आगामी काळात पुन्हा एकदा हवामान बदलणार आहे. यापूर्वी महाराष्ट्र आणि बिहारमध्ये मुसळधार पाऊस पडला होता. आता येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त देशाच्या उत्तर भागांत मान्सून बरेच दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील डोंगराळ राज्यांसह तसेच मैदानी प्रदेशातही येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामानात बदल होईल. मध्य प्रदेश, पूर्व राजस्थानातही येत्या काही दिवसांत मान्सूनचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
खासगी हवामान संस्था ‘स्कायमेट वेदर’ च्या म्हणण्यानुसार, गुजरातमध्ये येत्या आठवड्यात पाऊस पडेल आणि 17 ऑगस्टपर्यंत गुजरातमधील बर्याच भागांत चांगला पाऊस पडेल. याखेरीज दिल्ली-एनसीआर आणि उत्तर-पश्चिम भारतात मान्सून आता सक्रिय आहे. पूर्व राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या काही भागांंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
स्रोत: कृषी जागरण
Share