचार:- 1 किलो ट्रायकोडर्मा 100 किलो शेणखतात मिसळून पॉलीथिनने 7 दिवस झाकून ठेवावे. त्यावर अधूनमधून पाणी घालावे आणि 3-4 दिवसांनी पलटावे. 7 दिवसांनंतर शेतात भुरभुरावे.

रोपाचा उपचार:- एक लीटर पाण्यात 10 ग्रॅम ट्रायकोडर्मा मिसळून रोपांजवळ खोडाच्या सर्व बाजूंवर आणि जमीनीवर शिंपडावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Weed Management Of Maize

मक्यातील तणाचे नियंत्रण:-

  • 1.0-1.5 किग्रॅ. एट्राजीन 50% डब्लू.पी. 500 लीटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी अंकुर फुटण्यापूर्वी वापरल्यास तण नष्ट होते.
  • किंवा एलाक्लोर 50% ई.सी. 4 ते 5 लीटर 500 लीटर पाण्यात मिसळून पेरणीपुर्वी 48 तास वापरुन तणाची वाढ रोखता येते.
  • पेरणीनंतर 20-25 दिवसांनी 2,4-D @ 1 किग्रॅ /हे  चे 500 लीटर पाण्यात मिश्रण करून ते फ्लॅट पॅन नोझलने फवारावे.
  • तणनाशक वापरताना मातीत पुरेशी ओल असणे आवश्यक आहे.
  • तणनाशक वापरल्यानंतर मातीत बदल करू नयेत.
  • द्विदल पिकाचे आंतरपीक घेतलेले असल्यास एट्राजीन वापरू नये. त्याऐवजी पेंडीमेथलीन @ 0.75 किग्रॅ/हे पेरणीनंतर 3-5 दिवसात अंकुर फुटण्यापूर्वी वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Disease Free Nursery Raising For Marigold

झेंडूच्या पिकासाठी रोगमुक्त नर्सरी बनवणे:-

  • पेरणीसाठी निरोगी बियाणे निवडावे.
  • पेरणीपुर्वी शिफारस केलेल्या जिवाणूनाशकाने बीजसंस्करण करावे.
  • एकाच प्लॉटमध्ये पुन्हापुन्हा नर्सरी करू नये.
  • नर्सरीच्या पृष्ठभागावरील मातीचा कार्बेन्डाझिम 5 ग्रॅम/वर्ग मी. वापरुन उपचार करावा आणि त्याच रसायनाचे 2 ग्राम/ लीटर पाणी या प्रमाणात मिश्रण करून नर्सरीचे दर 15 दिवसांनी ड्रेंचिंग करावे.
  • आद्रगलन रोगाच्या नियंत्रणासाठी जैव-नियंत्रण करण्यासाठी ट्रायकोड्रमा विरिडी 1.2 किलोग्रॅम/ हे. ची मात्रा द्यावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Criteria of Selection of Cotton Variety

कापणाच्या वाणाची निवड करताना लक्षात ठेवण्याच्या बाबी:-

प्रतिरोधकता:- निवडलेले वान कीटक आणि रोग प्रतिरोधक असावे.

स्थिर उत्पादन:- उत्पादन स्थिर असणे हा चांगल्या जातीचा गुण असतो. वेगवेगळ्या वातावरणात देखील चांगले उत्पादन देण्याची क्षमता वाणात असावी.

परिपक्वतेचा कालावधी:- परिपक्वतेचा कालावधी म्हणजे बियाण्याची पेरणी केल्यापासून कापणीपर्यंत लागणारा काळ. कापसाच्या वाणांचे सामान्यता लवकर, मध्यम आणि उशिरा परिपक्व होणार्‍या वाणाच्या श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाते.

सुताची गुणवता:- सुताच्या गुणवत्तेचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम उत्पादनाच्या किंमतीवर होतो. सुताची गुणवत्ता सुताची लांबी, मजबूती आणि समानता यावर आनुवंशिकतेचा मोठा प्रभाव असतो तर त्यावर पर्यावरणाचा खूप कमी प्रभाव असतो.

पाण्याची उपलब्धता:- वाणाची निवड करताना पाण्याची व्यवस्था काय आहे हे पहावे आणि आपल्याला सिंचित, अर्धसिंचित की पावसावर अवलंबून असलेल्या वाणाची आवश्यकता आहे ते ठरवावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nursery Bed Preparation of Cabbage

पानकोबीसाठी नर्सरी बनवणे:-

  • बियाण्याची पेरणी वाफ्यात केली जाते. सामान्यता 4-6 आठवडे वयाच्या रोपाचे पुनर्रोपण करावे.
  • वाफ्याची लांबी 3 मी. रुंदी 0.6 मी. आणि ऊंची 10-15 से.मी. असावी.
  • दोन नर्सरी वाफ्यात 70 से.मी. अंतर असावे. त्यामुळे नर्सरीतील निंदणी, अंदर निदाई, खुरपणी, सिंचन अशा अंतर्गत क्रिया सहजपणे करता येतील.
  • नर्सरी वाफ्याचा पृष्ठभाग भुसभुशीत आणि चांगल्या प्रकारे सपाट केलेला असावा.
  • नर्सरी वाफा बनवताना 8-10 कि.ग्रॅ. शेणखत प्रति वर्ग मीटर या प्रमाणात द्यावे.
  • भारी जमिनीत उंच वाफे केल्याने पाणी तुंबण्याची समस्या सोडवता येते.
  • आद्रगलन रोगाने रोपाला होणारी हानी रोखण्यासाठी 15 ते 20 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 10 लीटर पाण्याचे मिश्रण जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

