शेतकरी बंधूंनो, मूग पिकांमध्ये या रोगात पानांवर गडद तपकिरी ठिपके दिसतात, देठावर ठिपके तयार होतात ते लांबलचक आणि जांभळ्या-काळ्या रंगाचे असतात. हे डाग नंतर एकमेकांत मिसळतात आणि संपूर्ण देठाला घेरा मारतात आणि बियांवरती लाल किंवा तपकिरी रंगाचे अनियमित ठिपके दिसतात त्यामुळे रोगाच्या या गंभीर अवस्थेत स्टेम कमकुवत होतात.