Yellow Mosaic Disease in Okra/Bhindi

  • रोपांच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत शेतामध्ये संसर्ग होऊ शकतो.
  • पानांच्या कडांमधील शिरांचे संपूर्ण जाळे पिवळे होणे हे या रोगाचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
  • संसर्ग तीव्र असताना कोवळी पाने पिवळी पडतात, त्यांचा आकार लहान होतो आणि रोपांची वाढ मोठ्या प्रमाणात खुरटते.
  • फुलोरा आणि फळे आल्यास संसर्गामुळे त्याला मर्यादा पडतात. फुले आणि फळे लहान आणि कडक असतात.
  • रोगग्रस्त रोपांना आलेली फळे पिवळी किंवा पांढरी असतात.
  • या रोगाच्या विषाणूचा प्रसार श्वेतमाशीच्या मार्फत होतो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Grading of green peas

  • ताजी मटार विक्रीसाठी बाजारात पाठवताना जास्त पिकून पिवळ्या झालेल्या शेंगा, दाणे न भरलेल्या चपट्या शेंगा, रोगग्रस्त शेंगा आणि किडीने पोखरलेल्या शेंगा प्रतवारी करून वेगळ्या काढणे आवश्यक असते.   
  • ज्यांच्यावर प्रक्रिया करायची आहे अशा शेंगांची दाण्याच्या आकारानुसार चार प्रकारात प्रतवारी केली जाते.   
  • लहान आकाराचे दाणे सर्वोत्तम प्रतीचे समजले जातात.

Share

Harvesting of green pea

  • हिरव्या शेंगांची तोडणी योग्य वेळी होणे अत्यावश्यक असते.   
  • भाजीसाठी वापर करण्यासाठी शेंगांचा गडद हिरवा रंग बदलून फिकट हिरवा होतो आणि त्यात दाणे भरतात तेव्हा तोडणी केली जाते.   
  • रोपाला हळुवार हाताळणे आवश्यक असते. तोडणी करताना शिरा दुखावल्यास उरलेल्या शेंगा योग्य प्रकारे विकसित होणार नाहीत. 

Share

Control of Stemphylium Blight in Onion

  • मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी बुरशीनाशक 500 ग्रॅम/ एकर या प्रमाणात किंवा 
  • हेक्झाकोनाझोल 5% एससी @ 400 मिलि/ एकर या प्रमाणात किंवा 
  • प्रोपिकोनाझोल 25% ईसी @ 200 मिलि/ एकर या प्रमाणात 
  • पुनर्रोपण केल्यानंतर 30 दिवसांपासून किंवा रोगाची लक्षणे दिसू लागताच 10-15 दिवसांच्या अंतराने फवारावे. 

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Symptoms of Stemphylium Blight in Onion

स्टेमफिलियम अंगक्षय:- 

  • पानांच्या मध्यभागी आणि फुलांच्या देठांवर पिवळसर ते नारिंगी गेरवा रंगाचे लहान ठिपके उमटतात.   
  • त्यानंतर पानांच्या मध्यभागी गुलाबी रंगाच्या कडा असलेले लंबाकृती डाग पडतात.   
  • फुलोऱ्याच्या देठावरील रोगामुळे बीजपिकाची मोठी हानी होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Drip irrigation and Advantages of Drip Irrigation

पाण्याची उपलब्धता हा चांगल्या पिकाचे यशस्वी उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेला महत्वाचा घटक असतो. सातत्याने होणार्‍या लोकसंख्या वाढीमुळे आणि हवामानातील बदलांमुळे भूगर्भातील पाणीसाठ्याची पातळी घसरत आहे. त्यामुळे पिकांचे उत्पादन देखील सातत्याने कमी होत आहे. ठिबक सिंचनाचा शोध या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लावण्यात आला असून ते शेतकर्‍यांसाठी वरदान ठरत आहे. या सिंचन पद्धतीमध्ये पाणी जलस्रोतापासून थेट रोपांच्या मुळांपर्यंत प्लॅस्टिक पाईपचा वापर करून पोहोचवले जाते. 

ठिबक सिंचनामुळे मिळणारे लाभ –

  • अन्य सिंचन पद्धतींच्या तुलनेत 60-70% पाण्याची बचत होते.
  • रोपांना अधिक प्रभावीपणे पोषकद्रव्ये पुरवण्यासाठी ठिबक सिंचन उपयुक्त ठरते. 
  • ठिबक सिंचनामुळे बाष्पीभवन आणि गळतीने होणारी पाण्याची हानी रोखली जाते. 
  • ठिबक सिंचन पद्धतीनुसार पाणी थेट पिकाच्या मुळात दिले जाते. त्यामुळे आजूबाजूची माती कोरडी राहते आणि तणाची वाढ होऊ शकत नाही. 