डीएपी के दाम कम होने की संभावना

डीएपीच्या किंमती कमी होण्याची शक्यता:-

गेल्या काही दिवसात डीएपी उर्वरकांच्या किंमतीवरील सबसिडी धोरणानुसार न्यूट्रीएंट बेस्ड योजनेतील फॉस्फेटवरील अनुदानात सुमारे 27% वाढ करावी लागली होती. केंद्र सरकारने पोटाशवरील अनुदानात सुमारे 10% घट केली होती. केंद्र शासनाच्या उर्वरक विभागाने नव्या उर्वरक अनुदान धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्वे जारी करताना असेही स्पष्ट केले आहे की बोरोन आणि झिंक कोटेड फॉस्फोटिक किंवा पोटेशिक उर्वरकानवर क्रमशः 300 रु. आणि 500 रु. प्रति टन या दराने अतिरिक्त सबसिडी दिली जाईल. त्यामुळे शेतकर्‍यांना या सूक्ष्म तत्वांच्या वापरासाठी प्रोत्साहन देखील मिळेल. उर्वरक विभागाने उर्वरकांच्या निर्मात्यांनी उर्वरकांच्या पोत्यांवर/ पिशव्यांवर अनुदानाची रक्कम दर्शवत एमआरपी प्रिंट करणे अनिवार्य असल्याचे निर्देश देखील दिले आहेत. छापील एमआरपीहून अधिक भावाने उर्वरक विकणे शिक्षेस पात्र गुन्हा असेल.

स्रोत:-www.krishakjagat.org

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Field preparation for Soybean

सोयाबीनच्या पिकासाठी शेताची मशागत:-

  • शेतात 3-4 वेळा नांगरणी करून मातीला भुसभुशीत करावे. दोन नांगरणींच्या मध्ये पुरेसे अंतर ठेवावे.
  • शेताची मशागत करताना 15-20 टन प्रति हेक्टर शेणखत किंवा कम्पोस्ट खत वापरावे.
  • निंबोणीची पेंड आणि कोंबडीखत वापरल्याने रोपांची वाढ, गुणवत्ता आणि उत्पादनात वाढ होते तसेच उर्वरकांच्या मात्रेला कमी करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nutrient Management of Bitter Gourd

कारल्यासाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन:-

  • शेताची मशागत करताना 25-30 टन शेणखत मातीत मिसळावे.
  • शेवटच्या नांगरणीच्या वेळी 75 कि.ग्रॅ. यूरिया, 200 कि. ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट आणि 75 कि. ग्रॅ.. पोटाशची मात्रा मातीत मिसळावी.
  • उरलेली 75 कि. ग्रॅ.. यूरियाची मात्रा दोन ते तीन समान हिश्श्यात वाटून द्यावी.
  • फॉस्फरस, पोटाशची सम्पूर्ण मात्रा आणि नायट्रोजनची एक तृतीयांश मात्रा पेरलेल्या बियाण्यापासून 8 ते 10  से.मी. अंतरावर टाकून द्यावी.
  • शेतात नायट्रोजन पोषक तत्वाचा अभाव असल्यास पाने आणि वेलीवर पिवळा रंग येतो आणि रोपांची वाढ खुंटते.
  • नायट्रोजन प्रमाणाबाहेर दिल्याने वाढ प्रमाणाबाहेर होते आणि फलन कमी होते. नर फुलांची संख्या वाढते.
  • मातीत पोटॅशियमचा अभाव असल्यास रोपांची वाढ कमी होते आणि पानांचा आकार लहान होतो आणि फुले गळून पडतात आणि फळे लागणे बंद होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation in Cauliflower

फूलकोबीच्या पिकाचे पाणी व्यवस्थापन:-

  • भरघोस पिकासाठी पुरेशी ओल टिकवणे आवश्यक आहे.
  • रोपणानंतर थोडे पाणी द्यावे.
  • ओल टिकवून ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार 10-15 दिवसांच्या अंतराने थोडे थोडे पाणी देत राहावे.
  • उशिराच्या आणि मध्य हंगामातील पीक पावसावर अवलंबून असते. |
  • फुलोरा येण्याच्या आणि गड्डे विकसित होण्याच्या काळात ओल टिकवणे खूप आवश्यक असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Germination before sowing in bitter gourd

कारल्याच्या बियाण्याचे पेरणीपूर्वीचे अंकुरण:-

  • कारल्याच्या बियांचे आवरण कडक असते. त्यामुळे 2-3 महीने जुन्या बियांना रात्रभरासाठी पाण्यात भिजवून ठेवावे.
  • बियांना चांगले अंकुर फुटण्यासाठी 1-2 दिवस ओल्या कापडात गुंडाळून ठेवावे.
  • अंकुरण झाल्यावर लगेचच बियाणे पेरावे.
  • बियाणे 2 सेमी. खोल पेरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share