काकडीवरील फळ पोखरणार्या माशीचे नियंत्रण
- अळ्या फळांना भोक पाडून रस शोषतात.
- ग्रस्त फळे खराब होऊन गळतात.
- माशी अंडी देण्याच्या भागाने फळात भोक पासून त्यांना हानी पोहोचवते. या भोकांमधून फळांचा रस गळताना दिसतो.
- ग्रस्त फळे एकत्र करून नष्ट करावीत.
- परागण झाल्यावर लगेच तयार होणार्या फळांना पाँलीथीन किंवा कागदात गुंडाळावे.
- माशांचे नियंत्रण करण्यासाठी शेतात शेतात रांगांच्या मध्ये मका लावावा. मक्याच्या रोपांची ऊंची जास्त असल्याने माशी त्यांच्या पानाखाली अंडी घालते.
- ज्या भागात फळमाशीचा हल्ला तीव्र असेल तेथे कार्बारिल 10% भुकटी मातीत मिसळावी.
- डायक्लोरोवास कीटकनाशकाचे 3 मिली. प्रति ली. पाण्यात मिश्रण बनवून फवारावे.
- उन्हाळ्यात खोल नांगरणी करून जमिनीतील माशीला सुप्तावस्थेत नष्ट करावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share