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Post Calving Challenges In Milk Cattles

  • कोरडा आहार घेण्याचे प्रमाण कमी होणे:- वेताच्या पूर्वी आणि विणीच्या दरम्यान गायी खात किंवा पित नाहीत. परंतु विणीच्या वेळी गाईच्या शरीरातून 50 लीटरपर्यन्त पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स (सोडीयम, पोटॅशियम असे क्षार) बाहेर पडतात. त्यामुळे गाय निष्क्रिय होते आणि तिच्या कोरड्या आहाराचे प्रमाण कमी होते.
  • कॅल्शियमच्या गरजेची झपाट्याने वाढ:- विणीनंतर स्तनातून येणाऱ्या पहिल्या स्त्रावात आणि दुधात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे कॅल्व्हिनची आवश्यकता वाढते. 
  • नकारात्मक ऊर्जा:- वीणीनंतर बहुसंख्य गायींत नकारात्मक ऊर्जा शिल्लक राहते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Wilt in Pea

  • कार्बोक्सिन 37.% + थीरम 37.5% @ 2 ग्रॅम/ किलोग्रॅम या प्रमाणात किंवा ट्रिकोडर्मा व्हीरिडी @ 5 ग्रॅम/ किलोग्रॅम या प्रमाणात वापरुन पेरणीपुर्वी बिजसंस्करण करा आणि तीव्र लागण झालेल्या भागात लवकर पेरणी करणे टाळा. 
  • तीन वर्षांनी पालटून पीक घ्या.  
  • रोगाचे वाहक असलेले तण नष्ट करा. 
  • पेरणीनंतर 15 दिवसांनी मायकोरिझा @ 4 किलोग्रॅम/ एकर या प्रमाणात वापरा. 
  • थियाफनेट मेथील 75% डब्ल्यूपी @ 300 ग्रॅम/ एकर या प्रमाणात फुलोरा येण्यापूर्वी फवारा. 
  • शेंगा तयार होण्याच्या वेळी प्रोपिकोनाझोल 25% ईसी @ 125 मिलि/ एकर या प्रमाणात फवारा. 

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Symptoms of Wilt in Pea

  • मुळे काळी पडतात आणि त्यानंतर कुजतात. 
  • रोपाची वाढ खुंटते, पर्णसंभार पिवळा पडतो, पल्लव आणि पालवी खालील बाजूस वळते. 
  • संपूर्ण रोप मरते आणि खोड सुरकुतते.

Share

Major Diseases and Their Control Measures of Wheat

तांबेरा (गेरवा) हा गव्हाच्या पिकावरील मुख्य रोग असून गव्हामध्ये पिवळा तांबेरा (पट्टेरी तांबेरा), पानांचा तांबेरा (गेरवा तांबेरा),काळा गेरवा (खोडाचा तांबेरा) यासह चार प्रकारच्या तांबेर्‍याचा संसर्ग आढळतो.

लक्षणे –

 

  • पिवळा तांबेरा (पट्टेरी तांबेरा):- पिवळा तांबेरा (पट्टेरी तांबेरा) हा रोग प्यूसीनिया स्ट्रिफॉर्मिस बुरशीमुळे होतो.नारिंगी-पिवळ्या रंगाच्या बीजामुळे तो गव्हावरील इतर प्रकारच्या तांबेर्‍याहून लगेच वेगळा ओळखता येतो. या  बीजातून एकमेकांना चिकटलेल्या सूक्ष्म पुटकुळया निर्माण होतात आणि पानांच्या शिरांना समांतर असे त्यांचे चट्टे तयार होतात. बीजे पानांच्या वरील बाजूस, पर्णआवरणावर, कुसळांवर आणि तुसांमध्ये आढळतात. 

 

  • पोषक परिस्थिति:- थंड आणि दमट हवामानात पिकामध्ये पिवळा तांबेरा (पट्टेरी तांबेरा) रोगाची लागण होते. संसर्ग होण्यासाठी पानांवर ओल असणे आणि 10-15°C इष्टतम तापमान आवश्यक असते. लागण झाल्यापासून 10-14 दिवसात पुटकुळया तयार होतात. रोगामुळे उत्पादनात 25% पर्यंत घट होऊ शकते. 

