दहावी पास तरुणांसाठी भारतीय पोस्टमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी भारतीय पोस्टमध्ये भरती निघाली आहे. या भरतीअंतर्गत केरळ पोस्टल सर्कलसाठी ग्रामीण डाक सेवकांच्या जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पोस्टसाठी पात्र उमेदवार भारतीय पोस्टच्या अधिकृत वेबसाइट appost.in वर अर्ज करु शकतात.

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला भारत सरकार, राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या मान्यताप्राप्त बोर्डद्वारा घेतलेली दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे असावी. या भरतीशी संबंधित अन्य माहितीसाठी, appost.in वर क्लिक करुन भारतीय पोस्टच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

स्रोत: कृषी जागरण

Share

See all tips >>