मध्य प्रदेशात पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान, मुख्यमंत्र्यांनी दिले मदतीचे आश्वासन

गेल्या 24 तासांत मध्य प्रदेशातील सुमारे 20 जिल्ह्यांमध्ये पावसासोबत जोरदार गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या गारपिटीमुळे शेतात पांढ-या चादरी पसरल्या आहेत. पिके नष्ट झाल्याने लाखो शेतकर्‍यांना नुकसान सहन करावे लागले आहे.

एकीकडे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या देशव्यापी लॉक-डाऊनमुळे शेतकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागला आहे, दुसरीकडे गारपीटीमुळे आता शेतकर्‍यांना अधिक त्रास होऊ लागला आहे.

तथापि, या अडचणीच्या वेळी शेतकर्‍यांना मध्य प्रदेश सरकारची मदतीची अपेक्षा आहे. ही गारपीट पाहून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकरी बांधवांना मदतीचा हात पुढे केला आहे. ट्विटवरुन सी.एम शिवराज यांनी शेतकर्‍यांना काळजी करू नका असे सांगितले आहे.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “माझ्या शेतकरी बांधवांनो, मुसळधार पावसासह राज्यातील विविध ठिकाणी गारपीट झाल्याचे वृत्त आहे. मी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवतो आहे. काळजी करू नका, पीक नुकसानीची चिंता करू नका. संकटाच्या प्रत्येक घटनेत “मी तुमच्या पाठीशी उभा आहे, मी तुम्हाला त्यातून बाहेर काढीन.

Share

See all tips >>