सरकार महिलांसाठी अनेक विशेष योजना चालवित आहे. यातील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना लाभ मिळतो. ही योजना सन 2017 मध्ये सुरु करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना शासनाकडून पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. महिलांना ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये मिळते.
या योजनेचा लाभ दैनंदिन वेतन कामगार महिला घेऊ शकतात किंवा आर्थिक दुर्बल महिलांनाही या योजनेचा फायदा होऊ शकतो. या योजनेचा अर्ज आपण घरी बसून देखील करु शकता. अर्ज करण्यासाठी www.Pmmvy-cas.nic.in वर लॉगिन करा आणि नंतर अर्ज करा.
स्रोत: गुड रिटर्न्स डॉट कॉम
Shareफायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली देलेल्या बटणाच्या सहाय्याने आपल्या मित्रांसह देखील शेयर करायला विसरु नका.