Post-harvest management in gram

हरबर्‍याच्या पिकाच्या कापणीनंतरचे नियोजन

  • हरबर्‍याच्या पिकाच्या कापनिंनंतर पाच ते सहा दिवस उत्पादन चांगल्याप्रकारे वाळवावे.
  • सुकवल्यावर कापलेल्या धान्याची थ्रेशिंग मशीन वापरुन मळणी करावी.
  • साठवण करण्यापूर्वी पिकाचे दाणे चांगल्या प्रकारे वाळवावेत.
  • साठवण करताना भुंगेर्‍यापासून (पल्स बीटल) बचाव करण्यासाठी 10% मॅलाथियान द्रावणात पोते बुडवावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Storage technique for gram

हरबर्‍याच्या साठवणुकीचे तंत्र

  • सुमारे 13 ते 15 टक्के आर्द्रता असताना पिकाची कापणी केल्याने हरबर्‍याच्या दाण्यांचे प्रमाण घटते.
  • साठवणुक करताना योग्य काळजी घेतल्याने हरबर्‍याच्या गुणवत्तेशी संबंधित घटकांवर जसे रंग, बाह्य रूप इ. परिणाम होतो.
  • उत्पादनाच्या साठवणुकीपूर्वी त्याची सफाई करावी.
  • साठवण केलेल्या धान्याचे वेळोवेळी निरिक्षण करावे.
  • साठवणुकीच्या वेळी धान्यातील आर्द्रतेकडे खास लक्ष द्यावे. आर्द्रता कमी असल्यास दाणे तुटू शकतात.
  • वातावरण अनुकूल नसल्यास धान्य अधिक तुटते.
  • निरोगी दाण्यांची बाजारातील किंमत जास्त असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Lesser grain borer control in wheat

साठवणुक केलेला गहू पोखरणार्‍या किड्यांचे नियंत्रण

  • धान्य साठवण्यापूर्वी त्याला कडक उन्हात वाळवावे.
  • हवा खेळती असलेल्या सीमेंट किंवा कॉन्क्रीटने बांधलेल्या पक्क्या गोदामाचा वापर करावा.
  • गोदामातील धान्याच्या थप्प्यांमध्ये किमान 2 फुट अंतर ठेवावे.
  • गोदामात धान्याच्या पोत्यांची थप्पी लावताना पोती छताला किंवा भिंतींना चिकटणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
  • गोदामात हवा खेळती असल्यास धान्यातील आर्द्रता वाढत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या रोगांपासून आणि किड्यांपासून धान्याचा बचाव होतो.
  • धान्याच्या साठवणुकीसाठी दमट आणि ओल्या पोत्यांचा वापर करू नये.
  • कोरड्या मोसमात महिन्यातून किमान एकदा आणि पावसाळ्यात आठवड्यातून किमान एकदा धान्याची पाहणी करावी. धान्यात प्रमाणाबाहेर आर्द्रता असल्यास ते गोदामातून बाहेर काढून वाळवावे.
  • मेलाथियाँन @ 100 मिलीग्रॅम प्रति वर्ग मीटर फवारावे.
  • डाईक्लोरवास @ 0.5 ग्रॅम प्रति वर्ग मीटर वापरल्याने देखील धान्याचा संक्रमणापासून बचाव होतो.
  • डेल्टामेथ्रिन की 10 ग्रॅम प्रति लीटर द्रावण गोदामात फवारावे.
  • कीटकनाशके विषारी असल्याने त्यांच्या लेबलवरील सर्व खबरदारीच्या सूचनांचे पालन करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share