 

  • पानांचा तांबेरा (गेरवा तांबेरा):- पानांचा तांबेरा (गेरवा तांबेरा) प्यूसिनिया ट्राइटिसिनिया बुरशीमुळे होतो. हा रोग राय धान्य आणि ट्रिटिकेल या धान्यांच्या पिकात देखील होतो. पानांच्या तांबेर्‍यामुळे (गेरवा तांबेरा) लालसर-नारिंगी रंगाची बीजे निर्माण होतात आणि त्यापासून लहान 1.5 मिमी आकाराच्या, वर्तुळाकार ते अंडाकार आकाराच्या पुटकुळया तयार होतात. त्या पानांच्या वरील बाजूला असतात. पानांच्या तांबेर्‍यामुळे (गेरवा तांबेरा) आलेल्या पुटकुळया पानांच्या फक्त वरील बाजूस असतात तर पिवळ्या तांबेर्‍यामुळे  (पट्टेरी तांबेरा) आलेल्या पुटकुळया पानांच्या दोन्ही बाजूला असतात.  

 

  • पोषक परिस्थिति:- पुटकुळया येण्यासाठी 15 ते 20º C तापमान आणि दव/ पाऊस/ सिंचनामुळे पानांवर ओल असणे आवश्यक असते. संसर्ग झाल्यावर 10-14 दिवसांनी उठणार्‍या पुटकुळया हे रोगाचे आढळून येणारे पहिले लक्षण असते. कापणींनंतर उन्हाळ्यात पुन्हा उगवणार्‍या गव्हाच्या रोपांमुळे रोगाची साथ चालू राहत असल्याने अशी रोपे काढून  पानांच्या तांबेर्‍याचे (गेरवा तांबेरा) नियंत्रण करणे किंवा त्याच्या साथीला काही काळ रोखणे शक्य होते. 

 

  • Black Rust (Stem Rust):– काळा गेरवा (खोडाचा तांबेरा) रोग पुसिनिया ग्रॅमिनिस बुरशीमुळे होतो. गव्हाशिवाय बार्ली राय आणि  ट्रिटिकेल या धान्यांच्या पिकात देखील या रोगाची लागण होते. काळा गेरवा (खोडाचा तांबेरा) रोगामध्ये लालसर-करड्या रंगाच्या, लंबगोल पुटकुळ्या किंवा चट्टे खोड आणि पानांवर उमटतात. काळा गेरवा (खोडाचा तांबेरा) रोगाच्या पुटकुळ्या पानांच्या दोन्ही बाजूला असतात तर पानांच्या तांबेर्‍यामुळे (गेरवा तांबेरा) आलेल्या पुटकुळया पानांच्या फक्त वरील बाजूस असतात. पुटकुळ्या फुटून बाहेर पडलेला भुरा वारा आणि अन्य वाहक इतर रोपांपर्यंत पोहोचवतात आणि रोगाचा प्रसार वाढतो.

 

  • पोषक परिस्थिति:- काळा गेरवा (खोडाचा तांबेरा) रोग इतर प्रकारच्या तांबेऱ्याहुन अधिक म्हणजे 18-30°C तापमान असताना होतो. संसर्ग होण्यासाठी 15 ते 20º C तापमान आणि दव/ पाऊस/ सिंचनामुळे पानांवर ओल असणे आवश्यक असते आणि सुमारे सहा तासात पूर्ण रोपाला लागण होते. संसर्ग झाल्यानंतर 10-20 दिवसांनी पुटकुळया आढळून येतात. 

नियंत्रण:-

  • कापणींनंतर उन्हाळ्यात पुन्हा उगवणारी गव्हाची रोपे नष्ट करा. 
  • पिवळे डाग पडल्यास पीकपालट करणे महत्वाचे असते. 
  • रोग प्रतिकारक वाण वापरण्याने कमी खर्चात आणि पर्यावरण पोषक पद्धतीने रोगाचे नियंत्रण करता येते. 
  • वाढीच्या काळात पिकाचे बारकाईने निरीक्षण करणे रोगाचे तातडीने निदान होण्यासाठी आवश्यक असते. 
  • एकाच घटकाचा समावेश असलेल्या बुरशीनाशकांचा पुन्हापुन्हा वापर टाळा. 
  • कसुगामायसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोराईड 45% डब्ल्युपी 320 ग्रॅम/ एकर या प्रमाणात किंवा प्रोपिकोनाझोल 25% ईसी 240 मिलि/ एकर या प्रमाणात फवारा. 

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share