कारल्यावरील लाल भुंगेऱ्याचे निदान

  • अळी मुळांवर, रोपाच्या जमिनीखालील भागावर आणि जमिनीला टेकलेल्या फळांवर चरते.
  • हानी झालेली मुळे आणि जमिनीखालील खोडाचे भाग सॅप्रोलायटिक बुरशीच्या दुय्यम संसर्गाने सडू लागतात आणि वेलीवरील अपरिपक्व फळे वाळतात.
  • लागण झालेली फळे खाण्यास योग्य राहत नाहीत..
  • वाढ झालेले किडे पानांवर अधाशीपणे चरून भोके पाडतात.

बीजरोपे आणि कोवळ्या पानांवर त्यांचा भर असतो. त्यांच्यामुळे बीजरोपे मरूही शकतात.

Share

कांद्याला चीर पडणे या वैगुण्याचे नियंत्रण

  • एकसमान सिंचन आणि खत घालण्याच्या पद्धतीचे पालन करून कंद फाटणे रोखता येते.
  • कंद सावकाश वाढणाऱ्या जातींची लागवड करून या वैगुण्याला आळा घालता येतो.
Share

कांद्याला चीर पडणे (शारीरिक वैगुण्य) कारणे

  • कांद्याच्या शेतातील असमान सिंचनामुळे या वैगुण्याचे प्रमाण वाढते.
  • अतिसिंचित शेते पूर्ण कोरडी झाल्यावर त्यांच्यात पुन्हा अतिरिक्त सिंचन केल्यास कंद फाटतात.
  • कंदावरील कीड अनेकदा कंद फाटण्याशी संबंधित असते.
  • सुरुवातीची लक्षणे कंदाच्या बुडाशी आढळून येतात. .
Share

वाटाण्यावरील करपा आणि मर रोगाचे नियंत्रण

  • निरोगी बियाणे वापरावे आणि कार्बनडाझिम + मॅन्कोझेब @ 250 ग्रॅम/ क्विंटल वापरून पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी.  
  • फुलोरा येण्याच्या वेळी आणि त्यानंतर 10-15 दिवसांच्या अंतराने रोगग्रस्त पिकावर मॅन्कोझेब 75% @ 400 ग्रॅम/ एकर फवारावे. किंवा
  • रोगग्रस्त पिकावर थियोफानेट मिथाईल  70% डब्ल्यूपी @ 250 ग्रॅम/ एकर फवारावे. किंवा
  • रोगग्रस्त पिकावर क्लोरोथ्रलोनील 75% डब्ल्यूपी @ 250 ग्रॅम/  एकर फवारावे.
  • रोगग्रस्त रोपे उपटून नष्ट करावीत.   
  • पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था करावी.
Share

वाटण्यावरील करपा आणि मर रोग – लक्षणे आणि नियंत्रण

 

  • पानांवर जांभळ्या रंगाचे लहान डाग पडतात. ते वाढून करड्या रंगाचे, विशिष्ठ आकाराचे गोलाकार बनतात.
  • असेच व्रण खोडांवर देखील होतात आणि त्यांचा विस्तार वाढून खोड करड्या किंवा काळ्या रंगाचे होते.
  • शेंगांवर तपकिरी किंवा करड्या रंगाचे अनियमित आकाराचे गोल व्रण पडतात.
Share

कुसुम योजनेअंतर्गत सबसिडी कशी मिळवता येते

  • कुसुम योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी शेतकऱ्यांना संचाच्या एकूण किंमतीच्या 10 टक्के रक्कम भरावी लागते. 
  • उरलेल्या रकमेपैकी 30 टक्के रक्कम केंद्र सरकारकडून सबसिडीच्या स्वरुपात तर 30 टक्के रक्कम राज्य सरकारकडून देण्यात येते. 
  • उरलेल्या 30 टक्के रकमेच्या एवढे कर्ज शेतकरी बँकेकडून घेऊ शकतो.  
  • बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी देखील सरकार शेतकऱ्यांना मदत करते. 
Share

कुसुम योजना: 10 टक्के पैसे भरून शेतकऱ्यांना सोलर वॉटर पंप मिळू शकतो

  • किसान ऊर्जा सुरक्षा एवं उथ्थान महाभियान (कुसुम) योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना विनाअडथळा त्यांच्या शेतात सिंचन करण्यास सक्षम करणे असा आहे. 
  • या योजनेअंतर्गत एजन्सीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर वॉटर पंप उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केंद्र सरकारने एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) कंपनीकडे सोपवली आहे.
Share

उच्च मागणीमुळे झेंडूचे पीक फायदेशीर ठरत आहे

  • डोकेदुखी, सूज, दातदुखी, जखमा, कर्करोग, चट्टे आणि इतर अनेक त्वचारोगांवरील वैद्यकीय उपचारांसाठीच्या वापरामुळे झेंडूला चांगली किंमत मिळते. 
  • झेंडूच्या पाकळ्या सजावट आणि मेक-अप, पुडिंग इत्यादीत वापरण्यासाठी खाद्य रंग, कपड्याचा रंग यासाठी वापरल्या जातात. 
  • जखमा, भाजलेले, कर्करोग आणि त्वचारोग यावर झेंडू वापरून उपचार करता येतात. 
  • झेंडूचा अर्क मेणबत्तीत देखील वापरला जातो. 
Share

कोथिंबीर/ धान्यासाठी योग्य माती आणि हवामान

  • कोथिंबीर/ धन्याच्या पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी लोम माती उत्तम असते. 
  • पावसावर आधारित पिकासाठी चिकणमाती उत्तम असते. सामू  6-8 असावे.
  • 20-25o C तापमान कोथिंबीर/ धन्याच्या पिकासाठी उत्तम असते. 
  • कोथिंबीर/ धन्याच्या पिकासाठी थंड, कोरडे आणि धुकेरहित वातावरण उत्तम असते.
Share