उत्तर प्रदेश सरकारने राशन कार्ड धारकांना होळीपूर्वी भेटवस्तू दिली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत आता सर्व रेशनकार्ड धारकांना महिन्यातून दोन वेळा मोफत रेशन दिले जाणार आहे. या अगोदर या योजनेची वेळेची मर्यादा नोव्हेंबर महिन्यासाठी निश्चित केली होती. मात्र आता ही योजना मार्च 2022 अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील गरीब आणि मजदूर वर्गातील लोकांसाठी खास होळीच्या सणानिमित्त विशेष घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत रेशनकार्ड ग्राहकांना महिन्यातून दोनदा गहू आणि तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर मोफत रेशनमध्ये डाळ, खाण्याचे तेल आणि मीठ देखील दिले जाईल. यामुळे दारिद्र्यरेषेखालील लोकांना खूप मदत होईल.
यासोबतच योगी सरकारने जनतेच्या हितासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत, त्याचबरोबर सरकारच्या या घोषणेनंतर राज्यातील 15 करोडहून अधिक लोकांना दुप्पट रेशन मोफत देण्यात येणार आहे. रेशनकार्ड धारकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
स्रोत: कृषि जागरण
Shareकृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.