मेरा रेशन अ‍ॅप वरून देशाच्या कोणत्याही भागात रेशन मिळू शकेल

भारत सरकार एक महत्वाकांक्षी योजना राबवित आहे, ज्याला वन नेशन वन रेशन कार्ड म्हणून ओळखले जाते. या योजनेअंतर्गत मोफत व स्वस्त रेशन देण्यात येतात. आता रेशन व्यवस्था अधिक व्यवस्थित करण्यासाठी अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने मोबाईल अ‍ॅप सुरु केले आहे.

या अ‍ॅपचा फायदा राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्याअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना होईल.या लाभार्थींना या अ‍ॅपमधूनच हे जाणून घेता येईल की, त्यांना किती धान्य मिळणार आहे. या नवीन अ‍ॅपचे नाव आहे “मेरा राशन एप”. रेशन वितरण प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता आणणे हे या अ‍ॅपचे मुख्य उद्दीष्ट असेल.

या अ‍ॅपचा सर्वात मोठा फायदा प्रवाश्यांना होईल, कारण या वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत कार्डधारक देशातील कोणत्याही विभागातील कोणत्याही रेशन दुकानातून धान्य घेऊ शकतील. या योजनेचा लाभधारक आपल्या आसपासच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत चालू असलेल्या रेशन दुकानांचीही सहज माहिती मिळवू शकतात.

स्रोत: कृषी जागरण

Share

See all tips >>