देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही. शेतामध्ये मेहनत करून सुद्धा त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. म्हणूनच शेतकऱ्यांच्या या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना चालवित आहेत. मात्र, असे असतानाही या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही.
तर दुसरीकडे सरकारी योजनांची माहिती घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. अशा परिस्थितीतून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी राजस्थान सरकारने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. ज्या अंतर्गत सरकारने rajkisan.rajsthan.gov.in हे पोर्टल विकसित केले आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी बांधव शेतातील पेरणी, सिंचन पाइपलाइन, कृषी यंत्रे, डिग्गी आणि शेतीशी संबंधित योजनांसाठी अर्ज करू शकतात. यासोबतच तुम्ही सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या लाभदायक योजनांसाठी येथे अर्ज करू शकता. पोर्टलवरील अर्जाचे स्वरूप खूपच लहान आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.
याशिवाय राज्य सरकारने शेतकऱ्यांq4साठी तीन मोबाईल अॅप देखील सुरू केले आहेत. जे शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहेत. सरकारने खजूर शेतीसाठी राजकिसन खजूर मोबाईल अॅप विकसित केले. सोबतच पशुसंवर्धन व फलोत्पादन योजनांच्या अर्जासाठी ‘राजकिसान सुविधा अॅप’ लाँच करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीने शेतकरी घरबसल्या सरकारी योजनांचा लाभ सहज घेऊ शकतात.
स्रोत: टीवी9 भारतवर्ष
Shareकृषी क्षेत्रातील अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी दररोज ग्रामोफोनचे लेख वाचत रहा आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.